
Donald Trump Pakistan : चोहोबाजूंनी आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानला मोठी मदत हवी आहे. चीनच्या भरवशावर राहून चालणार नाही हे धूर्त पाकी नेत्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ट्रम्प हेच खरे नोबेल शांतता पुरस्काराचे हकदार असल्याची पावती पाकिस्तानने दिली आहे. पाकड्यांनी या पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव सुचवले आहे. दहशतवाद्यांना मांडीवर घेणार देश शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे नाव सुचवतो हेच मोठे हास्यास्पद आहे. पण हा पाकिस्तानसह ट्रम्प यांच्या कुटनीतीचा भाग असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञ करत आहेत.
ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या
पाकिस्तान सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले आहे. तसा औपचारिक प्रस्तावच पाक सरकारने पाठवला आहे. सौदी अरबच्या विनंतीवरून भारत-पाकमधील तणाव लागलीच निवळल्याचा दावा पाकिस्तान सरकार करत होते. पण एकाच दिवसात त्यांनी टांगा पलटी केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ताज्या तणावात ट्रम्प यांनी मोठी भूमिका निभावली. त्यांनी कुटनीतीचा वापर करत हस्तक्षेप केला. त्यामुळे युद्धविराम झाल्याचा दावा पाकड्यांनी केला आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांनी ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले. या पुरस्काराचे ते हकदार असल्याचे पाकिस्तान सरकार म्हणत आहे.
लष्कर प्रमुख असीम मुनीर याला व्हाईट हाऊसमध्ये बोलावण्यात आले होते. त्यामागील कुटनीती आता समोर येत आहे. पाकिस्तानला अमेरिकेकडून काही सवलती आणि व्यापारी सूट पदरात पाडून घेण्यासाठीच असा प्रस्ताव पाठवावा लागत असल्याची टीका पाकिस्तानातूनच होत आहे. भीकेचा कटोरा घेऊन अजून किती दिवस अमेरिकेच्या दारात पडून राहणार असा सवाल पाकिस्तानमधील बुद्धिवादी वर्ग विचारत आहे.
मला शांतता पुरस्कार नाही मिळणार
तर दुसरीकडे नोबेल शांतता पुरस्काराकडे डोळे लावून बसलेल्या ट्रम्प यांचा लटका राग सुद्धा समोर आला आहे. त्यांना हा पुरस्कार तर हवाच आहे. पण कोणी नावाची शिफारस करत नसल्याने ते खट्टू झाले आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रिपब्लिक ऑफ रवांडा या दोन देशात शांतता घडवून आणल्याचे श्रेय सुद्धा त्यांनी लाटले. आपण दोन्ही देशात शांतता प्रस्थापित केली. ही जगासाठी, अफ्रिकेसाठी चांगली वार्ता असल्याचे ते म्हणाले. पण मला यासाठी शांतता पुरस्कार मिळणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये यशस्वी मध्यस्थी केली. सर्बिया आणि कोसोवा यांच्यात शांतता घडवून आणली. इजिप्त आणि इथियोपिया या दोन देशात शांतता घडवून आणली. पण आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नसल्याची खंत ट्रम्प यांनी बोलून दाखवली.