विनामास्क प्रचार महागात, शपथेपूर्वीच नवनियुक्त खासदाराचा कोरोनाने मृत्यू

विनामास्क प्रचार महागात, शपथेपूर्वीच नवनियुक्त खासदाराचा कोरोनाने मृत्यू
निवडणुकीदरम्यान ल्यूक लेटलो यांचा कुटुंबासोबत

रिपब्लिक पक्षाचे खासदार ल्यूक लेटलो यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ( US Congressman Luke Letlow died due to corona virus)

Yuvraj Jadhav

|

Dec 30, 2020 | 4:42 PM

न्यूयॉर्क: अमेरिकेतील(US) कोरोनाबाधित (Corona) रुग्णसंख्येचा आकडा दोन कोटींच्या जवळपास पोहोचलाय. तर, 3 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या रिपब्लिक पक्षाचे नवनिर्वाचित खासदार ल्यूक लेटलो (Luke Letlow) यांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ल्यूक लेटलो यांचं वय 41 वर्ष होते. ते लुईसियानामधून विजयी झाले होते. लुईसियानातील एका जिल्ह्यातून विजयी झाले होते. येत्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार होता. (American Congressman Luke Letlow died due to corona virus)

लुईसियानामधील गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ल्यूक लेटलो यांच्या कुटुंबाविषयी सद्भावना व्यक्त करत असल्याचं जॉन एडवर्ड यांनी म्हटलं आहे. ल्यूक लेटलो यांच्या पश्चात त्यांची पत्नी जुलिया बार्नहिल आणि दोन मुलं आहेत.

लूईसियानाच्या गव्हर्नरचे ट्विट

18 डिसेंबरला कोरोनाबाधित

ल्यूक लेटलो यांनी ट्विटरवरुन कोरोनाबाधित झाल्याची माहिती 18 डिसेंबरला दिली होती. त्यानंतर घरीच क्वारंटाईन झाले होते. मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर 23 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होते. अखेर कोरोनामुळे ल्यूक लेटलो यांना जीव गमवावा लागला.

ल्यूक लेटलोंचे ट्विट

प्रचारादरम्यान विनामास्क

नुकत्याच झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीत ल्यूक लेटलो बऱ्याच वेळा विनामास्क आढळून आले होते. मतदानाला जाताना देखील ते विनामास्क होते. त्यानंतरच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विना मास्क आढळले होते. कोरोना विषाणू रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधाना देखील त्यांनी विरोध केला होता. निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचते, असं ल्यूक लेटलो यांचे मत होते.

दरम्यान, 6 जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणारआहे. तर, 20 जानेवारीला जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा कॅपिटल हिल्स बाहेर शपथविधी होणार आहे. कोरोनामुळे यावेळचा शपथविधी साधेपणांनं होणार आहे.

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलनावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोला, भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांचे पोम्पिओंना पत्र

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ धोरणावर जो बायडन यांचा यूटर्न म्हणाले….

(American Congressman Luke Letlow died due to corona virus)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें