Tejas Crash : नमांश स्याल यांच्या मृत्यूनंतर US च्या F-16 टीमने आदर म्हणून घेतला मोठा निर्णय, पण दुबई एअर शो चे आयोजक चीड येण्यासारखं वागले
Tejas Fighter Plane Crash : दुबई एअर शो मध्ये शुक्रवारी तेजस विमानासोबत एक दुर्घटना घडली. स्वदेशी बनावटीचं तेजस कोसळलं. यामध्ये भारताने आपल्या वैमानिकाला गमावलं. या अपघातानंतर आता काही गोष्टी समोर आल्या आहेत. दुबई एअर शो च्या आयोजकांच वागणं संतापजनक होतं.

दुबई एअर शो मध्ये इंडियन एअर फोर्सच्या टीमला शुक्रवारी मोठा धक्का बसला. तेजस फायटर जेट चित्तथरारक हवाई कसरती सादर करताना कोसळलं. तेजसचा अपघात भारतासाठी डबल झटका ठरला. कारण भारताने या अपघातात आपले शूर वैमानिक नमांश स्याल यांना गमावलं, तर दुसऱ्याबाजूला तेजस हे स्वदेशी बनावटीच फायटर विमान आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला धक्का बसला. नमांश स्याल हे तेजस विमानाचं हवाई कौशल्य दाखवत होते. जमिनीवर एअर शो पाहण्यासाठी जमा झालेली गर्दी टाळ्यांचा कडकडाट करत होती. त्याचवेळी अचानक एकाएकी तेजस कोसळलं. जमिनीवर आगीचा एक मोठा लोळ उठला. डोळ्यांसमोर घडलेला हा अपघात पाहून उपस्थितांची गर्दी स्तब्ध झाली. टीव्हीवर या अपघाताची दृश्य पाहून अनेक जण हळहळले.
भारताने आपला शूर वैमानिक नमांशला या अपघातात गमावलं. दुबई एअर शो मध्ये घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच वाईट वाटलं. अमेरिकेहून आलेल्या त्यांच्या F-16 टीमने या अपघातानंतर एक मोठा निर्णय घेतला. F-16 टीमने नमांश स्याल यांच्याप्रती आदर म्हणून आपला परफॉर्मन्स रद्द केला. 21 नोव्हेंबरला F-16 ची टीम फायनल परफॉर्मन्स सादर करणार होती. अमेरिकन टीमच्या कमांडरने ही माहिती दिली.
View this post on Instagram
अमेरिकन वैमानिक का संतापला?
“नमांश स्याल यांचं तेजस विमानं कोसळल्यानंतर दुबई एअर शो च्या आयोजकांनी कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी हे खूप धक्कादायक होतं” असं US च्या F-16 टीमचे कमांडर मेजर टेलर म्हणाले. “अपघातानंतर दुबई वर्ल्ड सेंट्रलमध्ये सर्वकाही सामान्यपण सुरु होतं. हे शॉकिंग आहे” असं टेलर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. “स्पीकरवर रॉक अँड रोल म्युझिक सुरु होती. जमलेली गर्दी पुढच्या हवाई कसरतींच शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होती. माईकवरुन प्रायोजकांचे आभार मानण्याचा कार्यक्रम सुरु होता” यावर मेजर टेलर यांनी आपला संताप व्यक्त केला. नमांश स्याल हे कमी उंचीवर विमान असताना कसरती सादर करत होते. त्यावेळी हा अपघात घडला. एअर फोर्सने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून अपघाताचं कारण स्पष्ट होईल. नमांश स्याल यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी सुद्धा इंडियन एअर फोर्समध्ये अधिकारी आहे.
