चीनने दिली पुरुषांना रक्त देण्याची नोटीस, अखेर काय आहे जिनपिंग सरकारची योजना ?
चीनमध्ये सर्व पुरुषांकडून रक्ताचे नमूने मागितले जात आहेत. यासाठी पोलिसांनी खास घोषणा केली आहे. हे पाऊल सार्वजनिक सुरक्षेसाठी उचलले जात असल्याचे म्हटले जात असले तरी यामागे नक्की जिनपिंग सरकारच्या मनात नेमके काय आहे ? या विषयी संशय व्यक्त केला जात आहे.

चीनमधून पुरुषांकडून रक्ताचे नमूने मागितले जात आहेत. चीनच्या उत्तरेकडील जिलिनहोत शहर पोलिसांनी घोषणा केली आहे की ते सर्व पुरुष निवासीयांकडून अनिवार्य रुपाने रक्ताचे नमूने घेऊन एक मोठा डीएनए डेटाबेस तयार करण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी नोटीस पाठवून जनतेला रक्ताचे नमूने देण्याची विनंती केली असून सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांची माहिती अधिक चांगल्या प्रकारे जतन करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
मात्र या पावलाने चीनमध्ये कायदा आणि प्रायव्हसी यावर नवा वाद सुरु झाला आहे. तज्ज्ञांच्या मते याआधी चीनमध्ये कधीही असे झालेले नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारे कधी झालेले नाही. चला तर पाहूयात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा अखेर प्लान तर काय आहे नेमका ?
रक्ताचे नमूने गोळा करण्यामागे तर्क काय ?
रक्ताचे नमूने थेट पासपोर्ट, राष्ट्रीय ओळख पत्र आणि अन्य दस्तावेज यांच्याशी संलग्न केले जाणार आहेत असे म्हटले जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते ही प्रणाली बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी मदत करेल.चीनच्या पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोटेक्शन लॉ अंतर्गत डीएनए सारखी संवदेनशील माहीती गोळा करण्यासाठी लेखी परवानगी आणि कायदेशीर स्पष्टता हवी. परंतू जिलिनहोत नोटीशीत हे सांगितलेले नाही की डेटा केव्हापर्यंत ठेवला जाईल आणि लोकांना अधिकार काय असणार आहेत.?
या मोहिमेत केवळ पुरुषांवर लक्ष केंद्रीत करण्यामागे हे संकेत करते की पोलीस Y-STR टेस्टींग करु शकते, ज्यात वडीलांच्या बाजूकडील आणि संपूर्ण कुटुंबाची तपासणी होऊ शकते. ही केवळ गुन्हेगारी तपासणीपर्यंत मर्यादित नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि पुढच्या पीढीपर्यंत पाळत ठेवली जाणार आहे. तज्ज्ञांनी याबाबत सावध केले आहे की मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या डीएनए डेटाने सैन्य आणि जैविक शस्रांस्रासाठी जोखीम वाढू शकते. Y-chromosome डेटा स्थिर असतो आणि तो लक्षित जैविक शस्त्रास्रे तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
आधीही झाला होता वाद
डीएनए संग्रह करण्याचे हे पाऊल चीनच्या तंत्रज्ञान आणि बायोटेक उद्योगाशी जोडलेले असू शकते. आता जेव्हा जीनोम सिक्वेनसिंग स्वस्त आणि वेगवान झाले असताना मोठ्या प्रमाणावर डीएनए डेटाबेस तयार करणे सोपे झाले आहे. यामुळे चीनच्या फोरेन्सिंक जेनेटिक्स आणि बायो इन्फॉर्मेटिक्स कंपन्यात गुंतवणूक वाढू शकते. 2006 मध्ये Foxconn ने कर्मचाऱ्यांकडून रक्ताचे नमूने गोळा केले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. जिलिनहोतची ही योजना मल्टीनॅशनल कंपन्यासाठी इशारा असून चीनमध्ये बायोलॉजिकल डेटा संग्रह करणे वाढू शकते.
