कोहिनूर है सदा के लिए, ब्रिटनची ताजपोशी आणि भारतीयांचं लक्ष राजमुकुटाकडे….!

एकाकडून दुसऱ्याकडे हजारो राजांनी कोहिनूर बळकावला. बाळगला. जपला. त्याची भव्यता, त्याच्या गुण-दोषांचा अनुभव घेतला. जगभरात फिरून तो भारतातही आला. पण अखेरच्या करारानुसार ब्रिटिशांकडे  गेला आणि त्यानंतर तिथून तो कुणालाही सोडवता आला नाही. अगदी परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनाही...

कोहिनूर है सदा के लिए, ब्रिटनची ताजपोशी आणि भारतीयांचं लक्ष राजमुकुटाकडे....!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 5:33 PM

नवी दिल्लीः बात निकली है तो, दूर तक जाएगी.. ब्रिटनमधली (Britain) ताजपोशी, राजमुकुटाचा विषय निघावा आणि कोहिनूरची चर्चा होणार नाही, हे क्वचितच होईल. राजगादीवर प्रिन्स (Prince Charles) विराजमान झाले. पण कोहिनूर (Kohinoor) कुणाच्या मुकूटात विराजमान होणार, याकडे जग उत्सुकतेनं पाहतंय. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्ताननं यावर हक्क सांगितलाय. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता कोहिनूर भारतात परत आणावा, अशी मागणी ट्विटरवर जोर धरतेय. भारतात हजारो वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातल्या खाणीत हा असामान्य, अतिलख्ख हिरा सापडला. पण त्यानंतर अनेक सम्राटांनी आपापल्या शक्तीच्या बळावर तो आपल्या राज्यात नेला. एकाकडून दुसऱ्याकडे हजारो राजांनी तो बळकावला. बाळगला. जपला. त्याची भव्यता, त्याच्या गुण-दोषांचा अनुभव घेतला. जगभरात फिरून तो भारतातही आला. पण अखेरच्या करारानुसार ब्रिटिशांकडे  गेला आणि त्यानंतर तिथून तो कुणालाही सोडवता आला नाही. अगदी परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनाही…

मुघल सम्राटांमध्ये कोहिनूर हिरा बळकावण्याची स्पर्धा असायची तेव्हाही तो एक प्रतिष्ठेचा, गर्वाचा, समृद्धीचा विषय ठरायचा. कोहिनूर हिरा विकला तर अवघ्या जगाच्या लोकसंख्येला अडीच दिवस मोफत जेवू घालता येईल, एवढं त्याचं मोल आहे, असं त्यावेळी म्हटलं जायचं.

एका राणीनं हिऱ्याच्या लख्खपणाचं वर्णन करताना म्हटलं होतं, सर्वात शक्तिशाली व्यक्तीनं चार दिशांना आणि वरच्या दिशेने सर्व ताकतीनिशी दगड भिरकावले. या दगडांदरम्यान जी जागा व्यापली जाईल, तेवढा हा हिरा प्रकाशमान आहे.

kohinoor 2

कोहिनूरचा पहिला अधिकृत उल्लेख 1750 मध्ये फारसी इतिहासकार मोहम्मद मारवीने केला. कोहिनूर द स्टोरी ऑफ द वर्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड पुस्तकाचे लेखक विल्यम हेलरेम्पल यांनी मारवींचा उल्लेख केलाय.

नादिरशाहने दिल्ली लूटून इराणला नेली. त्यावेळी तो तख्त ए ताऊसमध्ये वरील बाजूस जडलेला होता. तेव्हा तो कोंबडीच्या लहानश्या अंड्यासारखा होता. मुघल बादशाह शाहजहाँने बनवलेलं मयूर सिंहासन म्हणजेच तख्त ए ताऊस. १७३९ मध्ये नादिर शाहने दिल्लीवर आक्रमण केलं. लाल किल्ल्यातलं हे सिंहाजन ईराणला नेलं.

कोहिनूर बाळगणं धार्जिण नाही?

कोहिनूर जेवढा मौल्यवान आहे, तेवढाच तो आव्हानं उभी करतो, अशा कथाही सांगितल्या जातात. अनेकांना त्याचा अनुभवही आलाय. कोहिनूर नेमका कुणाचाय याच्या कथा तर आहेतच, पण तो बाळगणाऱ्यासमोर संकटांची मालिका कशी उभी राहते, याचेही दाखले आहेत.

दिल्लीची संपत्ती इराण, अफगाणात नेतानाचं वर्णनही एका इतिहासकारानं आवर्जून केलंय. 700 हत्ती, 400उंट आणि 17 हजार घोड्यांवर हा खजिना नेण्यात आला. हजारो, लाखो हिरे, जड, जवाहिर सैनिकांसोबत होते. कुणी चोरून घेऊ नयेत म्हणून चिनाब नदीच्या पुलावर सैनिकांची झडती घेतली गेली. सैनिकांनी आपल्याकडे दडवलेले हिरे भीतीने जमिनीत गाडले. कुणी नदीत फेकले. काही काळानंतर नदीच्या तळाशी जाऊन ते घेता येतील, ही आशा त्यांना होती.

मुघल सम्राट बाबर याने 1526 मध्ये बाबरनामा आत्मकथनात एका हिऱ्याचा उल्लेख केलाय. तो कोहिनूरच होता, असे म्हटले जाते. बाबरनामानुसार, ग्वाल्हेरच्या कुशवाह शासकांकडे हिरा होता. हुमायूंला बक्षीसी म्हणून तो मिळाला, मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक नकारात्मक घटना घडल्या. तो शेरशाह सूरीकडून पराभूत झाला. सूरीपण तोफेच्या गोळ्याने जळून खाक झाला. त्याचा मुलगा जलाल खान त्याच्या साल्याकडूनच मरण पावला. साल्यालाही एका मंत्र्याने तख्तपालटासाठी हटवलं.

हुमायूनचा पुत्र अकबराने हा हिरा कधीही स्वतःकडे ठेवला नाही. तो नंतर थेट शहाजहाँच्या खजिन्यात पोहोचला. शहाजहाँदेखील पुत्र औरंगजेबकडून बंदी बनवला गेला. त्याने आपल्या तिन्ही भावांची हत्या केली होती. शहाजहाँच्या तख्त ए ताऊसमध्ये हिरा होता.

शहाजहाँला बंदी बनवलं तेव्हा त्याच्या खिडकीजवळ कोहिनूर ठेवला होता, असं म्हणतात. यात त्याला ताजमहालचं प्रतिबिम्ब दिसायचं… 1739 पर्यंत म्हणजे इराणी नादिर शहाच्या आक्रमणापर्यंतच कोहिनूर मुघलांच्या ताब्यात होता, असं म्हणतात.

नाव कसं पडलं?

नादिर शहानं हजारो सैनिकांचा खात्मा करत अगाध संपत्ती इराणला नेली. त्यावेळी हा हिरा पाहताच त्याचा प्रकाश पाहून नादिर शाहच्या तोंडातून एकदम उच्चार आले.. कोह इ नूर… प्रकाशाचा पर्वत.. तेव्हापासूनच याचं नाव कोहिनूर पडलं, असं म्हणतात. 1747 मध्ये नादिर शाहची हत्या झाली. त्यानंतर अफणागाणिस्तानात अहमद शाह अब्दालीच्या हाती कोहिनूर आला. अखेरीस तो पंजाबात आला. महाराजा रणजित सिंह यांना तो भेट देण्यात आला.

kohinoor

भारतातून ब्रिटनमध्ये कसा गेला?

पंजाबचे राजे रणजित सिंह यांनी 1839 मध्ये मृत्यूपत्र केलं. त्यात कोहिनूर ओडीशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दान करण्याचं म्हटलं होतं. मात्र त्याच्या या अखेरच्या इच्छेवरूनच वाद उठला.

लाहौरच्या किल्ल्यावर 1849 मध्ये ब्रिटिशानी कब्जा केला. इस्ट इंडिया कंपनीचा ध्वज फडकावला. लाहौर करार करण्यात आला. त्यानुसार, कोहिनूर नामक रत्न शाह शूजाकडून महाराजा रणजित सिंहांना मिळाला होता. तो महाराजांकडूनच इंग्लंडच्या राणीकडे सोपवला जाईल.

लाहौर करारात कोहिनूरचा उल्लेख करणं ही ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीची महत्त्वाकांक्षा होती. किंबहुना या हिऱ्यासाठीच लाहौर करार केला गेला, असेही काही टीकाकारांचं मत आहे.

करार कशा पद्धतीने झाला, याचंही वर्णन अंगावर काटा आणणारं आहे. रणजित सिंहांच्या मृत्यूच्या दहा वर्षानंतरची ही गोष्ट आहे. त्यांचे पुत्र 10 वर्षांचे राजे दिलीप सिंह. चहुबाजूंनी लाल कोट आणि हॅट परिधान केलेले ब्रिटिश अधिकारी. दिलीप सिंहांची आई राणी जिंदन कौर यांना जबरदस्तीने शहराबाहेरील महालात पाठवण्यात आलं होतं. एका सार्वजनिक कार्यक्रमात काही सरकारांसमोरच 10 वर्षांच्या राजे दिलीप सिंहांकडून या दस्तावेजावर स्वाक्षऱ्या घेण्यात आला. ब्रिटिश साम्राज्याची अनेक वर्षांपासूनही महत्त्वाकांक्षा अखेर पूर्ण झाली होती.

काही मिनिटातच लाहौर किल्ल्यावरून शिख खालसांचा झेंडा काढला गेला. ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा फडकावण्यात आला. शिख साम्राज्यावर कंपनीचा ताबा आलाच पण जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटिशांकडे गेला.

कोहिनूर सध्या कुठे?

सध्या कोहिनूर हिरा प्लॅटिनमच्या मुकुटात जडलेला आहे. हा मुकूट ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय परिधान करायची. या वर्षी फेब्रुवारीतच राणीने घोषणा केली होती. चार्ल्स यांनी ब्रिटिश घराण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.  कॅमिला पार्कर बॉवेल्स या क्वीन कंसोर्ट बनल्या आहेत.  त्यामुळे महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅमिला याच कोहिनूर जडवलेला मुकूट परिधान करतील, अशी शक्यता आहे.

अनेक देशांचा दावा

kohinoor 3

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांना कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. राजा रणजित सिंहाच्या मृत्यूपत्राद्वारे यावर दावा करण्यात आला होता. मात्र ब्रिटिशांनी लाहौर कराराचा दाखला देत त्यात बदल करता येणार नाही असे म्हटले. 1976 मध्ये कोहिनूर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनीही तत्कालीन लाहौरमधून तो ब्रिटिशांकडे गेल्याचं म्हटलं होतं.

अफगाणिस्तानने 2000 मध्ये कोहिनूरवर दावा ठोकला. तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं होतं की, अफगाणिस्तानमधून हा हिरा भारताला देण्यात आला. त्यानंतर तो ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला. त्यामुळे आमचा दावा भारतीयांपेक्षा प्रबळ असल्याचं त्यांनी म्हटलं.

kohinoor 5

2016 मध्ये सुप्रीम कोर्टात पुन्हा एक पीआयएल दाखल झाली. राजे रणजित सिंहांनी युद्धात इंग्रजांना युद्धात मदत म्हणून दिला होता. तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही बोलावण्यात आली होती. आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात ASI देखील पूर्ण प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. पण भारताच्या सुप्रीम कोर्टानं मान्य केलं तरीही ब्रिटन यासाठी कदापि तयार होणार नाही, हेही तेवढच सत्य आहे.

2013 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमरून भारतात आले होते. त्यावेळी कोहिनूर परत देण्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांचं उत्तर अत्यंत बोलकं आणि सर्वांचीच बोलती बंद करणारं होतं. आम्ही अशा मागण्या पूर्ण करत राहिलो तर एक दिवस ब्रिटिश म्युझियमच रिकामं होऊन जाईल…

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....