AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taiwan Fire: तैवानमध्ये इमारतीला भीषण आग, तब्बल 46 लोक मृत्यूमुखी, शेकडो जण अडकले, आगीचं कारण अस्पष्ट

इमारत सुमारे 40 वर्षे जुनी आहे, खालच्या स्तरावर दुकानं आणि वरच्या मजल्यावरील अपार्टमेंट आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली आहे, परंतु इमारतीच्या खालच्या भागात पूर्ण धूर भरला आहे.

Taiwan Fire: तैवानमध्ये इमारतीला भीषण आग, तब्बल 46 लोक मृत्यूमुखी, शेकडो जण अडकले, आगीचं कारण अस्पष्ट
तैवानमध्ये इमारतीला भीषण आग
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 3:26 PM
Share

दक्षिण तैवानमधील निवासी इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली, त्यात 46 लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. काऊशुंग शहरातील अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आग पहाटे 3 च्या सुमारास लागली. अग्निशमन दलाचे जवान शोध आणि बचाव कार्य करत आहेत. खालच्या मजल्यावरील आग विझवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 55 लोकांना रुग्णालयात नेण्यात आले, ज्यात 14 जणांचा समावेश आहे. ( Building fire in southern taiwan latest updates)

घटनास्थळी किमान 11 लोक मृतावस्थेत सापडले. त्यांना थेट शवागारात पाठवण्यात आल्याचंही प्रशासनाने सांगितलं. दुपारपर्यंत अग्निशामक दल बचावकार्यात गुंतलं होतं. अग्निशमन विभागाच्या एका निवेदनानुसार, आग ‘अत्यंत भीषण’ होती आणि इमारतीच्या अनेक मजल्यांपर्यंत ती पोहचली आणि तिथलं सगळं जळून खाक झालं. अग्निशामक दलाला आग कशी लागली हे कळू शकलेलं नाही. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड होती.

3 वाजता स्फोटाचा आवाज ऐकला

साक्षीदारांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, त्यांनी पहाटे 3 च्या सुमारास स्फोट ऐकला. एका माहितीनुसार, इमारत सुमारे 40 वर्षे जुनी आहे, खालच्या स्तरावर दुकानं आणि वरच्या मजल्यावरील अपार्टमेंट आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली आहे, परंतु इमारतीच्या खालच्या भागात पूर्ण धूर भरला आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार आग “अत्यंत भीषण” होती आणि इमारतीतील मजले आगीत जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

व्हिडीओ पाहा:

काऊशुंग सिटी ही दक्षिण तैवानमधील एक मोठी नगरपालिका आहे. काऊशुंग शहराची लोकसंख्या अंदाजे 2.77 दशलक्ष आहे. तैवानमधील हे तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरासह दक्षिण तैवानमधील सर्वात मोठे शहर आहे. 17 व्या शतकापासूनच काऊसियंग हे राजकीय, आर्थिक, वाहतूक, उत्पादन, शुद्धीकरण, जहाजबांधणी आणि औद्योगिक केंद्र बनलं आहे.

काऊशुंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तैवानमधील दुसरं मोठे विमानतळ आहे. काऊशुंग बंदर तैवानमधील सर्वात मोठे बंदर आहे, पण अधिकृतपणे तो काऊशुंग शहराचा भाग नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.