Bangladesh news : बांग्लादेशात कंटेनर डेपोत आग, 40 जणांचा मृत्यू, 450 हून अधिक जखमी

चाटगाव परिसरात सीताकुंड उपजिल्ह्यात कदमरासुलमध्ये असलेल्या बीएम कंटेनर डेपोत शनिवारी रात्री आग लागल्याने ही दुर्घटना घडाल्याची माहिती आहे.

Bangladesh news : बांग्लादेशात कंटेनर डेपोत आग, 40 जणांचा मृत्यू, 450 हून अधिक जखमी
बांग्लादेशात कंटेनर डेपोत आग, 22 जणांचा मृत्यू, 450 हून अधिक जखमी Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 2:45 PM

ढाका – दक्षिण पूर्व बांग्लादेशमध्ये  (Bangladesh) एका खासगी कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री स्फोट (blast) झाला. यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. चाटगाव परिसरात सीताकुंड (Seetakunt) उपजिल्ह्यात कदमरासुलमध्ये असलेल्या बीएम कंटेनर डेपोत शनिवारी रात्री आग लागल्याने ही दुर्घटना घडाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही अग्निशमन दलातील जवानांनाही यात प्राण गमवावे लागले आहेत. आत्तापर्यंत असे तीन अग्मिशमन दलातील जवान यात मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी आहे. शनिवारी रात्री चितगावच्या सीताकुंडा उपजिल्हामधील कदमरसूल भागात आगीची घटना घडली. तेथील बीएम कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

बांगलादेश अग्निशमन सेवेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेत त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......