India-Israel : भारताने मैत्री निभावली, PM मोदींच्या कृतीनंतर इस्रायलने लगेच मानले आभार
India-Israel : सध्याच्या जागतिक राजकारणात भारताचे दोन सच्चे मित्र आहेत, रशिया आणि इस्रायल. हे दोन्ही देश भारताच्या खूप जवळ आहेत. त्यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध आहेत. इस्रायलने नेहमीच भारताला साथ दिली आहे. कठीण काळात भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे. आता सुद्धा भारताने तेच केलय.

जेरुसलेम येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लगेच भारताचे आभार मानले. जेरुसलेम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाला. 12 जण जखमी झाले. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी एक्स अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये दहशतवाद एक अभिशाप असून सर्वांसाठी हा धोका असल्याच म्हटलं. इस्रायलसोबत उभं राहिल्याबद्दल आणि सर्वांसाठी धोका बनलेल्या दहशतवादाच्या अभिशापाविरोधात उभं राहिल्याबद्दल पीएम मोदी यांचे धन्यवाद असं नेतन्याहू यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जेरुसलेम येथे निरपराध नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी प्रार्थना केली.
या नितीवर भारत कायम
“जेरुसलेममध्ये निरपराध नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. आम्ही पीडितांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा अशी कामना करतो.भारत दहशतवादाचे सर्व प्रकार आणि अभिव्यक्तीची निंदा करतो. दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, या नितीवर भारत कायम आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलय.
कार्लो सबमशीन गनचा वापर
इस्रायली मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी जेरुसलेममध्ये बसमध्ये बसल्यानंतर दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला. यात पाच लोकांचा मृत्यू झाला. 12 जण जखमी झाले. जखमींमध्ये सात जणांची प्रकृती गंभीर आहे. पाच जण जखमी झाले आहेत. जेरुसलेमच्या रामोट जंक्शनवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी कार्लो सबमशीन गनचा वापर केला. ही मशीन गन कार्ल गुस्तावच्या नावाने सुद्धा ओळखली जाते.
Thank you Prime Minister @narendramodi for standing with Israel and against the scourge of terror that threatens us all. 🇮🇱🇮🇳 https://t.co/aeVC0hvG0Z
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) September 8, 2025
दहशतवादी पॅलेस्टाइनच्या पश्चिम किनाऱ्यावरचे
सुरक्षाअधिकाऱ्यांनुसार हे दहशतवादी पॅलेस्टाइनच्या पश्चिम किनाऱ्यावरचे आहेत. टाइम्स ऑफ इस्रायलनुसार, हे दोन्ही दहशतवादी रामल्लाह क्षेत्रातील गावातून निघाले होते. रिपोर्टनुसार, अशा बंदुका पॅलेस्टाइनच्या पश्चिमी किनाऱ्यावरच्या बेकायद कार्यशाळेत बनवल्या जातात. भूतकाळात अनेक पॅलेस्टिनी हल्ल्यांमध्ये या मशीन गनचा वापर झालाय. दोन्ही हल्लेखोरांना घटनास्थळीच संपवण्यात आलं.त्यांची ओळख अजून समजलेली नाही. विरोधी पक्षनेते यायर लापिड यांनी इस्रायली सुरक्षा पथकांना समर्थन दिलय.
