AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनमध्ये जगात सर्वाधिक वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन सुरू, ताशी 600 किलोमीटर वेगाची गती

चीनची अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआच्या मते, चीनच्या किनारपट्टीवरील किनिंगडॉ शहरात सार्वजनिकरित्या नवीन मॅग्लेव्ह परिवहन व्यवस्था सुरू करण्यात आलीय.

चीनमध्ये जगात सर्वाधिक वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन सुरू, ताशी 600 किलोमीटर वेगाची गती
bullet train
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 11:10 PM
Share

बीजिंग : मंगळवारी चीनने आपली हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन सुरू केली. या ट्रेनची कमाल वेगमर्यादा 600 किमी प्रतितास आहे. अधिकृत माध्यमांच्या म्हणण्यानुसार, जमिनीवर धावणारं हे सर्वात वेगवान वाहन आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआच्या मते, चीनच्या किनारपट्टीवरील किनिंगडॉ शहरात सार्वजनिकरित्या नवीन मॅग्लेव्ह परिवहन व्यवस्था सुरू करण्यात आलीय.

ऑक्टोबर 2016 मध्ये हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन प्रकल्प सुरू

ऑक्टोबर 2016 मध्ये हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन प्रकल्प सुरू झाला. एका अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये 600 किलोमीटर प्रतितास वेगाच्या या गाडीचा एक नमुना तयार करण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून 2020 मध्ये झाली.

ट्रेनमध्ये 10 कोच बसविता येतील

या ट्रेनमध्ये 10 कोच बसविता येतील, असे प्रकल्पाचे मुख्य अभियंता डिंग सन्सन यांनी सांगितले. प्रत्येकाची क्षमता 100 प्रवाशांची असेल. ते म्हणाले की ही ट्रेन 1,500 किमीच्या परिघामध्ये प्रवास करण्यासाठी उत्तम उपाय आहे. पारंपरिक गाड्यांप्रमाणेच मॅग्लेव्ह रेल्वेची चाके रेल ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत.

चिनी बुलेट ट्रेन भारतीय सीमेजवळून धावेल

दुसरीकडे आता चीनची बुलेट ट्रेन भारतीय सीमेजवळून धावणार आहे. असं म्हणतात की, यावर्षी अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीन तिबेटपर्यंत बुलेट ट्रेन चालवण्यास सुरुवात करेल. 2020 मध्येच 435 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झालेय. म्हणजेच चीनने तिबेटमधील ल्हासाला बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी पूर्ण केलीय. ही ट्रेन चीनच्या जवळपास सर्व प्रांतांतून जाईल. चीनने 2025 पर्यंत हाय-स्पीड ट्रेनचे जाळे 50,000 किमीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आता चिनी बुलेट ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने तिबेटकडे धावणार

म्हणजेच एकीकडे चीन सीमेवरील वाद मिटविण्यासाठी भारताशी लष्करी आणि मुत्सद्दी चर्चा करीत आहे. कारण अद्याप लडाखमधील गोग्रा, हॉट स्प्रिंग, डेमचॉक आणि देप्सांग या दोन देशांमधील चर्चा सुरू आहे. दुसरीकडे त्याच्या षडयंत्रांची व्याप्तीही वाढत आहे. लांबलचक सीमा विवाद आणि तणाव असतानाही चीन सीमावर्ती भागात वेगाने पायाभूत सुविधा विकसित करीत आहे आणि आता चिनी बुलेट ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने तिबेटकडे धावणार आहे.

संबंधित बातम्या

चीनमध्ये आणखी एका धोकादायक विषाणूचा शिरकाव; पहिल्या मृत्यूनंतर खळबळ, जाणून घ्या विषाणूबद्दल

Nepal PM : शेर बहादुर देउबा नेपाळचे नवे पंतप्रधान, 165 मतांनी विश्वासमत जिंकलं, मोदींकडून शुभेच्छा

China launches world’s fastest maglev train at 600 kilometers per hour

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.