AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासह जगभरात हाहाकार! विमानसेवेवर मोठे संकट, सौर किरणोत्सर्गाचा एअरबसवर परिणाम, तब्बल इतकी उड्ढाणे रद्द…

युरोपियन एअरलाइन एअरबसने A320 विमानांसाठी तातडीने सॉफ्टवेअर अपडेटचे आदेश दिले आहेत. यामुळे जगभरातील विमानसेवेवर थेट परिणाम झाला आहे. अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत. भारतामध्येही याचा परिणाम बघायला मिळतोय.

भारतासह जगभरात हाहाकार! विमानसेवेवर मोठे संकट, सौर किरणोत्सर्गाचा एअरबसवर परिणाम, तब्बल इतकी उड्ढाणे रद्द...
European airline Airbus
| Updated on: Nov 29, 2025 | 9:54 AM
Share

जगभरातील विमानसेवा कोलंमडली आहे. एअरबस अ‍ॅडव्हायझरीने जगभरात चालवल्या जाणाऱ्या A320 विमानांसाठी तांत्रिक सूचना जारी केली आहे. अनेक विमान कंपन्यांनी या सूचनेनंतर थेट विमाने रद्द करण्याचा निर्णय घेतला. हेच नाही तर विमानसेवा उशीराने सुरू आहे. भारतीय विमानसेवेवरही याचा परिणाम दिसत आहे. एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही भारतीय विमान कंपन्या एअरबस A320 विमाने चालवतात, ज्यामुळे देशांतर्गत उड्डाणांवर परिणाम झाला. जगभरात कार्यरत असलेल्या 6000 हून अधिक A320 विमानांना अपग्रेडची आवश्यकता आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. जपानच्या एएनए एअरलाइन्सनेही 65 उड्डाणे रद्द केली आहेत. एअरबस अ‍ॅडव्हायझरीने दिलेल्या सूचनेनंतर सुरक्षा लक्षात घेता थेट विमाने रद्द करण्याचा निर्णय कंपनी घेत आहेत.

युरोपियन एअरलाइन एअरबसने सांगितले की, ते A320 विमानांसाठी तातडीने सॉफ्टवेअर अपडेटचे आदेश देत आहेत. सॉफ्टवेअर बदल कंपनीच्या सुमारे 6000 विमानांसाठी आहे. जगभरातील निम्म्याहून अधिक विमानांवर हे लागू होते.  एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, एअरबसने A320 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यातील एअरबस A320 मध्ये काही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर बदल आहेत.

ज्यामुळे ऑपरेशनल विलंब होऊ शकतो आणि उड्डाणांचा वेळ वाढू शकतो. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एअरबस A320 रीसेट होईपर्यंत सेवा खंडित होण्याची शक्यता आहे. आम्ही प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वी https://airindia.com/in/en/manage/flight-status.htlml येथे त्यांची उड्डाण माहिती तपासण्याची विनंती करतो, असे त्यांनी म्हटले.

इंडिगो कंपनीनेही अशाचप्रकारचा मेसेज आपल्या प्रवाशांसाठी टाकला आहे. एअरबसने एक निवेदन जारी करून म्हटले की, A320 वर सौर किरणोत्सर्गाचा परिणाम होत आहे. त्यामुळे उड्डाणादरम्यान तीव्र सौर किरणोत्सर्गामुळे डेटा शेअर करणे कठीण झाले आहे. संवेदनशील विमानांची ओळख पटवण्यात आली आहे आणि सर्व कंपन्यांना आवश्यक बदल करण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, या मेसेजमुळे आता जगभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.