एकाच कुटुंबातील 11 जणांना मृत्युदंडाची शिक्षा, नेमका गुन्हा काय होता? वाचून बसेल धक्का
एकाच कुटुंबातील 11 लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? कदाचित नसेल. मात्र एका चिनी कुटुंबातील 11 लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे समोर आले आहे.

गंभीर गुन्हा करणाऱ्या एखाद्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते हे तुम्ही वाचले असेल. मात्र एकाच कुटुंबातील 11 लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? कदाचित नसेल. मात्र एका चिनी कुटुंबातील 11 लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे समोर आले आहे. या लोकांचा गुन्हा होता? इतकी कठोर शिक्षा त्यांना का सुनावण्यात आली? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लाओकयांग शहरातील ही घटना आहे. म्यानमारच्या मिंग कुटुंबाचे या भागावर राज्य होते. 2015 पासून मिंग कुटुंबाने या छोट्या शहरात मोठे जुगार अड्डे, ड्रग्जचा व्यापार आणि फसवणूक करणारी केंद्रे उघडली. या केंद्रांमध्ये हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आले होते. या लोकांना नोकरीचे आमिष दाखवून आत नेले जायचे आणि त्यांना ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जायचे. लोकांनी हे काम करण्यास नकार दिला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारहाण केली जायची, यात अनेकांचा जीवही गेला होता.
मिंग कुटुंबाने 10 हजारांपेक्षा जास्त लोकांना डांबून ठेवले होते. मिंग कुटुंब हे म्यानमारच्या शान प्रांतातील सर्वात शक्तिशाली कुटुंब होते. लुखाईंगला गुन्हेगारीचे केंद्र बनवण्यात मिंग कुटुंबांचा हात होता. चीनमध्ये जुगार बेकायदेशीर आहे, मात्र या कुटुंबाने बेकायदेशीरपणे लुखाईंगमध्ये कॅसिनो स्थापन केले आणि यातून मोठी संपत्ती कमवली.
1.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती
सन 2015 पासून मिंग कुटुंबाने जुगार, फसवणूक, ड्रग्ज आणि वेश्याव्यवसायातून 10 अब्ज युआन म्हणजे तब्बल 1.4 अब्ज डॉलर्स कमावले. मिंग कुटुंबाचे जाळे हळूहळू चीनमध्ये पसरले. हजारो चिनी नागरिकांना याचा फटका बसला. या कुटुंबाने 1 लाखापेक्षा जास्त परदेशी नागरिकांची फसवणूक केली.
कुटुंबप्रमुखाची हत्या झाली
2023 मध्ये मिंग कुटुंबाची अवस्था बिकट झाली. म्यानमारच्या शान राज्यातील बंडखोरांनी हल्ला करत लाओकयांग शहर ताब्यात घेतले. यामुळे मिंग कुटुंबाचे प्रमुख मिंग झुएचांग यांनी आत्महत्या केली. त्यानंतर उर्वरित कुटुंबातील सदस्यांना पकडून चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घोटाळ्यात सहभागी असणारे हजारो कर्मचाऱ्यांनाही चिनी पोलीसांनी ताब्यात घेतले.
39 जणांना शिक्षा
चीनमधील वेन्झोऊ येथील न्यायालयाने 29 सप्टेंबर 2025 रोजी 39 जणांना शिक्षा सुनावली आहे. यात 11 जणांना तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 5 जणांना दोन वर्षांनी मृत्यूदंड दिला जाणार आहे. 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उर्वरित लोकांना 5 ते 24 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने मिंग कुटुंबाला निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी देखील जबाबदार धरले आहे, त्यामुळेत त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
