AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What the hell….सीजफायरचं उल्लंघन खरंच की..! काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भडकले

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं की नाही याबाबत संभ्रम आहे. सीमावर्ती भागात काही ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. एअर डिफेंस सिस्टमने ड्रोन हल्ले परतवून लावले. त्यामुळे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राग व्यक्त केला आहे.

What the hell....सीजफायरचं उल्लंघन खरंच की..! काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भडकले
ओमर अब्दुल्लाImage Credit source: TV9 Network
| Updated on: May 10, 2025 | 10:20 PM
Share

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर अवघ्या 4 तासात पाकिस्तानकडून काही ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती समोर येत आहे. पण प्रत्येक ड्रोन हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सैन्य दल सज्ज असल्याचं दिसून आलं. भ्याड हल्ल्याचा मागचा भूतकाळ पाहता न श्रीनगर अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा भागातही ब्लॅकआऊट केला आहे. दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सीजफायरचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं आणि आपला राग व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कुठेच सीजफायर दिसत नसल्याचं सांगितलं आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. पाकिस्तानची पाठीत खंजीर खुपसण्याची सवय सर्वांना माहिती आहे. यामुळे भारत प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे.

उमर अब्दुल्ला यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. उमर अब्दुल्लाने यावर पोस्ट करत लिहिलं की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये युद्धबंदी नाही. श्रीनगरच्या मध्यभागी हवाई संरक्षण युनिट सक्रिय करण्यात आले आहे.’ त्यानंतर सीजफायरचं काय झालं? स्फोटाचे आवाज ऐकून येत आहेत, असंही उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत सांगितलं. दरम्यान जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोट आणि गुरूदासपूरमध्येही वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती आहे.

दरम्यान, भारतीय सैन्य दलाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. सीमाभागात कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचं सांगितलं आहे. तसेच श्रीनगरमध्ये कोणताही धमाका झालेला नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणाव वाढवण्यासाठी अशी कृती करण्यात येत असावी असंही सांगण्यात येत आहे. मग ड्रोन कुठे आणि नेमकं कुठे दिसले? याबाबत संभ्रम आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.