
जग सध्या युद्धामुळे अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे. एकीकडे अमेरिका आणि इस्राईलने इराण विरोधात मोर्चा उघडला आहे. दुसरीकडे चीन गुपचूपपणे सोन्याचा रिझर्व्ह वाढवत चालला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 5,000 डॉलर प्रति औंस ( 31.1035 ग्रॅम ) पातळीवर पोहचली आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असताना चीन अखेर इतक्या घाई घाईने सोन्याचा साठा का वाढवत आहे ? याच जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे.
चीनची केंद्रीय बँक ‘पिपल्स बँक ऑफ चायना’ (PBOC) ने फेब्रुवारी महिन्यात देखील सोन्याची ताबडतोड खरेदी सुरु ठेवली आहे. हा लागोपाठ 16 महिना आहे की जेव्हा चीनने आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीत पीबीओसीने 30,000 ट्रॉय औंस सोने खरेदी केले आहे.ज्यानंतर त्यांचा एकूण स्वर्ण साठा वाढून 74.22 मिलियन औंस झाला आहे. जानेवारीत हा आकडा 74.19 मिलियन औंस झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते चीनचे हे पाऊल एक गुंतवणूक नसून एक विचारपूर्वक धोरणात्मक चाल आहे. साल 2024 च्या शेवटापर्यंत चीन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या ( डी- डॉलरायझेशन ) दिशेने काम करत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला परदेशी चलनाच्या चढ-उतारापासून वाचवण्यासाठी अमेरिकन डॉलरच्या ऐवजी सोन्यावरील आपला विश्वास दाखवला आहे.
अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची लकाकी सतत वाढत आहे. अमेरिका आणि इस्राईलची इराण विरोधातील संयुक्त सैन्य कारवाईने गुंतवणूकदारात भीतीचे वातावरण आहे. जेव्हा जागतिक सुरक्षा अडचणीत असते, तेव्हा गुंतवणूक शेअर बाजार सारख्या जोखीम असलेल्या पर्यायातून पैसे काढून सोन्या सारख्या गुंतवणूकीकडे ( सेफ – हेवन ) धावतात.
याच कारणामुळे ‘स्पॉट गोल्ड’ 1.85% मध्ये मोठ्या उसळीसह 5,171 डॉलर प्रति औंसच्या पार गेला आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि संस्थांचा कल देखील बिल्कुल केंद्रीय बँकासारखा आहे. याचा अंदाज या गोष्टींवरुन लावला जाऊ शकतो फेब्रुवारीत युएस-लिस्टेड गोल्ड ईटीएफ (ETF) मध्ये 4.5 बिलियन डॉलरची मोठी गुंतवणूक झाली आहे.
एकीकडे चीन आणि पूर्व आशियाई देश सोने जमा करण्याच्या मागे लागले असताना जगातील इतर देशांच्या केंद्रीय बँकांची रणनिती संपूर्णपणे विभागलेली दिसत आहे. पोलँडची केंद्रीय बँक जी काही काळाआधी जगातील सर्वात आक्रमक खरेदीदार होती. आता आपल्या घरगुती संरक्षण गरजांना पूर्ण करण्यासाठी आपल्या रिझर्व्हचा काही हिस्सा विकण्याच्या मनस्थितीत आहे.
दुसरीकडे कठोर निर्बंध आणि आर्थिक बहिष्काराचा सामाना करणारे रशिया आणि व्हेनेझुएला सारखे देश रोख जमा करण्यासाठी आपले सोने विकत आहेत. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या विश्लेषक मारिसा सलीम यांच्या मते किंमतीतील मोठा चढ-उतारामुळे काही केंद्रीय बँकांनी भलेही खरेदी थांबवली असली तरी भू-राजकीय जोखीम कमी होण्याच्या शक्यता नाही,त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.
या जागतिक घटनाक्रमांचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर आणि त्यांच्या गुंतवणूकीवर पडला आहे. जे.पी.मॉर्गन (J.P. Morgan)च्या विश्लेषकांचा अंदाज असा आहे की 2026 च्या अखेरपर्यंत सोन्याची सरासरी किंमत 5,055 डॉलर प्रति औंसच्या आसपास राहू शकते. याचा थेट अर्थ हा आहे की केंद्रीय बँका सतत मागणीमुळे सोन्याच्या किंमती मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेच्या चलनविषयक धोरणातील बदलांमुळे बाजार काही काळासाठी अस्थिर असू शकतो, परंतु दीर्घकाळात सोने हा एक मजबूत आणि सुरक्षित पर्याय राहील.