AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात सर्वात मोठा खजाना असूनही चीनने मारली बाजी,आता समुद्रावर असे करणार राज्य

अमेरिकेने १९६० च्या दशकात थोरियमवर चालणारे रिएक्टर तयार करण्याचे काम सुरु केले होते. परंतू नंतर ते बंद केले. भारतात तर थोरियमचे प्रचंड साठे आहेत.

भारतात सर्वात मोठा खजाना असूनही चीनने मारली बाजी,आता समुद्रावर असे करणार राज्य
| Updated on: Nov 06, 2025 | 9:08 PM
Share

बीजिंग: चीनने तंत्रज्ञानाद्वारे जगात आणखी एक कमाल करुन दाखवली आहे. चीनने थोरियम रिएक्टरवर चालणारे जगातले सर्वात मोठे कार्गो जहाज जगासमोर आणले आहे. थोरियमला ऊर्जेच्या रुपात वापर करुन चीनने मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे थोरियमचे सर्वात मोठे साठे भारतात आहेत. अनेक वर्षे होऊनही भारताला थोरियम पासून ऊर्जा मिळवण्याचे तंत्रज्ञान साध्य करता आलेले नाही.

चीनने थोरियम रिएक्टरवर चालणारे जगातले सर्वात मोठे कार्गो जहाज तयार केले आहे. यामुळे आता व्यावसायिक जहाज, नेव्हल इंजिनिअरिंग आणि समुद्राच्या आतील मोहिमा चालवण्यात क्रांतिकारी बदल होणार आहे. जगातले हे सर्वात मोठे कार्गो जहाज १४ हजार स्टँडर्ड शिपिंग कंटेनर वाहून नेऊ शकतो.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार हे कार्गो जहाज थोरियम आधारित मोल्टन साल्ट रिएक्टरवर चालते. त्यात २०० मेगावॅट वीज तयार होऊ शकते. ही ऊर्जा एवढी आहे जेवढी अमेरिकन नौदलाच्या सर्वात आधुनिक सीवुल्फ क्‍लास न्‍यूक्लिअर अटॅक पाणबुडीचे S6W वॉटर रिएक्‍टर तयार करते. परंपरागत आण्विक रिएक्टर युरेनियमपासून चालतात. त्यांना चालवण्यासाठी एका विशाल कुलिंग सिस्टीमची गरज असते. परंतू नव्या चीनी रिएक्टरमध्ये थोरियमचा वापर केला असून तो सुरक्षित असून थोरिएम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. थोरियमच्या रिएक्टरला कुलिंगसाठी पाण्याची आवश्यकता रहात नाही.

थोरियम रिएक्‍टर जास्त सुरक्षित

थोरियम रिएक्‍टरचा हा एक फायदा आहे की हे रिएक्टर छोटे आणि शांत असतात तसेच परंपरागत डिझाईन पेक्षा जास्त सुरक्षित असतात. थोरिएम रिएक्टरला तर पुढे यशस्वीपणे वापरता आले तर व्यावसायिक शिपिंगमध्ये मोठा बदल होऊ शकतो. यास तयार करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की रिएक्टरद्वारे उत्पन्न झालेली २०० मेगावॅटची उष्णता थेट वापरता येत नाही. त्याऐवजी सुपर क्रिटिकल कार्बन डायऑक्साईड जनरेटरला ऊर्जा देते. हा Brayton cycle चा वापर करुन ऊर्जेचा वापर वीज तयार करण्यासाठी करतो.

भारताचा विकास करण्याचा प्रयत्न सुरुच

भारताने पहिल्या टप्प्यात यश मिळवून नैसर्गिक युरेनियमच्या मदतीने प्रेसराईज्ड हेवी वॉटर रिएक्टरची निर्मिती केली आहे, परतू त्याला अजूनही तिसऱ्या टप्प्यात पोहचता आलेले नाही. यात टप्प्यात थोरियमचा वापर इंधनाच्या रुपात केला जातो. तज्ज्ञांच्या मते चीनचे हे यश भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारताला वेगाने तिसऱ्या टप्प्याच्या पुढे जावे लागेल. भारताच्या जवळ जगाच्या एक चतृथांश थोरियम भांडार आहे. अंदाजानुसार हे  ४५७,००० ते ५०८,००० टनाच्या दरम्यान आहे. भारतात केरळच्या मोनाजाईट वाळू, तामिळनाडू आणि ओडिशात थोरिएमचे साठे आहेत.

भारताकडे तर जगाच्या २५ टक्के थोरियम

चीनच्या संशोधकाच्या मते थोरियमद्वारे चालणारे रिएक्टरमुळे रेडिएशनचा धोका कमी असतो. चीनमध्ये थोरियमचे साठे प्रचंड आहेत. इनर मंगोलियाच्या एका खाणीत इतके थोरियम आहे की त्यामुळे १००० वर्षांपर्यंत वीजेची सध्याची गरज पूर्ण केली जाऊ शकते. भारताकडे तर जगाच्या २५ टक्के थोरियम आहे तरीही थोरिएम पासून ऊर्जा तयार करण्यात भारताला अजूनही यश आलेले नाही. चीन एकीकडे मोल्टन साल्ट रिएक्टर तयार करण्यात यशस्वी झाला तर भारत याबाबतही अजूनही मागे आहे.  अमेरिकेनेही १९६० मध्ये थोरियमवर रिएक्टर तयार करण्याचा प्रयत्न केला होता तो फळला नाही.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.