ऑस्ट्रेलियात कोरोनाचं थैमान, गृहमंत्र्यांसह 156 जणांना संसर्ग

कोरोनाने ऑस्ट्रेलियात थैमान घातलं आहे. तेथे आतापर्यंत एकूण 156 जणांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infection to Australia home minister). विशेष म्हणजे त्यात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डुटोन यांचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियात कोरोनाचं थैमान, गृहमंत्र्यांसह 156 जणांना संसर्ग
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 11:18 AM

कॅनबेरा : कोरोनाने ऑस्ट्रेलियात थैमान घातलं आहे. तेथे आतापर्यंत एकूण 156 जणांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infection to Australia home minister). विशेष म्हणजे त्यात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डुटोन यांचाही समावेश आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे डुटोन यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट होण्याआधी (6 मार्च) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हान्का ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यामुळे इव्हान्का ट्रम्प यांच्यावरही कोरोनाचा धोका असल्याची चर्चा सुरु आहे.

पीटर डुटोन यांनी ट्विटमध्ये म्हटले, “मी सकाळी उठलो तेव्हा मला ताप होता आणि घसा देखील दुखत होता. मी तात्काळ याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाला दिली. आता मी रुग्णालयात असून अगदी बरा आहे. यापुढील तब्येतीची माहितीही देत राहिल.” कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येकाला रुग्णालयात दाखल करणे ही ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाचं धोरण आहे. मीही त्यांच्या सुचनांचं पालन करत आहे, असंही डुटोन यांनी नमूद केलं.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कोरोनाचे 156 रुग्ण आढळले आहेत. यात ऑस्ट्रेलियात असलेल्या अमेरिकन अॅक्टर टॉम हँक्स (Tom Hanks) यांचा आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांचाही समावेश आहे. हँक्स त्यांच्या पत्नीसह एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियात आले होते.

ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी का घेतली जात नाही, असंही डुटोन यांना विचारण्यात आलं. त्यावर देशात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी घेणं शक्य नसल्याचं डोटोन यांनी सांगितलं.

कोरोना संसर्गाआधी डुटोन यांची इव्हान्का ट्रम्प यांच्याशी भेट

पीटर डुटोन यांनी कोरोनाचा संसर्ग होण्याआधी काही दिवस वॉशिंग्टन डीसी येथे बाल लैंगिक अत्याचाराच्या एका कार्यक्रमाला भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत इव्हान्का ट्रम्प आणि इतरांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे पीटर डुटोन यांनी भेट घेतलेल्या संबंधित व्यक्तींवरही कोरोनाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांच्याही कोरोना चाचणी घेतल्या जात आहेत.

संबंधित बातम्या:

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Corona infection to Australia home minister

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.