इराण, इस्रायलमध्ये युद्धविराम होताच आता युरोपमधील देशांचा अमेरिकेला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
युरोपमधील देश आता अमेरिकेकडे आमचं सोनं वापस द्या अशी मागणी करत आहेत. या मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार असा अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळेच या देशांनी हे पाऊलं उचललं आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

सोन्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला जगभरात सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. जेव्हा- जेव्हा जागतिक संकटाचे ढग गडद होतात. एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल लागते, जसं की युद्ध, मंदी, दोन देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार सोन्यामधील आपली गुंतवणूक वाढीला प्राधान्य देतात, हेच कारण आहे की जेव्हा -जेव्हा जागतिक स्थरावर काही संकट येतं, तेव्हा -तेव्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होते. सोन्याच्या किंमती आकाशाला भिडतात.
मात्र यावेळी प्रकरण वेगळं आहे, सोन्याचे दर वाढले याची चर्चा किंवा भीती नाहीये. तर युरोपमधील देश आता अमेरिकेकडे आमचं सोनं वापस द्या अशी मागणी करत आहेत. या मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार असा अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळेच या देशांनी हे पाऊलं उचललं आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
युरोपिय देश सोनं परत का मागत आहेत?
अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचीच सत्ता येणार आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे हे युरोपीयन देश आता सावध झाले आहेत. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी, इटलीसारख्या देशांनी अमेरिकेत असलेलं त्यांचं सोनं परत करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेनं आमचं सोनं परत करावं, अथवा त्याचं स्वतंत्र ऑडित व्हाव अशी या देशांची मागणी आहे.
युरोपिय देशांनी अमेरिकेत सोनं का ठेवलं?
दुसऱ्या माहायुद्धानंतर जगात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती, अशा परिस्थितीमध्ये जागतिक स्तरावर व्यापारासाठी एक विश्वासार्ह व्यवस्था आवश्यक होती. तेव्हा युरोपमधील अनेक देशांनी त्यांचं सोनं अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सुरक्षित ठेवले. मात्र आता हे सोनं परत मागितलं जात आहे . युरोपियन देशांनी अमेरीकेकडे आपलं सोनं वापस मागितलं आहे. फ्रान्स, जर्मनी, इटलीसारख्या काही महत्त्वाच्या देशाचं सोनं अमेरिकेकडे आहे.
