बांगलादेशची भारताला मोठी धमकी, अमेरिकेतून थयथयाट, युनूस थेट म्हणाले, होय आम्हाला…
अमेरिकेने भारताच्या शेजारी देशांना हाताशी पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. हेच नाही तर आता थेट बांगलादेशाने भारताबद्दल धक्कादायक विधान केले आहे.

भारतावरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने भारताच्या शेजारी देशांना हाताशी पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. हेच नाही तर पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्यावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, याकरिता अमेरिकेला मदत मागितली. मात्र, भारताने स्पष्ट सांगितले की या मुद्द्यामध्ये भारताला कोणाचाही हस्तक्षेप नकोय. चीन, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या कोणत्याही देशावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला नाहीये. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही 50 टक्के टॅरिफ लावत असल्याचे जाहीर करत अमेरिकेने हा टॅरिफ लावला. आता पाकिस्ताननंतर बांगलादेशासोबत अमेरिकेने जवळीकता वाढवली आहे.
बांगलादेशमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस हे सध्या अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारताच्या विरोधात आग ओकली आहे. त्यांनी भारतासोबत असलेल्या सध्याच्या संबंधांवर भाष्य केले. अमेरिकेमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना मुहम्मद युनूस यांनी म्हटले की, बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीना यांचे नाव घेत त्यांनी म्हटले की, बांगलादेशला भारतासोबत समस्या आहे.
कारण त्यांना काही गोष्टींमधील व्यवहार अजिबात आवडला नाही. मागच्या सत्तापालटवेळी शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात आल्या आणि इथेच राहत आहेत. युनुस यांनी म्हटले, हसीना यांचा पाहुनचार केला जातोय, ज्या माजी पीएम आहेत त्यांच्यामुळे सर्व समस्या निर्माण झाली आणि कितीतरी तरूणांचे जीव घेतले. यामुळे सध्या भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव आहे. भारताला इशारा देत त्यांनी म्हटले की, यासोबतच काहीही बातम्या येत आहेत, ज्या खोट्या आहेत चुकीचा प्रचार केला जात आहे. इस्लामी आंदोलन आहे आणि बांगलादेशवर ताबा घेतला अशा.
मुहम्मद युनूस यांनी भारताविरोधात आग ओकली आहे. आम्हाला भारतासोबत समस्या असल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. आता भारताकडून याला नेमके काय उत्तर दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तानसोबत महत्वाची बैठक युनूस यांची झाली, त्यानंतर त्यांनी भारताबद्दल हे धक्कादायक असं विधान केलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक ताणले आहेत.
