AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..

Oil Crisis : भारताकडे स्वत:च तेल फार नाहीय. पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देशासाठी तेलासाठी भारताकडे येतील अशी स्थिती आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमुळे पुन्हा एकदा जागतिक तेल संकटाची भिती निर्माण झाली आहे.

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..
Oil
| Updated on: Jul 15, 2026 | 3:10 PM
Share

इराण युद्ध सुरु झाल्यानंतर अर्थतज्ज्ञांना कच्चा तेलाच्या पुरवठ्याची चिंता होती. आता अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये नाकेबंदी लागू झाली आहे. तेलाच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. दरम्यान आता अजून एक मोठं संकट निर्माण झालं आहे. पेट्रोल-डिझेल बनवण्याची क्षमता घटणं हे एक नवीन टेन्शन आहे. फारसच्या खाडीतून कोट्यवधी बॅरल तेल बाहेर येत आहे. पण ते काही उपयोगाचं नाहीय. कच्चं तेल पेट्रोल, डिझेल, जेट फ्यूल मध्ये बदलण्यासाठी रिफायरनरीजची आवश्यकता आहे. सध्या जगाची रिफायनिंग क्षमता वाईट पद्धतीने प्रभावित झाली आहे. इराणने मिडिल ईस्टच्या रिफायनरीजवर अनेक हल्ले केले आहेत. युक्रेनने रशियाचे ऊर्जा तळ ड्रोन हल्ल्यात उद्धवस्त केलेत. त्यामुळे तेल रिफायनिंगसाठी जगातील अनेक देश भारताकडे येऊ शकतात.

तापमानामुळे रिफायनरीजची कूलिंग सिस्टिम फेल झाली आहे. जागतिक रिफायनिंग साखळीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. जेपी मॉर्गनच्या डेटानुसार जगभरातील रिफायनरीज युद्ध सुरु होण्याआधीच्या तुलनेत दरदिवशी 84 लाख बॅरल कमी कच्चा तेलावर प्रोसेस करत आहेत. म्हणजे जगभरातील इंधन उत्पादन 10 टक्क्याने पडलं आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक, चौथा मोठा रिफायनर आणि पेट्रोलियम उत्पादनाचा पाचवा मोठा निर्यातक आहे.

भारतात तेलसाठे कुठे आहेत?

भारताकडे कच्चा तेलाचे मर्यादीत साठे आहेत. त्यातून वर्षाला 28 मिलियन मेट्रिक टन तेल निघतं. हे साठे आसाम, मुंबई हाय आणि राजस्थानमध्ये आहेत. भारतातील तेल रिफायनरीज इतक्या मोठ्या आहेत की, ते परदेशातून तेल मागवून वर्षाला 258 MMTPA पेक्षा अधिक तेलावर प्रोसेस करतात. भारतात एकूण 23 रिफायनरीज आहेत. यात 18 सार्वजनिक क्षेत्र आणि तीन खासगी क्षेत्रातील आहेत.

भारतात डिझेलचा वापर किती?

भारतात डीझेलचा वापर सर्वात जास्त होतो. देशातल्या एकूण तेल वापरात (243.2 MMT) डिझेलचा वाटा (94.7 MMT)39 टक्के आहे. जवळपास 17.5% हिस्सा पेट्रोलचा (42.6 MMT) आहे. देशभरातील 1,03,023 पेक्षा अधिक पेट्रोल पंप ही विशाल मागणी पूर्ण करतात. जामनगर गुजरात येथे रिलायंस इंडस्ट्रीजची रिफायनरी जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे.

भारताची रिफायनिंग क्षमता किती?

अमेरिका आणि युरोपमध्ये जुन्या रिफायनरीज बंद होत आहेत. तेच भारताने आपली रिफायनिंग क्षमता वाढवली आहे. भारत (243 MMT) घरगुती इंधन वापरतो. त्यापेक्षा जास्त (258+ MMT) रिफायनिंग क्षमता आहे. भारताच्या रिफाइंड उत्पादनांनी निर्यातीचा जागतिक बाजार संभाळला आहे.

कच्चा तेलाच्या आयातीसाठी भारताने आखाती देशांवरील अवलंबित्व कमी केलं आहे. भारत आता 27 ऐवजी 41 देशांकडून तेल मागवतो. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करुन भारताने आपल्या अत्याधुनिक रिफायनरीजमध्ये प्रोसेस केलं. त्या रणनितीने अब्जावधी डॉलर्स वाचवले. देशांतर्गत बाजारातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप