AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या देश सोडून पळण्यावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांचं मोठं वक्तव्य

Sheikh Hasina : शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागलं आहे. सध्या त्या भारतात आश्रयाला आहेत. यावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. तस्लिमा नसरीन यांनी शेख हसीना यांना काही गोष्टींची आठवण करुन दिली. रविवारी सुरक्षा यंत्रणांबरोबर झालेल्या हिंसाचारात 100 लोकांचा मृत्यू झाला.

Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या देश सोडून पळण्यावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांचं मोठं वक्तव्य
taslima nasreen - sheikh hasinaImage Credit source: instagram
| Updated on: Aug 06, 2024 | 10:42 AM
Share

भारताच्या शेजारच्या देशात म्हणजे बांग्लादेशात मोठा असंतोष आहे. जनता रस्त्यावर उतरली आहे. तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली की, काल शेख हसीना यांना बांग्लादेशच्या पंतप्रधान राजीनामा देऊन देशाबाहेर पळावं लागलं. बांग्लादेशात जे अराजक सुरु आहे, त्यावरुन आता प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी टिप्पणी केली आहे. सोशल मीडियावर तस्लिमा नसरीन यांनी पोस्ट केली आहे. “1999 साली बिछान्याला खिळलेल्या माझ्या आईला पाहण्यासाठी मी बांग्लादेशात गेले, तेव्हा शेख हसीना यांना कट्टरतावाद्यांना खुश करण्यासाठी मला देशाबाहेर काढलं. आता विद्यार्थी चळवळीचा भाग असलेल्या त्याच कट्टरतावाद्यांमुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला आहे” असं तस्लिमा नसरीन यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

शेख हसीना यांना देश सोडण्यासाठी अत्यंत कमी अवधी देण्यात आला होता. त्यांनी सुरक्षेसाठी तात्काळ भारतात प्रयाण केलं. सध्या त्या उत्तर प्रदेशातील हिंडन एअर बेसवरील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला आहेत. यूकेमध्ये त्या आश्रय घेऊ शकतात, अशी शक्यता आहे. “शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. या परिस्थितीसाठी त्या स्वत: जबाबदार आहेत. त्यांनी कट्टरतावाद्यांना वाढू दिलं. त्यांनी आपल्या लोकांना भ्रष्टाचार करु दिला. आता बांग्लादेशचा पाकिस्तान होऊ नये. लष्कराने राज्य करु नये. राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही आणावी” असं तस्लिमा नसरीन यांनी म्हटलं आहे.

तस्लिमा नसरीन यांना का बांग्लादेश सोडावा लागला?

तस्लिमा नसरीन यांनी ‘लज्जा’ नावाच एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकावरुन त्यांना कट्टरतवाद्यांकडून धमक्या मिळाल्या. याची परिणीत अखेर 1994 साली त्यांच्या देश सोडण्यात झाली. तस्लिमा नसरीन तेव्हापासून विजनवासात आहेत. रविवारी सुरक्षा यंत्रणांबरोबर झालेल्या हिंसाचारात 100 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानी धडकले. तिथे तोडफोड केली. लष्कर प्रमुख जनरल वाकर-उझ-झमन यांनी अंतरिम सरकारची स्थापना केली आहे.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.