AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धात भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, इराण-अमेरिका मिळून पाकिस्तानात…होर्मुझचा संघर्ष संपणार?

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. इराणने आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे अमेरिकेसोबतचे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. असे असतानाच भारतासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

युद्धात भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, इराण-अमेरिका मिळून पाकिस्तानात...होर्मुझचा संघर्ष संपणार?
donald trump and mojtaba khamenei and shehbaz sharifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2026 | 6:29 PM
Share

America Israel Second Meeting : इराणी बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील, अशी भूमिका अमेरिकेने घेतल्यानंतर आता इराणनेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. इराण आता आपल्या मित्रांच्या जहाजांनाही सामुद्रधुनीतून जाऊ देत नाहीये. इराणने दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला. त्यानंतर आता चीनच्या जहाजांनाही त्यांनी परत पाठवले आहे. दरम्यान, आता दोन्ही देशांच्या या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. असे असतानाच आता मात्र एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा दुसरी बैठक होणार आहे.

पाकिस्तानमध्ये दुसऱ्या बैठकीचे आयोजन

या बैठकीबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सोमवारी इराण आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे पोहोचणार आहे. द्विपक्षीय संघर्ष समाप्त करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. चर्चेची ही दुसरी फेरी असेल, असे ट्रम्प म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या पुढाकाराने ही बैठक होत असल्याचेही ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याचेही कौतुक केले आहे.

भारतीय जहाजांवरही केला होता गोळीबार

या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेकडून कोण-कोण इस्लामाबादमध्ये जाणार, याबाबत मात्र अमेरिकेने काहीही सांगितलेले नाही. त्याआधी इराणने 18 एप्रिल रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत गोळीबार केला होता. यात भारताच्या दोन जाहाजांनाही इराणने लक्ष्य केलं होतं. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. इराणच्या या भूमिकेनंतर अमेरिकेने मात्र आक्रमक पवित्रा धारण केला. इराण शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. असे वारंवार केले जात असेल तर आम्ही इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करू, असा इशारा इराणने दिला होता.

पाकिस्तानकडून केली जात आहे मध्यस्थी

दरम्यान, या दुसऱ्या बैठकीसाठीची तयारी केली जात आहे. सर्व तयारी ही शेवटच्या टप्प्यात आहे. या बैठकीआधी पाकिस्तानने इराणमध्ये जाऊन इराणी सरकारशी चर्चा केली होती. इराणचा आक्रमक पवित्रा पाहता ही दुसरी बैठक होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता ही दुसरी बैठक होणार असल्याने लवकरच युद्ध समाप्त होण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...