AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 वर्षांपासून बेपत्ता होता तरुण; हिमनदी वितळताच हादरले कुटुंब, समोर आले ते सत्य

28 वर्षांपासून एक तरुण बेपत्ता होता. तो कुठे गेला, का गेला हा प्रश्न अनुत्तरीत होता. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. जून 1997 मध्ये तो गायब झाला होता. तेव्हापासून त्याचे कुटुंबीय तो एक ना एक दिवस सापडेल या आशेवर होते.

28 वर्षांपासून बेपत्ता होता तरुण; हिमनदी वितळताच हादरले कुटुंब, समोर आले ते सत्य
मग आले ते सत्य समोर
| Updated on: Aug 07, 2025 | 9:26 AM
Share

कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक घर सोडून गेली अथवा अचानक संकटात सापडून गायब झाली तर त्यांची अवस्था वाईट होते. जून 1997 मध्ये एका हिम वादळात पाकिस्तानमधील तरूण बेपत्ता झाला. 28 वर्षांपासून त्याचे कुटुंबीय त्याची वाट पाहत होते. त्याला शोधण्यासाठी त्यांजी जंग जंग पछाडले. अखेर त्याची माहिती मिळाली, पण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हिमनदी वितळल्यानंतर या तरुणाचा मृतदेह सापडला. बर्फात राहिल्यामुळे त्याचे शरीर गळाले नाही. त्याच्या शरीरावरील कपडे सुद्धा फाटलेले वा जीर्ण झालेले नाही. हिम वादळात तो हिमनदीत गाडला गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

गुराख्यांना सापडला मृतदेह

पाकिस्तानातील कोहिस्तान बागात लेडी व्हॅली आहे. येथे आता बर्फ वितळण्यास सुरूवात झाली आहे. बर्फ वितळल्याने अनेक बर्फाच्छादित भाग मोकळा झाला आहे. तिथे गुराख्यांना एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी लागलीच पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांना या तरुणाच्या खिशात एक ओळखपत्र मिळाले. त्याआधारे तो नसीरुद्दीन असल्याची माहिती समोर आली. पुढे तपासात तो 28 वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळले. जून 1997 मध्ये या भागात एक हिम वादळ आले होते. त्यापासून वाचण्यासाठी नसीरुद्दीन आश्रय शोधत असतानाच तो नदीच्या एका फटीत अडकला आणि त्यातच त्याचा मृत्यू ओढावला. हा भाग पुढे कित्येक वर्षे बर्फाच्छदित होता. तिथे नसीरुद्दीन चिरनीद्रेत होता. बर्फात राहिल्याने त्याचे शरीर खराब झाले नाही. त्याचे कपडे पण सुस्थितीत आढळले.

मुलं झाली मोठी

उमर खान या गुराख्याने सांगितले की, मृतदेह शाबूत होता. शरीर कुठेच खराब झालेले नव्हते. त्याचे कपडे ही सुरक्षित होते. बीबीसीला त्याने ही माहिती दिली. पोलिसांना त्याच्या खिशातून ओळखपत्र मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीरुद्दीन याला दोन मुलं आहेत. 28 वर्षांपूर्वीच त्यांच्या डोक्यावरील वडीलांचे छत्र हिरावल्या गेले. आता मुलं मोठी झाली. त्यांना या घटनेने धक्का बसला.

भावाने सांगितला त्या दिवशीचा घटनाक्रम

नसीरुद्दीन याचा भाऊ कथिरुद्दीन याने त्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला. जून 1997 मध्ये ते दोघे या खोऱ्यात पोहचले. दुपारपर्यंत त्यांनी फेरफटका मारला. मग कथिरुद्दीन हा जवळच्याच एका गुफेत गेला. परत आल्यावर त्याला भाऊ दिसला नाही. त्यावेळी हिम वादळ येऊन गेले होते. त्याने ही गोष्ट घरी सांगितली. स्थानिकांनी त्यावेळी शोध घेतला. पण नसीरुद्दीन दिसला नाही. पुढे तो परत येईल या आशेवर त्यांनी कित्येक वर्षे काढली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.