Israel Palestine Crisis | पॅलेस्टाईचे कोणी केले कौतुक, इस्त्राईलला कोणाचे पाठबळ

Israel Palestine Crisis | इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धाने जगाची दोन भागात वाटणी झाली. जगातील या राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचे कौतुक केले आहे. हमास या दहशतवादी संघटनेसाठी ही राष्ट्र फंडिंग देतात हे उघड गुपीत आहे. तर इस्त्राईलच्या पाठीमागे हे देश उभे ठाकले आहेत.

Israel Palestine Crisis | पॅलेस्टाईचे कोणी केले कौतुक, इस्त्राईलला कोणाचे पाठबळ
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 2:18 PM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळपासून इस्त्राईलवर हल्लाबोल (Israel Palestine Crisis) चढवला. त्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून हा भाग अशांत आहे. या भागाला कित्येक वर्षांचा अशातंतेचा शाप आहे. या हल्ल्याने चवताळलेल्या इस्त्राईलने हमाससह पॅलेस्टाईनवर पलटवार केला आहे. या एकाच हल्ल्याचे निमित्त आणि संपूर्ण जग दोन तंबूत विभागल्या गेले. काही राष्ट्रांनी इस्त्राईलवर हल्ल्या केल्याने पॅलेस्टाईनचे कौतुक केले आहे तर दुसरा दादा गट इस्त्राईलच्या पाठीमागे उभा ठाकला आहे.

काय आहे वादाची किनार

इस्त्राईल हे ज्यू वंशीयांचे राष्ट्र अस्तित्वात येऊ नये यासाठी इस्लामिक देशांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. त्यातूनच इस्त्राईल-अरब यांच्यात 1967 मध्ये युद्ध झाले. त्यात इस्त्राईलने युद्ध जिंकले. हा भूभाग ज्यू लोकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानाराजीने हमास ही संघटना 1980 मध्ये स्थापन झाली. वेस्ट बँग आणि गाझा पट्टीतून ज्यू लोकांना हकलण्यासाठी हमास संघटना आकाराला आली. या संघटनेने दहशतवादी कारवाया सुरु केल्या. ज्यू लोकांना टार्गेट करायला सुरुवात झाली. दोन्ही भागात लष्करी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. भूभागासोबत या लढाईला धार्मिक आयाम आहेत.

हे सुद्धा वाचा

इस्लामिक देशांनी केले पॅलेस्टाईनचे कौतुक

इराण या देशाचा सर्वोच्च नेता अली खोमेनेई याच्या सल्लागाराने शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांचे कौतुक केले. पॅलेस्टाईन आणि जेरुसलेम हे जोपर्यंत स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत ते पॅलेस्टाईन आणि हमासच्या पाठीशी असतील, असा पाठिंबा इराणने दिला. सौदी अरबने हा हिंसाचार तात्काळ थांबविण्याचे आवाहन केले. इजिप्तने गंभीर परिणामांचा इशारा देत, ही हिंसा थांबविण्याचे आवाहन केले. कतार या देशाने या ताज्या घटनाक्रमासाठी इस्त्राईल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले आहे.

अमेरिका-युरोप इस्त्राईलच्या बाजूने

तर अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी दहशतवादाला थारा नकोच असा कडक इशारा देत इस्त्राईलच्या पाठीशी असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्र संघटनेचे शांतीदूत टोर वेन्नेसलँड यांनी दोन्ही देशांना माघार घेण्याचे आवाहन केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना हमास लक्ष करत असल्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याने चिंता व्यक्त केली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. इस्त्राईलच्या पाठीशी असल्याचे सांगितले. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंडच्या सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. इस्त्राईलच्या नागरिकांवरील हल्ल्याविरोधात एकजुटता दाखविण्याचे आवाहन केले.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.