Israel-Hamas War | ‘हा’ देश हमासला इस्रायली बंधकांना सोडण्यासाठी भाग पाडणार ?
Israel-Hamas War | इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर लढाई सुरु आहे. महिन्याभरापेक्षा जास्त काळ झाला आहे. अजूनही हे युद्ध थांबलेलं नाहीय. इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. या नागरिकांची सुटका होण्याचे संकेत मिळत आहेत.

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि कतारचे प्रमुख अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये हमासच्या ताब्यात असलेले इस्रायली नागरिक आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांसह अन्य नागरिकांना बंधक बनवून ठेवलय. त्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी निषेध केल्याच व्हाइट हाऊसने म्हटलय. हमासने बंधक बनवलेल्या मुलांमध्ये 3 वर्षांचा एक लहान मुलगाही आहे. त्याच्या आई-वडिलांची हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हत्या केली होती.
वेळ न दवडता बंधकाची सुटका करावी यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि शेख तमीम बिन हमद या दोघांच एकमत झाल्याच व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं. कतारमध्ये हमासचे अनेक नेते वास्तव्याला आहेत. बंधकांच्या सुटकेसाठी हमास आणि इस्रायली अधिकाऱ्यांमध्ये कतार मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. बंधकांच्या सुटकेसाठी इस्रायल, कतार, इजिप्त आणि अमेरिकेत चर्चा सुरु होती. पण अजून असं झालेलं नाही. अमेरिकन नागरिकांसह सर्व बंधकांच्या सुटकेच आमचं लक्ष्य आहे. 9 अमेरिकन नागरिक बेपत्ता आहेत. ते जिवंत आहेत की, मृत याबद्दल माहिती नाहीय. सर्व बंधकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत.
अमेरिकेने मागणी फेटाळली
अरब नेते आणि अन्य देशांनी इस्रायलने गाजा पट्टीवर हल्ले थांबवावेत असा आग्रह केला होता. पण अमेरिकेने ही मागणी फेटाळून लावली. युद्ध विरामाबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही असं व्हाइट हाऊसने म्हटलय. दोन्ही नेत्यांनी निरपराध नागरिकांच रक्षण आणि गाजा पट्टीत मानवी सहाय्यता वाढवण्यावर भर दिलाय. हमासच्या हल्ल्यात 1400 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. 200 नागरिकांना बंधक बनवलं. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धा एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय. तेव्हापासून हमासने आतापर्यंत फक्त चार बंधकांची सुटका केलीय.
