US B 21 Project : अमेरिकेचा सिक्रेट B-21 प्रोजेक्ट लीक, रणांगणात शत्रूवर भारी पडणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये असं काय खास?
US B 21 Project : अमेरिकेच्या B-21 या सिक्रेट प्रोजेक्टबद्दलची माहिती लीक झाली आहे. अमेरिकेच्या या प्रोजेक्टमध्ये असं काय खास आहे?. ओपन सोर्स इंटेलिजेंस (OSINT) आणि सॅटेलाइट डेटाने गुपचूप सुरु असलेल्या या गोपनीय प्रोजेक्टची पोल खोल झाली.

अलीकडेच अमेरिकेने इराणचे अण्विक तळ फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर हल्ले केले. B-2 विमानातून बंकर बस्टर बॉम्ब आणि टॉमहॉक मिसाइल्सनी मोठा विद्धवंस घडवून आणला. पण आता यापेक्षा पण खतरनाक शस्त्र येणार आहे. B-21 रेडर. हे विमान असं बनवण्यात आलं आहे की, ते दिसणारच नाही. B-21 रेडर हा अमेरिकेचा गोपनीय डिफेन्स प्रोजेक्ट आहे. पण ओपन सोर्स इंटेलिजेंस (OSINT) आणि सॅटेलाइट डेटाने गुपचूप सुरु असलेल्या या गोपनीय प्रोजेक्टची पोल खोल केली आहे. कॅलिफोर्नियाच्या एडवर्ड्स एअरफोर्स बेसवर नुकतीच B-21 ची अनेक टेस्ट उड्डाण पहायला मिळाली. रडारवरुन गायब होण्याची क्षमता तपासण्यासाठी B-21 ची फ्लाइट टेस्टिंग झाल्याच जाणकार सांगतात. म्हणजे हे बॉम्बर उड्डाण करत असताना रडारला त्या बद्दल काही थांगपत्ताच लागत नाही.
B-2 स्पिरिट आणि B-21 रेडर ही दोन्ही स्टेल्थ बॉम्बर विमानं आहेत. पण B-21 हे पुढच्या पिढीचं विमान असून त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. भविष्याच्या युद्धासाठी हे विमान बनवण्यात आलं आहे. B-2 हे रडारपासून वाचण्यासाठी सक्षम होतं. B-21 मध्ये त्यापेक्षा अधिक अत्याधुनिक लेटेस्ट तंत्रज्ञान आहे. यामुळे हे विमान उड्डाणस्थितीत असताना अदृश्यच असतं. B-2 मध्ये हीट सिग्नेचर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. पण B-21 मध्ये पूर्णपणे थर्मल मास्किंग सिस्टिम आहे. त्यामुळे ते इंफ्रारेड डिटेक्शनला सुद्धा सापडत नाही. B-21 मध्ये AI आणि हेल्थ मॉनिटरिंग सारख्या स्मार्ट क्षमता सुद्धा आहेत. विमानामध्ये स्मार्ट क्षमता आहे, ज्याच्याद्वारे टेक्निकल बिघाडाची माहिती मिळवता येते.
तैनाती कधी होईल?
B-21 रेडरमधून शस्त्रास्त्रांची चाचणी अजून झालेली नाही. पण जुलै 2025 मध्ये वेपन बे ओपनिंग आणि ‘डमी’ बॉम्ब टाकण्याची टेस्टिंग होईल. म्हणजे तो खरा बॉम्ब नसेल. अधिकृतरित्या पेंटागन आणि नॉर्थरोप ग्रुम्मन शांत असतील. पण लीक झालेल्या माहितीनुसार, B-21 ची पहिल्या टप्यातील तैनातील 2027 मध्ये होईल. हे विमान 2029 पर्यंत पूर्णपणे ऑपरेशनल होईल. म्हणजे युद्धाच्या रणागणात त्याचा वापर करता येईल.
