
असं कायम म्हटलं जातं ती प्रेमात कोणत्याच मर्यादा नसतात. प्रेमात सर्वकाही मान्य असतं. आता ही भावना अधिकच प्रबळ होत चालली आहे कारण भारतीय पुरुषांशी लग्न करण्यास इच्छुक असलेल्या परदेशी वधूंची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यातील विवाहांच्या वाढत्या संख्येत सीमापार प्रेमाची भावना स्पष्ट होत आहे. 2024 मध्ये भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी अर्ज करणाऱ्या बांगलादेशी महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, जी गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक वाढ आहे.
एवढंच नाही तर, अधिकृत नोंदीनुसार 20 डिसेंबरपर्यंत 100 बांगलादेशी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी कायदेशीर परवानगी मागितली आहे, तर दुसरीकडे फक्त 11 बांगलादेशी पुरुषांनी भारतीय महिलांसोबत लग्न करण्यासाठी परवानगी मागितली आहे. वर्षाची तुलना केली तर, 2023 मध्ये भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी कायदेशीर परवानगी मागणाऱ्या बांगलादेशी महिलांची संख्या फक्त 44 होती.
इतिहास आणि परंपरेबद्दल सांगायचं झालं तर, असं नोंदवण्यात आलं आहे की, बांगलादेशी महिला पारंपारिकपणे भारतीय पुरुषांशी लग्न करण्यास जास्त प्राधान्य देतात. रिपोर्टनुसार, पश्चिम बंगाल राज्यात 410 बांगलादेशी महिलांनी भारतीय पुरुषांसोबत लग्न केलं आहे, तर 76 बांगलादेशी पुरुषांनी बांगलादेशात स्थायिक होण्यासाठी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे.
तज्ज्ञांनी मतानुसार, भारतीय नागरिकत्व मिळवणं हे सर्वात संभाव्य कारणांपैकी एक असू शकतं. कारण भारतीय नागरिकाशी लग्न केल्यानंतर सात वर्षांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो.
बांगलादेशातील एका महत्त्वाच्या भू-राजकीय अपडेटमध्ये, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर देशाला दहशतवाद आणि अराजकतेचे केंद्र बनवल्याचा आरोप केला. पीडित कुटुंबांना मदत करण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी घरी परतण्याची शपथ घेतली.
हसीना यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘युनूस यांनी सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या बरखास्त केल्या आणि दहशतवाद्यांना लोकांना मारण्यासाठी सोडलं आहे. ते बांगलादेशचा नाश करत आहेत. आम्ही दहशतवाद्यांचे हे सरकार उलथवून टाकू.’ असं हसीना म्हणाल्या होत्या.