AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्र मित्र म्हणत बांगलादेशने दिला थेट भारताचा झटका, ज्याचा विचारही केल नाही तेच..

Bangladesh India Relation : भारताला मोठा दणका बांगलादेशाकडून देण्यात आला. बांगलादेशाने थेट पाकिस्तानचा हात पकडला आहे. ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच बांगलादेशाने उचललेल्या एका पाऊलामुळे संबंध अधिकच तणावात आहेत.

मित्र मित्र म्हणत बांगलादेशने दिला थेट भारताचा झटका, ज्याचा विचारही केल नाही तेच..
Bangladesh
| Updated on: May 25, 2026 | 1:27 PM
Share

भारत आणि बांगलादेशाचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणल्याचे बघायला मिळतंय. प्रत्येक वेळी भारताने बांगलादेशची मदत केली. इराण आणि अमेरिका युद्धात भारताने बांगलादेशची मदत करत बांगलादेशला एलपीजी गॅसचा पुरवठा केला. त्यामध्येच आता पाकिस्तानने भारताला मोठा दणका दिला. पहिल्यांदाच बांगलादेशने आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवण्यास सुरुवात केली आहे. हा एक मोठा बदल असून, याचा अर्थ असा होईल की, येत्या काही वर्षांत बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर पाकिस्तानी प्रभाव अधिकाधिक दिसून येत आहे. यापूर्वी बांगलादेश आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी भारतातील मसुरी येथे पाठवत. दोन्ही देशांमधील हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होत आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.

नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, अगोदरच भिकेला लागलेला पाकिस्तानच हा प्रशिक्षणाचा खर्च उचलत आहे. एका अतिरिक्त सचिवासह एकून 11 सहसचिव, बांगलादेश सरकारमधील 12 अधिकारी या प्रशिक्षणाकरिता गेले होते. लाहोरच्या नागरी सेवा अकादमीत पाठवण्यात आले होते. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीकता भारताकरिता डोकेदुखी ठरत आहे.

शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, मुहम्मद युनूस यांनी पाकिस्तानसोबत अधिक चांगले संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे ढाका दौरे पुन्हा सुरू झाले आहेत. ढाका आणि कराची थेट विमानसेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली. तिथेच दोन्ही देशांचे संबंध किती जास्त सुधारले आहेत, हे स्पष्ट कळत आहे. बांगलादेशच्या या पावलाने पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आली आहेत.

बांगलादेश आणि भारत यांच्यात गंगा नदीच्या पाण्याबाबत करार होणे बाकी आहे. हा करार याच वर्षी सप्टेंबर महिन्यात संपत आहे. करार पूर्ण होण्यापूर्वीच बांगलादेश भारतासोबत पंगे घेताना दिसत आहे. यामुळे आता हा करारात नक्की काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हेच नाही तर पाकिस्तानकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याकरिता बांगलादेशाकडून पाऊले उचलली जात आहेत. तशी चर्चाही दोन्ही देशांमध्ये सुरू आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ