AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Strikes On Nuclear Sites Of Iran : इराणवर 30000 हजार किलोचा बॉम्ब टाकण्यासाठी जे B-2 बॉम्बर वापरलं, ते किती घातक? जाणून घ्या

US Strikes On Nuclear Sites Of Iran : अमेरिकेने इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. त्यासाठी 13 हजार किलोपेक्षा जास्त क्षमतेचा बॉम्ब वापरण्यात आला. इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेने जे B-2 स्पिरिट बॉम्बर विमान वापरलं, ते किती घातक आहे? या विमानाच वैशिष्टय काय? त्याची किंमत किती? अमेरिकेने आतापर्यंत किती मिशन्समध्ये हे विमान वापरलय? त्या बद्दल जाणून घ्या.

US Strikes On Nuclear Sites Of Iran : इराणवर 30000 हजार किलोचा बॉम्ब टाकण्यासाठी जे B-2 बॉम्बर वापरलं, ते किती घातक? जाणून घ्या
B 2 Spirit bomberImage Credit source: Stocktrek/DigitalVision/Getty Images
| Updated on: Jun 22, 2025 | 10:19 AM
Share

इस्रायल-इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि एस्फाहान या तीन अणू प्रकल्पांवर शक्तीशाली बंकर बस्टर बॉम्ब टाकले आहेत. या बॉम्बला GBU-57 सुद्धा म्हटलं जातं. GBU-57 हा 20 फूट लांब 13,600 किलो वजनाचा बॉम्ब आहे. हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशाकडे इतकं शक्तीशाली विमान आणि GBU-57 हा बॉम्ब नाहीय. हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इराणचे फोर्डो आणि नतांज हे असे दोन अण्विक तळ आहेत, जे भूगर्भात जमिनीखाली उभारण्यात आले आहेत. मिसाइल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ नष्ट होऊ शकत नाहीत. त्यासाठी GBU-57 सारख्याच बॉम्बची आवश्यकता आहे. 13,600 किलो वजनाचा एक बॉम्ब आहे, तीन प्रकल्प आहेत, त्यामुळे अमेरिकेने असे किती बॉम्ब वापरलेत हे अजून स्पष्ट नाहीय.

अमेरिकेने हे बॉम्ब टाकण्यासाठी जे B-2 स्पिरिट बॉम्बर विमान वापरलं ते किती घातक आहे, ते समजून घ्या. B-2 स्पिरिट बॉम्बरने शनिवार-रविवारच्या मध्यरात्री इराणच्या तीन अणवस्त्र ठिकाणांवनर बॉम्बहल्ला केला. इराणने अणूबॉम्ब बनवण्यासाठी बनवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केलं. फॉर्डोचा प्लान्ट म्हणजे अभेद्य किल्ला होता. इराणच्या न्यूक्लियर कार्यक्रमाचं याला क्राऊन ज्वेल म्हटलं जायचं. फॉर्डो आता इतिहास बनलं. ट्रम्प यांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याच म्हटलं आहे.

B-2 स्पिरिटची खासियत काय?

अमेरिकेने या ऑपरेशनसाठी आपल्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक B-2 स्पिरिट बॉम्बर विमान वापरलं. अमेरिका अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत या विमानाचा वापर करते. सर्वात मोठ्या वजनाचा बॉम्ब वाहून नेण्यासह B-2 स्पिरिटची आणखी एक खासियत म्हणजे एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देण्याची क्षमता. शत्रूच्या प्रदेशात बॉम्बवर्षाव करण्यासह जमिनीखाली खोलवर असलेलं लक्ष्य उद्धवस्त करणं हे B-2 स्पिरिटच आणखी एक वैशिष्ट्य.

या एका विमानाची किंमत किती?

शीत युद्धाच्याकाळात नॉरथ्रोप ग्रुममॅन यांनी या B-2 स्पिरिट विमानाची निर्मिती केली. शत्रूच्या प्रदेशात मोठा बॉम्बवर्षाव आणि खोलवर हल्ले करण्यासाठी या विमानाची निर्मिती करण्यात आली. सोवियत युनियन कोसळल्यानंतर आतापर्यंत फक्त 21 B-2 स्पिरिट विमानं बनवण्यात आली आहेत. रॉयटर्सनुसार या एका विमानाची किंमत 2.1 अब्ज डॉलर्स आहे.

B 2 चालवायला किती वैमानिकांची गरज लागते?

वटवाघूळ जसं दिसतं, तशी या विमानाची डिझाइन आहे. रडारला शोषून घेणारे घटक या विमानामध्ये आहेत, त्यामुळे रडारवर हे विमान दिसत नाही. हवेत उड्डाण करताना हे विमान एका छोट्या पक्ष्याप्रमाणे दिसतं. हे विमान चालवण्यासाठी दोन वैमानिकांची गरज लागते. B-2 मध्ये बऱ्याच यंत्रणा स्वयंचलित आहेत.

अमेरिकेने आतापर्यंत किती देशात हे विमान वापरलय?

B-2 इंधन भरल्याशिवाय 11 हजार किलोमीटरपर्यंत उड्डाण करु शकतात. त्यामुळे दूरवरच्या मोठ्या मिशनसाठी हे विमान अत्यंत उपयुक्त आहे. अफगाणिस्तान, लिबिया त्यानंतर आता इराणमध्ये अमेरिकेने हे विमान वापरलय.

किती हजार किलोची शस्त्र वाहून नेता येतात?

40 हजार पाऊंड म्हणजे 18,144 किलोपर्यंत पेलोड (शस्त्रास्त्र) वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. अणवस्त्र हल्ला सुद्धा या विमानाद्वारे करता येतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.