
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर निवळली. पण काही तासात सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचं सांगितलं. पण भारतीय सैन्य दलाने सीमेवर कोणतीही फायरिंग झाली नसल्याचं सांगितलं आहे. तसेच श्रीनगरमध्ये स्फोट किंवा ब्लॅकआऊट नसल्याचं सांगितलं आहे.त्यामुळे जर खरंच ड्रोन दिसले तर मग पाकिस्तानी सैन्य आणि पंतप्रधाना शाहबाज शरीफ यांच्यात फिस्कटलं तर नाही ना.. कारण अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर शाहबाज सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे. पण त्यानंतर अशा काही हालचाली झाल्याने पाकिस्तानी सैन्याने बंड केलं की काय अशीही चर्चा रंगली आहे. यामुळे पाकिस्तानात सत्तापालट होण्याची शक्यता वाढली आहे.
पाकिस्तानमध्ये आजपासून 25 वर्षापूर्वी म्हणजेच 12 ऑक्टोबर 1999 साली सत्तापालट झाला होता. फेब्रुवारी 1997 मध्ये पाकिस्तानात निवडणुका झाल्या. तेव्हा नवाज शरीफ यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. त्यामुळे नवाज शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. या काळातच पाकिस्तानने अणुचाचण्या केल्या होत्या. त्या यशस्वी झाल्या. पण लष्करप्रमुख जनरल जहांगीर करामत यांच्याशी वाद झाल्याने नवाज शरीफ यांनी सूत्र परवेझ मुशर्रफ याच्या हाती दिली. पण मुशर्फ यांनी लष्करप्रमुख होताच रंग बदलला. तसेच पंतप्रधान नवाज शरीफ यांना न कळवताच कारगिलवर हल्ला केला.
जम्मूच्या पल्लनवाला सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले, “युद्धविरामाचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले!!!” ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, “ही युद्धबंदी नाही. श्रीनगरच्या मध्यभागी हवाई संरक्षण तुकड्यांनी गोळीबार सुरू केला आहे.” पण भारतीय सैन्य दलाने असा कोणत्याच हल्ला झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.