AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Barbados: बार्बाडोस तब्बल 400 वर्षानंतर प्रजासत्ताक देश बनला, ब्रिटनच्या महाराणीच्या जोखडातून मुक्त, पॉपस्टार रिहाना बनली नॅशनल हिरो

कॅरेबियन बेटांवरील प्रमुख देश बार्बाडोस (Barbados) तब्बल 400 वर्षानंतर ब्रिटनच्या महाराणीच्या शासनातून मुक्त होत प्रजासत्ताक (Republic) झाला आहे.

Barbados:  बार्बाडोस तब्बल 400 वर्षानंतर प्रजासत्ताक देश बनला, ब्रिटनच्या महाराणीच्या जोखडातून मुक्त, पॉपस्टार रिहाना बनली नॅशनल हिरो
बार्बाडोस प्रजासत्ताक बनला
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 10:57 AM
Share

नवी दिल्ली: कॅरेबियन बेटांवरील प्रमुख देश बार्बाडोस (Barbados) तब्बल 400 वर्षानंतर ब्रिटनच्या महाराणीच्या शासनातून मुक्त होत प्रजासत्ताक (Republic) झाला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीयचं (Queen Elizabeth II ) बार्बाडोस येथील शासन संपुष्टात आलं आहे. आता बार्बाडोस पूर्णपणे प्रजासत्ताक झाला आहे. हा देश जगातील सर्वाधिक तरुण देश ठरलाय. तबब्ल 400 वर्षांच्या ब्रिटीश राजवटीनंतर बार्बाडोसमध्ये  गणराज्याची पाहाट झालीय. इंग्लंडच्या जोखडातून मुक्त होणारा हा 55 वा देश ठरलाय.

बार्बाडोसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महाराणीचं प्रतीक असलेला ध्वज उतरवण्यात आला. या कार्यक्रमाला प्रिन्सज चार्ल्स देखील उपस्थित होते. आता गव्हर्नर जनरल सँड्रा मेसन बार्बाडोसच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. मेसन यांनी पहिल्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

बार्बाडोसमध्ये काय बदलणार ?

बार्बाडोसला 30 नोव्हेंबर 1966 मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं. मात्र, प्रजासत्ताक देश होण्यासाठी 2021 पर्यंत वाट पाहावी लागली. बार्बाडोसचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा बदलणार नाही. मात्र, त्यातील ब्रिटनच्या राणीशी संबंधित असणारे रॉयल, क्राऊन असे शब्द वगळले जातील. रॉयल बार्बाडोस पोलीस फोर्समधील रॉयल हा शब्द वगळला जाईल. आता बार्बाडोस पोलीस फोर्स असं नाव राहील.

स्वातंत्र्यापासून प्रजासत्ताकचा प्रवास कसा झाला?

30 नोव्हेंबर1666 ला बार्बाडोसला स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. मात्र, तो देश अद्याप प्रजासत्ताक झाला नव्हता. 1979 मध्ये कोक्स कमिशनची स्थापन गणराज्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्थापना करण्यात आली. 1998 मध्ये संविधानिक समितीनं बार्बाडोसनं प्रजासत्ताक दर्जा स्वीकारावा असं म्हटलं. 2016 मध्ये पतंप्रधान फ्र्युएनडेल स्टुअर्ट यांनी प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारण्याची वेळ आल्याचं म्हटलं. 2020 मध्ये देशाला प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर 30 नोव्हेंबर 2021मध्ये बार्बाडोस प्रजासत्ताक झाला.

रिहाना बनली नॅशनल हिरो

भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी पॉपस्टार रिहाना आता देशाची नॅशनल हिरो बनली आहे. वेस्ट इंडिजच्या संघातील ऑलराऊंडर दिग्गज खेळाडून सर गॅरी सोबर्स हे देखील बार्बाडोसचेच होते.

इतर बातम्या:

Vaccine is Word of the Year: ‘व्हॅक्सिन’ वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषीत, काय आहेत कारणं?

आफ्रिकन देशांसाठी भारताचं मोठं पाऊल, केविन पीटरसनही भारावला, भारतीयांचं कौतुक करत नरेंद्र मोदींचे मानले आभार

Barbados Declares New Republic after 400 Years free from British Queen rule

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.