AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazing Facts : हे काय नवल! असा देश जिथं एकाही घरात नाही पाण्याची टाकी; कारण वाचून लावाल डोक्याला हात!

या जगात असाच एक अजब देश आहे, जिथे तुम्हाला एकही पाण्याची टाकी दिसणार आहे. भारतात जवळजवळ प्रत्येक घराच्या छतावर पाण्याची टाकी असते. परंतु या देशात तुम्हाला एकाही घरावर पाण्याची टाकी दिसणार नाही.

Amazing Facts : हे काय नवल! असा देश जिथं एकाही घरात नाही पाण्याची टाकी; कारण वाचून लावाल डोक्याला हात!
no water tank in americaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 3:12 PM
Share

America Amazing Facts : या जगात असे काही देश आहेत, जिथे वेगवेगळे आणि अचंबित करणारे नियम आहेत. यातील काही नियम ऐकल्यास भारतीय लोकांना तर नवलच वाटते. काही देशात तर पायाभूत सुविधांची व्यवस्थाही अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असते. ही व्यवस्था समूजन घ्यायची म्हटलं तर आपल्याला बराच वेळ लागू शकतो. काही देशात तर अनेक शहरं ही नियोजनबद्ध पद्धतीने वसवण्यात आलेली आहेत. त्यामुळे तेथील प्रत्येक सुविधेच्या नियोजनामागे एक दूरगामी विचार असतो. दरम्यान, या जगात असाच एक अजब देश आहे, जिथे तुम्हाला एकही पाण्याची टाकी दिसणार आहे. भारतात जवळजवळ प्रत्येक घराच्या छतावर पाण्याची टाकी असते. परंतु या देशात तुम्हाला एकाही घरावर पाण्याची टाकी दिसणार नाही. त्यामागील नेमके कारण समजू घेऊ या…

अनेक मजली इमारतींवर सहज पोहोचते पाणी

अमेरिकेत 24 तास पाण्याचा पुरवठा सुरूच असतो. हे पाणी अतिशय उच्च दाबाने प्रत्येकाच्या घरात पोहोचवले जाते. अमेरिकेत प्रत्येक घरात प्रत्येक नळाला 24 तास पाणी असते. तेथील महापालिकेच्या मोठ्या वॉटर टँकमधून घराघरात येणाऱ्या पाण्याचे प्रेशर जास्त आणि स्टेबल असे असते. आकड्यातच सांगायचे झाल्यास हे प्रेशर 60 पीएसआय एवढे असते. त्यामुळे इमारतींच्या वरच्या मजल्यांवर पाणी पोहोचवण्यासाठी कुठल्याही मोटारची किंवा पंपची गरज नसते.

पाईपलाईन फुटण्याची असते शक्यता

इथे पूर्ण शहरासाठी मोठे सार्वजनिक वॉटर टँक असतात. याच वॉटर टँकच्या मदतीने घरांमध्ये पाणी पाठवले जाते. अमेरिकेत अनेक भागात हिवाळ्यात तापमान खूप कमी असते. त्यामुळे छतावर पाण्याची टाकी असेल तर त्यातील पाणी गोठून जाण्याची शक्यता असते. हे पाणी गोठले तर पाईपलाईन फुटू शकते. अमेरिकेत पाणी कधीच जात नाही. पाणी येण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते. 24 तास पाणी असते. त्यामुळेच येथे वॉटर टँक ठेवण्याची गरज नसते. पाण्याचा पुरवठा नियमित असल्याने तिथे पाणी साठवणुकीची गरज नसते. त्यामुळेदेखील तथे वॉटर टँक नसतात.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?