‘चिकन नेक’ कमजोरी नव्हे भारताची ताकद; तीन नवे लष्करी तळ, राफेल, ब्रह्मोस आणि S-400 केले तैनात
भारताचे बांगलादेशाशी संबंध सध्या बिघडलेले आहेत. त्याच तेथील नवीन सरकारने चीन आणि पाकिस्तानशी सलगी वाढवल्याने भारत सावध झाला आहे.

भारताचा एकेकाळचा मित्र असलेला बांग्लादेश चीनच्या कह्यात गेल्याने आता भारत सावध झाला आहे. भारताने पूर्व सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती सुरु केली आहे. सिलीगुडी कॉरिडॉर म्हणजे २२ किलोमीटर रुंदीचे हे क्षेत्र ज्याला चिकन नेक म्हटले जाते. ज्याच्याद्वारे उत्तर – पूर्वेतील भारताची सात राज्य देशाच्या मुख्य भूमीला जोडली जातात. आता हे चिकन नेक एका अभेद्य किल्ल्यात परिवर्तित होत आहे. या महत्वाच्या ठिकाणी भारत तीन नवीन लष्करी तळ स्थापन करीत आहे. हा नवी दिल्लीच्या रणनीतीतील मुलभूत बदलाचा संकेत म्हटला जात आहे.
आसामच्या धुबरीजवळ लाचित बोरफुकन लष्करी तळ स्थापन केला जात आहे. तर बिहारच्या किशनगंज आणि प.बंगालच्या चोपडा येथे फॉरवर्ड बेस तयार केला जात आहे. चोपडा फॉरवर्ड बेस बांग्लादेशाच्या सीमेपासून केवल १ किमी अंतरावर आहे. हे केवळ सैन्य अड्डे नसून रॅपिड डिप्लॉयमेंट फोर्स, पॅरा स्पेशल फोर्सेस, इंटेलिजन्स युनिट आणि हायटेक सर्व्हीलान्स उपकरणांनी सज्ज स्ट्रॅटेजिक नोड आहेत. जे कोणत्याही विपरीत स्थितीत ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ची सुरक्षा निश्चित करणार आहेत.
भारताच्या या मोठ्या पावलामागे खरे कारण बांग्लादेशातील सत्ता परिवर्तन म्हटले जात आहे.शेख हसीना यांना हटवून मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांग्लादेशात आले आहे. त्यानंतर या नव्या सरकारने चीन आणि पाकिस्तानशी सलगी सुरु केली आहे. रिपोर्ट्सच्या मते बांगलादेश चीनकडून २.२ अब्ज डॉलर खर्चून चीनकडून J-10C फायटर जेट खरेदी करत आहे. तसेच ड्रोन बनवण्यातही चीनची मदत घेत आहे. तसेच पाकिस्तानने त्याला JF-17 ब्लॉक-C थंडर जेट विमाने ऑफर केली आहेत.
भारताने वेळीच पावले उचलली
बांगलादेशाला लागून असलेली भारताच्या सीमा संवदेनशील आहे. बांगलादेशाचा चीन आणि पाकिस्तानशी वाढता घरोबा भारताचासाठी चांगला संकेत नाही. सिलीगुडी कॉरीडॉर त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर केवळ २२ किलोमीटर रुंद असून पूर्वेकडील ४.५ कोटीहून अधिक लोकसंख्येला उर्वरित भारताशी जोडतो. शत्रू देश विपरित स्थिती उत्तर – पूर्व राज्यांना भारताच्या मुख्य भूमीशी वेगळे पाडण्यासाटी या महत्वपूर्ण संपर्काला टार्गेट करु शकतो. त्यामुळे भारताने वेळीच ही पावले उचलली आहेत.
सिलीगुडी कॉरिडॉरला संरक्षण
हे तीन नवे सैन्य अड्डे सिलीगुडी कॉरिडॉरला संरक्षण प्रदान करणार आहेत. प. बंगालचे चोपडा मिल्ट्री बेस बांगलादेशापासून केवळ १ किमीवर आहे. या सैन्य तळातून बांग्लादेशात टेहळणी शक्य आहे. आणि कोणत्याही धोक्याच्या स्थिती भारतीय सैन्य अवघ्या मिनिटात प्रत्युत्तरास तयार होऊ शकतील. भारताने पूर्व सीमेवर राफेल लढाऊ विमाने, ब्रह्मोस मिसाईल आणि S-400 या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमला तैनात केले आहे.
हे बांगलादेशासाठी स्पष्ट संकेत आहे. भारत आणि त्यांच्या सैन्यात खूपच मोठे अंतर आहे. त्यांच्याकडून कोणतेही चूकीचे पाऊल उचलल्यास त्यास भारताचे उत्तर अत्यंत भयानक असेल. सिलीगुडी कॉरीडॉर ही भारताची कमजोरी नसून मजबूत स्ट्रेटेजिक एसेट बनली आहे. देश
