अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलं, आता भारतापुढे तेलाचं महासंकट? जगाचीही चिंता वाढली!

आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केलं आहे. दरम्यान, आता हे युद्ध पुन्हा एकदा भडकल्याने जगाची झोप उडाली आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच इंधनाचा भावही वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलं, आता भारतापुढे तेलाचं महासंकट? जगाचीही चिंता वाढली!
america and iran war crude oil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 7:42 PM

America And Iran War : मध्य पूर्वेत पुन्हा एका युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धबंदीचा करार संपवला आहे. हा करार संपवल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एकूण तीन जहाजांना लक्ष्य केलं. या हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या हल्ल्यांना इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केलं आहे. दरम्यान, आता हे युद्ध पुन्हा एकदा भडकल्याने जगाची झोप उडाली आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच इंधनाचा भावही वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडतंय?

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तीन मोठ्या जहाजांवर हल्ले केले. त्याननंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणची हवाई रक्षा प्रणाली, रडार यंत्रणा, अँटी शीप मिसाईल, ड्रोन लॉन्च साईटला लक्ष्य केलं आहे. इराणमधील बुशहर या प्रमुख बंदराच्या शहरातही अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. होर्मुझमधील जहाजांवर हल्ला केल्यानंतर शिक्षा म्हणून आम्ही ही कारवाई केली आहे, असं अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं आहे. याआधीच्या हल्ल्यांच्या तुलनेत आताचे हल्ले हे चार ते पाच पट संहारक होते, असे बोलले जात आहे.

तेलाचे संकट वाढणार का?

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा युद्ध सुरू झाल्याने जगाची चिंता वाढली आहे. संपूर्ण जगाला लागणारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूपैकी 20 टक्के साठा हा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पाठवला जातो. परंतु आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतच तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होतो की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांची कमतरता भासल्यात भारतासह इतरही काही देशांत इंधनाचा भाव वाढू शकतो. त्याचा परिणाम म्हणून सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसू शकते. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us