Maharashtra News LIVE 13 June 2026 : स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेचा माफिनामा
Maharashtra News LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असतील. ते फ्रान्समधील G7 बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत. यासहद देश, विदेश, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा

LIVE NEWS & UPDATES
-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे राज्यपालांना पत्र
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे राज्यपालांना पत्र पाठवले आहे. चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. १०० कोटीच्या आरोपांसंदर्भात चांदीवाल आयोग नेमला होता. त्याचा अहवाल विधानसभेत मांडण्यासाठी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना ११ पत्र लिहूनही अहवाल जाहीर केला नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
-
विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतदान केंद्रे
६१९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क. १८ जूनला सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार मतदान तर मतमोजणी २२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारत होणार. विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या एका जागेसाठी होणार मतदान प्रक्रिया
-
-
संगमनेरमध्ये तलवारीने केक कापणारा तरुण गजाआड
तलवारीने केक कापणारा युवक गजाआड.
व्हायरल व्हिडिओनंतर संगमनेर पोलिसांची कारवाई.
रहमतनगर येथील १९ वर्षीय अफरोज शेखला अटक
आरोपीच्या कमरेला नक्षीकाम केलेला चाकू आढळला.
शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, चाकू जप्त.
पोलिस निरीक्षक समीर बावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
घातक शस्त्रांनी केक कापणाऱ्यांवर कठोर कारवाईचा पोलिसांचा इशारा.
-
नाशिक – मुंबई महामार्गावर कारचा अपघात, तीन जखमी
नाशिक – मुंबई महामार्गावर गोंदे फाट्याजवळ कारचा अपघात कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकली
अपघातात दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी
जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले
-
FDA ची धडक मोहीम दोन दिवसांत 3.67 कोटींचा गुटखा जप्त, 17 जणांना अटक
अन्न व औषध प्रशासनाने 11 आणि 12 जून रोजी राज्यभरात राबवलेल्या धडक मोहिमेत 3 कोटी 67 लाख 8 हजार 571 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत 17 जणांना अटक करण्यात आली असून, 8 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
-
-
गुहागरमध्ये समुद्राचे पाणी फेसाळलेले काळसर आणि सोनेरी पाणी किनाऱ्यावर
गुहागर अजगोली बंदरात समुद्राच्या पाण्याला सोनेरी तवंग आल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी समुद्राचे पाणी काळसर झालं आहे. लाटांसोबत तेलकट व फेसाळलेले पाणी किनाऱ्यावर आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अचानक बदललेल्या पाण्याच्या रंगामुळे गोंधळाचं वातावरण आहे. समुद्राच्या पाण्याचा बदलण्याचं नेमकं कारण काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
-
डॉ. सेजल पवारवर केईएम प्रशासनाची कारवाई
डॉक्टर सेजल पवार हिच्यावर अखेर केईएल प्रशासनाने कारवाई केली आहे. 15 दिवस कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव केला आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरण भोवलं.
-
-
स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेचा माफिनामा
स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेने माफी मागितली आहे. व्हायरल व्हिडीओच्या वादासंदर्भात प्रणित मोरेने माफी मागितली आहे. मला एक संधी द्या, चांगला माणून बनून दाखवेन, असं प्रणित मोरे म्हणाला.
-
रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस
आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत माघार नाही असा पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे.
-
ओएफसीडी प्रकरणात सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने (सेबी) सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एसआयसीसीएल) चार व्यवस्थापकांना आणि कंपनी सचिवांना दिलासा देणाऱ्या प्रतिभूति अपील न्यायाधिकरणाच्या (सॅट) आदेशाला सर्वोच्च न्यायालयात अंशतः आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालय 18 जून रोजी या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश असलेले सुट्टीकालीन खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल.
-
जोरहाट हवाई तळावर झालेल्या एएन-32 विमान अपघातात भारतीय हवाई दलाचे 5 जवान शहीद
भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील जोरहाट हवाई तळावर एएन-32 या वाहतूक विमानाचा अपघात होऊन पाच जवान शहीद झाले आहेत. सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशी समिती नेमली आहे.
-
रायगड : शेतरस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचे नियोजन
सुधागड तालुक्यातील तोरणपाडा परिसरात सध्या विविध विकास प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, एका विकासकाने शेतजमिनीपर्यंत जाणारा पारंपरिक शेतरस्ता बंद केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीशी संपर्क व्यवस्था होती. रस्ता बंद झाल्याने शेतीकामासाठी ये-जा करणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा शेतरस्ता तातडीने खुला करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-
बीड – काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं – प्रकाश सोळंके
मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच जिल्ह्यातील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं. धनगर आणि मराठा समाजातील लोकांना पुढे केलं गेलं आणि काहींना निवडणूकीत उभं केलं गेलं असं वक्तव्य आमदार प्रकाश सोळंके यांनी केलं. या विधानाद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला.
-
नाशिक : चांदवड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार
नाशिकच्या चांदवडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गांवर मंगरूळ येथे मोटर सायकलला कारने पाठीमागून धडक दिली, यात सुलतान शेख हा इसम ठार झाला. दुसऱ्या अपघातात चांदवड येथील मेडिकल कॉलेज समोर मुंबई-आग्रा महामार्गांवर स्पीड ब्रेकर मुळे मोटरसायकलवरून पडून वंदना संजय डोंगरे या महिलेचा मृत्यू झाला आहे.
-
यवतमाळ : लोहारा एमआयडीसी परिसरात बनावट खत साठा जप्त
एकीकडे खतासाठी शेतकऱ्यांना टंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे मात्र बोगस खत तयार करून विक्री केल्या जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यवतमाळच्या लोहारा एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या कारखान्यावरती कृषी विभाग व पोलीस विभागांनी एकत्र धाड टाकून पोटॅश व इतर बनावट खत साठा जप्त करण्यात आला. जवळपास दोन हजार खतांचा साठा हा 24 लाख रुपये किंमत असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.
-
अमरावतीत ठाकरेंच्या नगरसेवकाला महावितरणच्या सहाय्यक लेखापालाची शिवीगाळ भोवली
अमरावतीत महावितरणच्या एका सहाय्यक लेखापालाला नगरसेवकाशी अर्वाच्य भाषेत संवाद साधणे चांगलेच महागात पडल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे आणि महावितरणचे सहाय्यक लेखापाल शिवचरण भोसले यांच्यातील वादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महावितरण प्रशासनाने तातडीने कारवाई करत भोसले यांचे निलंबन केले आहे.
-
सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून फिल्मीस्टाईल सोन्याची चोरी
सोलापुरात भरदिवसा सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून फिल्मीस्टाईल सोन्याची चोरी. फिल्मीस्टाईल चोरीचा सीसीटीव्ही समोर आलाय. पूर्व भागातील सत्तर फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानातील घटना.तोंडाला मास्क घालून आलेल्या दोन तरुणांनी दुकानात प्रवेश करत मालकाला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर मालक भीतीने आतील भागात गेल्यानंतर दोन ते तीन सोनसाखळ्या लुटून नेल्या.भरदिवसा अशी घटना घडल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
-
एकतर्फी निवडणूक असून मोठ्या मताधिक्याने उमेदवार निवडून येतील – गिरीश महाजन
जळगावमध्ये महायुतीचा एकच उमेदवार आहे. एकतर्फी निवडणूक असून मोठ्या मताधिक्याने उमेदवार निवडून येतील. शिवसेनेचे आमदार, जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत. आता कुठलीही नाराजी नाही, उद्या महायुतीचा मोठा मेळावा जळगाव मध्ये होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडेल. या मेळाव्याला मी स्वतः तसेच गुलाबराव पाटील,महायुतीचे सर्व नेते, आमदार, खासदार उपस्थित राहतील असं गिरीश महाजन म्हणाले.
-
रेश्मा काळे यांच्या माघारी नंतर नंदकिशोर महाजन यांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे यांच्या माघारी नंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांची पहिली प्रतिक्रिया. बंडखोरी कायम होती तरी माझ्या मनामध्ये कुठलीही धाकधुक नव्हती, कारण महायुतीचे सर्व नेते माझ्या पाठिशी होते. रेशमा काळे यांनी त्यांच्या उमेदवारीवरुन माघार घेतली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे निवडणुकीत 100% विजय माझाच आहे असं नंदकिशोर महाजन म्हणाले.
-
वाशिम जिल्ह्यात मान्सून लांबल्याने खरीप पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत
वाशिम जिल्ह्यात मान्सून लांबल्याने खरीप पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत…. उपलब्ध पाण्याच्या आधारे काही शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनातून कपाशी लागवड… पाऊस आणखी उशिरा आल्यास खरीप हंगामाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता…
-
ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट
ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 33 टक्के पाणीसाठा. औद्योगिक क्षेत्र, गृहसंकुलमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा
-
पावसाळ्यात यंदा पालिका करणार वृक्ष लागवड
यंदा पावसाळ्यात पुणे पालिका वृक्ष लागवड करणार… जवळपास 50 लाख झाडं लावण्याचा संकल्प… वृक्ष लागवडीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधी
-
पंढरपुरात 23 आणि 24 जूनला विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन बंद राहणार
पंढरपुरात 23 आणि 24 जूनला विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन बंद राहणार. दोन्ही मूर्तींचं दीर्घकालीन संवर्धन आणि जतन करण्यात येणार. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया होणार. वारकरी आणि भाविकांनी सहकार्य करण्याचे मंदिर समितीचे आवाहन
-
अनिल पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत साहेबांनी जे वक्तव्य केलेला आहे ते वक्तव्य आमच्यासारख्यांना तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अर्थहीन वाटत आहे. अर्थ खातं सांभाळण्यासाठी दुसरं कोणी सक्षम नाही असं सांगत असताना त्यांनी मागचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे. आपल्या चिवसेनेचे (शिवसेनेचा चिव सेना उल्लेख) ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील राज्यात अशीच चर्चा होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सक्षम आहे की नाही. संजय राऊत साहेबांनी मागच्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते कुठल्याच पद्धतीने सरकार चालवण्यासाठी सक्षम नव्हते, अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
-
तीन एकर डाळींब बागेवर फिरवला ट्रॅक्टर
डाळींब बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील शेतकरी कोंडाजी शिंदे यांनी तीन एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने तीन एकर डाळींब बाग भुईसपाट केली आहे.
-
फेरीवाल्यांवरून केडीएमसीत राजकारण तापलं
महापौर फेरीवाल्याकडून खरेदी करत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल होताच फेरीवाला प्रश्नावरून सत्ताधारी विरूद्ध विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे फेरीवाल्यांविरोधात सत्तेत असून शिवसेनेचे आंदोलन तर दुसरीकडे शिवसेनेचेच महापौर फेरीवाल्याकडून खरेदी करतात असा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. तर मी खरेदी केलीच नाही माझ्या हातात फक्त मोबाईल विरोधक विकासाऐवजी फक्त राजकारण करतायत असा पलटवार महापौर हर्षाली थवील यांनी केला आहे.
-
तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला खडकी येथील शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक
तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी येथील शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला. दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधातील कारवाईचे शेतकर्यांकडून स्वागत करण्यात आले. मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शुद्ध दुधाला मागणी वाढून दर वाढण्याची शक्यता असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. या कारवाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले.तुकाराम मुंढे यांची बदली करू नये, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
-
त्या छोट्या नेत्यावर मला बोलायचं नाही-रोहित पवार
काही सत्ताधारी नेते आंदोलनावर बोलत आहेत त्या छोट्या नेत्यावर मला बोलायचं नाही, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. पण मुख्यमंत्री साहेब तुमचे नेते, मंत्री आंदोलनावर खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत, जर आपण त्यांना थांबवले नाही तर याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांना स्वतः बोलायला सांगत आहेत असा अर्थ आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
-
2014 साली देशावर 56 लाख कोटीचे कर्ज होते आता 210 लाख कोटोचे कर्ज -रोहित पवार
काही नेते स्टेटमेंट टीव्हीवर करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कर्जमाफीत अट नाही टाकली. त्यात ते म्हणाले 99 टक्के शेतकऱ्यांना फायदा होईल. काल म्हणाले 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी मिळेल. मोठ्या व्यावसायिकांचे कर्ज माफी केल्यावर बँकिंग क्षेत्र अडचणीत आलेत नाहीत. मग शेतकऱ्यांची छोटी कर्जमाफी केली तर बँकिंग अडचणीत कशी येणार. मुख्यमंत्री म्हणतात देशाची परिस्थिती चांगली आहे की देशावर कितीही लोन झाले तर एका दिवसात कर्ज फेडू शकतो. 2014 साली देशावर 56 लाख कोटीचे कर्ज होते आता 210 लाख कोटोचे कर्ज आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
-
कबुतरखान्यानंतर दादरमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद
कबुतरखाना आणि घाटकोपरनंतर दादरमध्ये सुद्धा पांढऱ्या पट्टीचा वाद समोर आला आहे. संदीप देशपांडे यांच्या संपर्क कार्यालय परिसरातील रस्त्यावर पांढरी पट्टी लावण्यात आली. त्यावरून वाद पेटला. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकार पांढरी पट्टी न आखण्याची मागणी मनसेने केली होती. ही पट्टी काढण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. आता महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ही पांढरी पट्टी हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
-
विधान परिषद निवडणुकीसाठी कराडमध्ये महायुतीची बैठक
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराडमध्ये भारतीय जनता पार्टीची बैठक बैठकीला उदयनराजे भोसले जयकुमार गोरे शिवेंद्रराजे भोसले आमदार अतुल बाबा भोसले चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत.
-
मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील बोरमळी धरणात १७ वर्षीय युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना
पुसद येथील अंश जयस्वाल मित्र व तीन मैत्रिणींसह धरण परिसरात आला असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पिंजर येथील आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. युवकाचा शोध घेण्यासाठी धरण परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देखील समोर आली. रील बनविण्याच्या नादात दुर्घटना घडल्याची चर्चा सुरु आहे. अंश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे फुलउमरी परिसरात शोककळा पसरली आहे.
-
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे दोन दिवसांपासून कुटुंबासमवेत बाहेरगावी…
उद्या मातोश्रीवरील उद्धव ठाकरे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाकचौरे बैठकीला उपस्थित राहणार का? अशा चर्चेला उधाण आलं आहे. ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिर्डी राजकारणात चर्चांना वेग आलं आहे. बैठकीपूर्वी वाकचौरे यांची भूमिका काय असेल? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
चांगला मनुष्य बनायची एक संधी द्या – प्रणित मोरे
व्हिडियो व्हायरल प्रकरणात प्रणित मोरे यांना माफी मागितली आहे. मला एक संधी द्या चांगला मनुष्य बनायची असं आवाहन त्याने केलं आहे.
-
पळून विवाह केलेल्या मुलीचे प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीची हत्या
बीडच्या धारूर पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा येथील शरद धनवे नामक 42 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात आता चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मुलीने एका महिन्यापूर्वी एका तरुणासोबत पळून जाऊन विवाह केला होता. ते प्रकरण मिटवण्यासाठी शरद धनवेसह इतरांनी मध्यस्थी केली. आमची इज्जत गेली, तू आमचा मित्र असताना समोरच्या लोकांच्या बाजूने कसा काय बोलला? असा जाब वारंवार आरोपींकडून विचारला जात होता. दोन दिवसांपूर्वी धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील पहाडी दहिफळ येथे आरोपी आबासाहेब मस्के आणि इतरांनी शरद धनवे यांना पार्टीसाठी एका हॉटेलवर बोलावून घेतले आणि तिथे त्यांची हत्या केली. याप्रकरणी मयत व्यक्तीच्या मुलाच्या फिर्यादीवरून चार आरोपींच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे तर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
-
भिमाशंकर दौऱ्यात माध्यमांवर निर्बंध? कव्हरेजसाठी आलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारल्याची चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त भिमाशंकर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील कामे, सुरक्षा व्यवस्था आणि मंदिर परिसरातील सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री भिमाशंकरमध्ये दाखल होत आहे मात्र, दौऱ्याचे कव्हरेज करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना रोखण्यात आलंय विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद असताना मंदिर खुले होण्यापूर्वीच मुख्यमंत्री दौऱ्यावर आल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
औद्योगिक क्षेत्र , गृहसंकुलंन मध्ये लागणाऱ्या पाण्यासाठी टँकरच्या मोठ्या रांगा…
दिवसभरात शंभरच्या आसपास टँकरने पाणी शहरात पोचवलं जात आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 33% पाणीसाठा. जिल्ह्यावर पाणी संकट गडद. बारवी ,मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणात पाण्याची पातळी घटली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यापासूनच वातावरणात उष्णतेत झालेली कमालीची वाढ त्यातच पाऊस देखील लांबल्याने धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे…
-
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दाैऱ्यावर
पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग क्षेत्र भिमाशंकर येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण दौरा होणार आहे. भिमाशंकर मंदिर विकास आराखड्याच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री भिमाशंकर येथे येणार असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिमाशंकर येथे प्रस्तावित मंदिर विकास आराखड्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
-
मुंबईतील हवामानात सध्या मोठा बदल
मुंबईतील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. दमट उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यभर मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी ५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची नवी माहिती समोर येतेय. गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती थांबलेली असून शेतकऱ्यांची चिंता वाढलीये.
-
विलीनीकरणासाठी आम्हाला कोणीही संपर्क केला नाही- सुप्रिया सुळे
नुकताच सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, विलीनीकरणासाठी आम्हाला कोणीही संपर्क केला नाही. सत्ताधारी आणि विरोधक कामासाठी भेटतात, असेबी यादरम्यान त्यांनी म्हटले.
-
दुसरे पंतप्रधान मोदी निर्माण होऊच शकत नाहीत- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होऊच शकत नाहीत. मोदींविरोधात लढायचे असेल तर सर्वांना एकत्र यावे लागेल, असेही राऊतांनी म्हटले.
-
पक्ष फोडणे, माणसे फोडणे, ही एकप्रकारची विकृती- संजय राऊत
नुकताच संजय राऊत यांनी सरकावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, पक्ष फोडणे, माणसे फोडणे ही एकप्रकारची मोठी विकृती आहे. मोदी, शाहांचे सरकार आले तेव्हापासून या विकृतीने कळस गाठला आहे.
-
कॉमेडिअन प्रणित मोरेच्या अडचणी वाढण्याची शक्यता
कॉमेडिअन प्रणित मोरेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडीओजची चौकशी होणार आहे. अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली.
-
महाराष्ट्रात गुटखा माफियांविरोधात आता सर्वात मोठी कारवाई होणार
महाराष्ट्रात गुटखा माफियांविरोधात आता सर्वात मोठी कारवाई होणार. बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध व्यवसायाशी संबंधित उत्पादक, तस्कर, वाहतूकदार, वितरक आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर थेट MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
-
दिंडोशीत बिबट्याची दहशत – निसर्ग सोसायटीच्या पार्किंगमध्ये फिरला बिबट्या
मुंबईतील दिंडोशी परिसरातील निसर्ग सोसायटीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून रहिवाशांमध्ये घबराट पसरली.
-
पुणे – हिंजवडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुणे – हिंजवडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. 61 ग्रॅम अंमली पदार्थांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. MD ड्रग्सची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली.
-
कल्याणच्या वालधुनीत साकारणार बोधगयाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे बौद्ध स्मारक!
कल्याणच्या वालधुनीत बोधगयाच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे बौद्ध स्मारक साकारणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; बुद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांना शासनाने हिरवा कंदील दाखवला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या घोषणेनंतर या निर्णयाचा कल्याण मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कल्याण पूर्वेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी सखल बौद्ध समाज बांधवांची ढोल ताशाच्या गजरात नाचत फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.
-
आमदार रवी राणा व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या कार्यालयाला मंत्री बावनकुळे यांची भेट
अमरावती – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच स्वागत केलं.. राणा दाम्पत्य आणि बावनकुळे यांच्यामध्ये बंद दारआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाईल अशी चर्चा सुरू होत्या.
-
चाळीसगाव तालुक्यात वादळाचा हाहाकार; केळीच्या बागा उद्ध्वस्त, घरांचेही मोठे नुकसान
चाळीसगाव तालुक्यात वादळाचा हाहाकार; केळीच्या बागा उद्ध्वस्त, घरांचेही मोठे नुकसान झाले. वरखेडे व उंबरखेडेत अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या वादळाने हाहाकार उडाला. ज्वारीच्या दाण्याएवढ्या गारांच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. १०० ते २०० हून अधिक केळीच्या बागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
-
आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस
आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. माझं बीपी व्यवस्थित आहे मात्र शुगर कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कर्जमाफीतील काही जाचक अटी सरकारने घातल्यात, त्या मागे घेतल्याशिवाय आमचे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केव्हा 50 हजार पर्यंत कर्जमाफी म्हणजे सरकारकडून शेतकऱ्याची फसवणूक आहे, असा आरोप त्यांनी केला.
Maharashtra News LIVE : रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. कृषीमंत्री भरेणेंकडून रोहित पवार यांना सोमवारी चर्चेचं निमंत्रण देण्यात आल आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं म्हणत रोहित पवार आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असतील. ते फ्रान्समधील G7 बैठकीलाही उपस्थित राहतील. या दौऱ्यादरम्यान भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी, संरक्षण सहकार्य, व्यापार, गुंतवणूक, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कोकणातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे वाहतुकीची अखंडता कायम राखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाच्या मॉन्सून हंगामासाठी व्यापक तयारी पूर्ण केली आहे. भू-सुरक्षा, पायाभूत सुविधा बळकटीकरण, अत्याधुनिक देखरेख प्रणाली, विशेष गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अशा विविध उपाययोजनांद्वारे कोकण रेल्वेने पावसाळी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jun 13,2026 9:00 AM
