AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan-Taliban : पाकिस्तानवर आली तालिबानचे पाय पकडण्याची वेळ, भारताच्या भितीने घेतला मोठा निर्णय

Pakistan-Taliban : भारताने इतका जबरदस्त खेळ केलाय की, पाकिस्तानवर तालिबानचे पाय पकडण्याची वेळ आली आहे. म्हणून त्यांनी घाईगडबडीत एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. भारताने पाकिस्तानला चांगलच कुटून काढलय.

Pakistan-Taliban : पाकिस्तानवर आली तालिबानचे पाय पकडण्याची वेळ, भारताच्या भितीने घेतला मोठा निर्णय
| Updated on: May 31, 2025 | 1:45 PM
Share

ऑपरेशन सिंदूरद्वारे दक्षिण आशियात भारताने पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. लष्करी आणि कूटनिती दोघांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलच कुटून काढलय. भारताच्या वाढत्या वर्चस्वाने पाकिस्तान हैराण झाला आहे. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. इस्लामाबाद दक्षिण आशियामध्ये भारताचा वर्चस्व कधीच मान्य करणार नाही, असं त्याने म्हटलय. पाकिस्तान इतका हडबडून गेलाय की, काहीही करुन त्यांना शेजारच्या अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत. आपली स्थिती भक्कम करण्यासाठी पाकिस्तान काहीही करायला तयार आहे. पाकिस्तानने काबूलमध्ये आपली कूटनितीक उपस्थित वाढवण्याची घोषणा केली आहे.

पाकिस्तानने काबूलमध्ये आपल्या दूतावासाचा स्तर वाढवून एम्बेसडर-लेवलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा हा निर्णय म्हणजे, त्यांना अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध हवेच आहेत, पण त्याच बरोबर भारताच्या भितीपोटी त्यांनी हे पाऊल उचललय. मागच्या काही महिन्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर बऱ्याच लढाया झाल्या आहेत. भारताने आता अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीसोबत चांगले संबंध प्रस्थापित केलेत. आता अफगाणिस्तानला भारताच्या जवळ जाण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले की, “काबूलमधील सध्याची चार्जे डी’एफेयरची स्थिती एम्बेसडर-लेव्हलमध्ये बदलणं पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध सुधारणेसाठी आवश्यक आहे” “या पावलामुळे दोन्ही बंधु देशांत आर्थिक, सुरक्षा, दहशतवादविरोधी आणि व्यापारी सहकार्य अजून भक्कम होईल” असं इशाक डार म्हणाले.

दूतावास उघडण्याचा निर्णय का घेतला?

काबूलमध्ये पाकिस्तानने डिप्लोमॅटिक उपस्थिती एम्बेसडर-लेव्हलपर्यंत नाही नेली, तर भारताच्या प्रभावाखाली अफगाणिस्तानच्या राजकारणात आणि आर्थिक क्षेत्रात पाकिस्तानची भागीदारी कमकुवत होईल. याच राजकीय रणनिती अंतर्गत पाकिस्तानने काबूलमध्ये दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.