AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1514 दरवाजे, 775 खोल्या, 350 घड्याळ, 40 हजार बल्ब, हे आहे जगातील सर्वात महागडं घर

बकिंगहॅम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं घर आहे, ज्याची किंमत 2.24 बिलियन अमेरिकन डॉलर्स आहे. 319 वर्षे जुने हे ऐतिहासिक घर 775 खोल्या, 350 घड्याळे आणि 40,000 बल्ब्सने सुसज्ज आहे. लंडनमधील सर्वात मोठे खासगी गार्डन असलेल्या या महालाच्या बेसमेंटमध्ये एटीएम मशीन देखील आहे. या घराचा इतिहास आणि त्याची वैशिष्ट्ये या लेखात वर्णन केली आहेत.

1514 दरवाजे, 775 खोल्या, 350 घड्याळ, 40 हजार बल्ब, हे आहे जगातील सर्वात महागडं घर
बकिंगहॅम पॅलेस
| Edited By: | Updated on: Dec 20, 2024 | 2:35 PM
Share

जगातील सर्वात महागडं घर कोणतं माहीत आहे का? तुम्हाला जर असा प्रश्न केला तर तुम्ही थेट रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं नाव घ्याल. त्यांचं मुंबईतील अँटालिया हे अलिशान घर जगातील सर्वात महागडं असल्याचं तुम्ही सांगाल. कारण अँटालियाची किंमत 12 हजार कोटी आहे. जगभरातून साहित्य मागवून अँटालियाची 27 मजली इमारत उभी राहिलेली आहे. एखाद्या राजमहालालाही लाजवेल असं हे घर आहे. पण अँटालिया हे जगातील सर्वात महागडं घर असलं तरी ते दुसऱ्या क्रमांकाचं महागडं घर आहे. ब्रिटनच्या शाही घराण्याचा बकिंगहॅम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं घर आहे. या पॅलेसचं गार्डनच लंडनमधील सर्वात मोठं खासगी गार्डन आहे.

बकिंगहॅम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं आणि मोठं घर आहे. त्यामुळे या घराची खासियतही तशी वेगळीच आहे. या घराचं सौंदर्य जगातील एक आश्चर्यच मानलं जातं. अत्यंत सुंदर आणि अलिशान असा हा प्रासाद आहे. या घराचं सौंदर्य पाहिल्यानंतरच हे घर किती यूनिक आणि महागडं असेल याचा अंदाजा येतो.

किंमत किती?

बकिंगहॅम पॅलेस हे जगातील मौल्यवान घर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या या शाही कुटुंबाच्या घराची किंमत 2.24 बिलियन अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे भारतीय रुपयानुसार 1,90,54,52,14,496.00 इतकी किंमत या घराची आहे. कोरोना काळापूर्वी या घराची किंमत 100 मिलियन पाऊंड होती.

775 खोल्या, 350 घड्याळ, 40 हजार बल्ब

आतून आणि बाहेरून हे घर अत्यंत सुंदर आणि आलिशान आहे. या घरात 775 खोल्या आहेत. त्यातील 52 शाही खोल्या आहेत. बकिंगहम पॅलेस एवढा मोठा आहे की या घरात 350 घड्याळं लावलेली आहेत. या घरात 40 हजार लाईट्स लावल्या आहेत. या जगातील सर्वात महागड्या घराला 1514 दरवाजे आहेत.

एटीएम मशीनही

बकिंगहॅम पॅलेमध्ये सेव्हन स्टार हॉटेलाप्रमाणे सर्व सुविधा आहेत. या महालाचं खास वैशिष्ट्ये म्हणजे याच्या बेसमेंटमध्ये एटीएम मशीन लावलेली आहे. केवळ राजघराण्याशी संबंधित लोकांच्या वापरासाठीच ही मशीन आहे.

319 वर्ष जुनं घर

हे घर काल परवाचं नाहीये. हे घर 319 वर्ष जुनं आहे. या घराला मोठा इतिहास आहे. हे घर 1703 मध्ये बनवलं गेलं होतं. जगातील हे सर्वात जुनं आणि ऐतिहासिक परंपरा असलेलं घर आहे. हे घर म्हणजे नुसतं घर नाही, तर ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे.

सर्वात मोठं गार्डन

बकिंगहॅम पॅलेस अनेक एकरावर पसरलेलं आहे. या पॅलेसचं गार्डनही भलं मोठं आहे. बकिंगहॅम पॅलेसचं गार्डन हे लंडनमधील सर्वात मोठं खासगी गार्डन आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.