लढाऊ विमाने, जहाजांची घुसखोरी, चीन थेट…जगाला नव्या युद्धाची चाहूल; लवकरच…
सध्या चीन आणि तैवान यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनची अनेक विमाने सध्या तैवानच्या हद्दीत घुसखोरी करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता नव्या युद्धाची भीती समोर आली आहे.

China Taiwan Clash : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे व्यापारविषयक क्षेत्रात अस्वस्थता आहे. त्यानंतर दुसरीकडे चीन आणि जपान यांच्यातही तैवानमुळे वाद चालू आहे . जपानच्या पंतप्रधान ताकाईची यांनी तैवानवर केलेल्या विधानावर चीनने गंभीर आक्षेप व्यक्त केलेला असे असतानाच आता चीनच्या कुरापतींबाबत एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. चीनच्या हालचालींमुळे नवं युद्ध भडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडतंय?
चीनचा जपानसोबत सध्या वाद चालू आहे. चीन तैवानला आपलाच भाग असल्याचे समजतो. तर तैवान स्वत:ला सार्वभौम प्रदेश असल्याचे सांगतो. असे असतानाच चीनने आता तैवानच्या आजूबाजूला सैन्यविषयक हालचाली वाढवल्या आहेत. हीच बाब लक्षात घेऊन तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने मोठी माहिती दिली आहे. या माहितीनुसार गेल्या 24 तासांत एकूण 27 चीनी पीएलए विमाने, चीनी नौसेनेची 11 जहाजे तैवानच्या आसपास दिसून आली आहे. यातील 25 विमानांनी दक्षीण-पश्चिमी आणि दक्षीण-पूर्वी हवाई संरक्षण ओळख क्षेत्रामध्ये (ADIZ) प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रात चीनी जहाजे, विमानं दिसल्यामुळे आता तैवाननेही योग्य ती खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, असे तैनानने सांगितले आहे.
चीनची लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत
याआधी शनिवारीदेखील चीनी विमानांनी 12 वेळा चीन-तैवानमध्ये असलेल्या मध्य रेषेचे उल्लंघन केले आहे. चीनी विमाने दक्षीण तसेच दक्षिण-पूर्व हवाई संरक्षण ओळख क्षेत्रांमध्ये (ADIZ) घुसलेली पाहायला मिळाली. यामध्ये शेनयांग J-16 हे लढाऊ विमान, H-6 बॉम्बहल्ला करण्यास सक्षण असणारे विमान तसेच KJ-500 या लढाऊ विमानाचा समावेश होता. चीनकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या या घुसखोरीचा सामना करण्यासाठी तैवाननेही आपले सैन्य तयार ठेवले आहे.
दरम्यान, चीनच्या या धोरणामुळे तैवननेही हल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवलेली आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
