AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : वर्षानुवर्ष ज्या देशाने साथ दिली, त्याला एकाक्षणात अमेरिकेने दूर सारलं, चीनमधून निघताच ट्रम्प यांची धक्कादायक वक्तव्य

Donald Trump : अमेरिकेने वर्षानुवर्ष ज्यांच्याशी मैत्री जपली, ज्यांना साथ दिली, त्यांना ट्रम्प आपल्या बडबडीने क्षणात दूर करुन टाकतात. आता पुन्हा एकदा हेच दिसून आलय. डोनाल्ड ट्रम्प चीनमधून निघाल्यानंतर जी भिती व्यक्त होत होती, आता तेच घडतय.

Donald Trump : वर्षानुवर्ष ज्या देशाने साथ दिली, त्याला एकाक्षणात अमेरिकेने दूर सारलं, चीनमधून निघताच ट्रम्प यांची धक्कादायक वक्तव्य
Donald Trump
| Updated on: May 18, 2026 | 12:39 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी तैवान संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर तैवानने लगेच आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आणि संप्रभु देश आहोत, असं तैवानने म्हटलं आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात म्हटलय की, “रिपब्लिक ऑफ तैवान एक संप्रभु, स्वतंत्र आणि लोकशाहीवादी देश आहे. चीनला आमच्या संप्रभुतेंवर दावा करण्याचा काही अधिकार नाही” तैवानची इतकी सुस्पष्ट भूमिका ट्रम्प यांना कदाचित खुपू शकते. खरंतर अमेरिकेने नेहमीच तैवानच्या संप्रभुतचे समर्थन केलं आहे. त्यांना शस्त्रास्त्र पुरवली आहेत.

चीन तैवानच्या बाबतीत अनेकदा आक्रमकता दाखवतो. पण अजूनपर्यंत त्यांनी तैवानवर हल्ला करण्याची हिम्मत दाखवलेली नाही. अमेरिका नेहमीच ठामपणे तैवानच्या बाजूने उभी राहिली आहे. पण अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणाचं काहीही महत्व ठेवलेलं नाही.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेने वर्षानुवर्ष ज्यांच्याशी मैत्री जपली, ज्यांना साथ दिली, त्यांना ट्रम्प आपल्या बडबडीने क्षणात दूर करुन टाकतात. आता तैवानच्या बाबतीत सुद्धा हेच दिसून आलय. फॉक्स न्यूजशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या सुरक्षेबद्दल अमेरिकेच्या पूर्व राष्ट्रपतींच्या तुलनेत खूप सौम्य आणि वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी तैवान आणि अमेरिकेमध्ये असलेल्या अंतराचा हवाला दिला. “तुम्हाला माहिती असेल, आम्हाला एक युद्ध लढण्यासाठी 15,289 किलोमीटरचं अंतर कापून यावं लागेल. असं व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. तैवानने शांत रहावं आणि चीनने सुद्धा अशी माझी भूमिका आहे” असं डोनाल्ड ट्रम्प फॉक्स न्यूजशी बोलताना म्हणाले.

तैवानला काय इशारा दिला?

“अमेरिकेला नवीन युद्ध नकोय. आता जसं चाललय तसच चालू राहिलं, तर चीनला काही अडचण नाही” असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी तैवानला इशारा देताना म्हटलं की, “अमेरिका मागे आहे, म्हणून आम्ही स्वतंत्र होतो असं चालणार नाही” त्यावर तैवानने आम्ही संप्रभु देश आहोत असं म्हटलय. ट्रम्प यांच्या दौऱ्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, चीन-अमेरिका संबंधात तैवान महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे असं चीनच्या सरकारी मीडियाने म्हटलं आहे. ‘तैवान मुद्यावर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोणतही ठोस आश्वासन दिलेलं नाही’ असं ट्रम्प एअरफोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...