AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणकडून आता आर-पारची लढाई? ‘माझा मृत्यू झाला तर..’, खामेनेंईकडून उत्तराधिकार्‍याच्या नावाची घोषणा

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे मध्यपूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी आता समोर आली आहे.

मोठी बातमी! इराणकडून आता आर-पारची लढाई? 'माझा मृत्यू झाला तर..', खामेनेंईकडून उत्तराधिकार्‍याच्या नावाची घोषणा
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 21, 2025 | 5:50 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे मध्यपूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे, इस्रायलकडून इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे, यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई हे इस्रायलच्या टार्गेटवर असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. दुसरीकडे अमेरिकेकडून देखील इराणला वारंवार धमकावलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला मृत्यू झाला तर त्यानंतर इराणचा सर्वोच्च नेता कोण असणार? यासाठी खामेनेई यांनी तीन नावांची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे खामेनेई यांनी ज्या तीन नावांची घोषणा केली आहे, त्यामध्ये त्यांच्या मुलाचं नाव नाहीये. खामेनेई यांचं वय 86 वर्ष आहे. त्यांची आरोग्याची स्थिती लक्षात घेता त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार? याची चर्चा खूप आधीपासूनच सुरू आहे. मात्र आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर खामेनेई यांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदासाठी तीन मौलवींची नावं सुचवली आहेत. तसेच त्यांनी आपल्या सैन्य विभागात देखील काही नव्य नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

इराणचं प्रचंड नुकसान

इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये इस्रायलनं इराणवर अनेक मोठे हल्ले केले. यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, मात्र इराण देखील मागे हटण्यास तयार नाहीये, इराणकडून देखील इस्रयलवर हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेच्या दबावानंतर देखील इराणचं युद्ध सुरूच आहे. आता खामेनेई यांच्याकडून आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे, मिळत असेल्या माहितीनुसार खामेनेईल यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदासाठी तीन धर्मगुरूंची नावं सूचवली आहेत. त्यामुळे आता इराण आर-पारची लढाई करण्याच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे इराणला आंतरराष्ट्रीय स्थरावरून पाठिंबा वाढत असल्याचं दिसून येत आहे, चीनने इस्रायलकडून सुरू असलेल्या युद्ध कारवाईचा निषेध करत इराणचं समर्थन केलं आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.