सॉरी सॉरी… चुकून तुमचा डिव्होर्स झाला… न्यायाधीशाचा निर्णय बदलण्यास नकार; जोडप्याच्या पोटात गोळाच आला

नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ बघायला मिळत आहे. एका चुकीमुळे थेट एका जोडप्याला घटस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हेच नाही तर न्यायाधीशांनी आपला निर्णय मागे घेण्यास नकार देखील दिल्याचे कळत आहे.

सॉरी सॉरी... चुकून तुमचा डिव्होर्स झाला... न्यायाधीशाचा निर्णय बदलण्यास नकार; जोडप्याच्या पोटात गोळाच आला
Divorce
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 6:18 PM

गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या प्रकरणात मोठी वाढ झालीये. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्येच घटस्फोट होण्याच्या प्रकरणात वाढ झाल्याचे बघायला मिळते. भारतामध्ये एखाद्या जोडप्याला घटस्फोट घ्यायचा असेल तर एक मोठी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, असे काही देश आहेत, जिथे अगदी कमी कालावधीमध्येही घटस्फोटाची प्रक्रिया पार पडते आणि अवघ्या काही वेळातच जोडपे विभक्त होऊ शकते. आता नुकताच घटस्फोटाचा हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.

हे हैराण करणारे प्रकरण लंडनमधील आहे. एका जोडप्याचा कोर्टाकडून चुकून घटस्फोट करण्यात आल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. ऐकायला थोडे वेगळे वाटेल. मात्र, खरोखरच कोर्टाच्या चुकीमुळे एक जोडप्याला घटस्फोट झालाय. आयशा वरदागच्या लंडनस्थित लॉ फर्म वरदाग्सच्या सॉलिसिटरच्या चुकीमुळे हे सर्व घडले. हेच नाही तर न्यायाधीशांनी आपला निर्णय मागे घेण्यास नकार दिला.

मिस्टर आणि मिसेस विल्यम्स नावाच्या जोडप्याचा घटस्फोट कोर्टाकडून चुकून करण्यात आला. यांच्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली, परंतू कोर्टाने यांचा घटस्फोट केला. या जोडप्याला घटस्फोट घ्यायचा होता, परंतू काही प्रक्रिया बाकी राहिली होती. त्याचे झाले असे की, दुसऱ्या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अंतिम आदेशादरम्यान वरदागच्या लिपिकाने संगणकावरील ड्रॉप डाउन मेनूमधून मिस्टर आणि मिसेस विल्यम्सचे नाव निवडले.

यानंतर अवघ्या 21 मिनिटांमध्ये यांचा घटस्फोट झाला. हा सर्व घडलेला प्रकार न्यायाधीशांना सांगण्यात आला. मात्र, न्यायाधीशांनी आपला निर्णय मागे घेण्याल नकार दिला. याचा मोठा फटका मिस्टर आणि मिसेस विल्यम्सला बसला. हेच नाही तर या प्रकरणावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. याबद्दल वरदगच्या प्रतिनिधीने देखील मोठे भाष्य केले.

वरदगच्या प्रतिनिधीने सांगितले की, फर्मच्या वकिलाने एका जोडप्याच्या अंतिम घटस्फोटासाठी अर्ज करताना ऑनलाइन पोर्टलवर चूक केली आणि या जोडप्याचा घटस्फोट झाला. यानंतर न्यायाधीशांनी हा निर्णय बदण्यास नकार दिला. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. लोकही या प्रकारानंतर चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.