AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

| Edited By: | Updated on: Sep 12, 2026 | 8:52 PM
Share

Maharashtra News LIVE : आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, राज्यभरातील मराठा समाजाने 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आंतरवालीत यावे. आम्हाला अडवले तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू.

Maharashtra News LIVE : हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला पावसाचा अलर्ट
Big BreakingImage Credit source: tv9 Marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Sep 2026 08:52 PM (IST)

    Dharashiv News : जेवळीत धक्कादायक प्रकार; रेशन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात चक्क सहा ते सात दातांचे संच आढळल्याने खळबळ उडाली आहे.जेवळी येथील महिला भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य घेतले होते. भातासाठी तांदूळ चाळणीत घेतले असता, त्यामध्ये दाताची कवळी आढळून आली.आढळलेले दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असून ते मानवी आहेत की प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणी चौकशी करून शासकीय पातळीवर तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

  • 12 Sep 2026 08:01 PM (IST)

    SBI ने दिला सर्वात मोठा झटका; ऑक्टोबरमध्ये रेपो दर वाढणार?

    SBI Researchच्या ‘Ecowrap’ अहवालानुसार, RBI ऑक्टोबरमध्ये रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते. त्यानंतर डिसेंबरमध्येही आणखी 25 बेसिस पॉइंट्स वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत रेपो दरात एकूण 50 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.

  • 12 Sep 2026 06:17 PM (IST)

    हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

    गोंदिया : हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.  दुपारनंतर गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची हजारी पाहायला मिळाली.  1 तास बरलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाले आहेत.

  • 12 Sep 2026 05:41 PM (IST)

    धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवलं 

    धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवलं

    39 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची दडी

    शेतकरी मोठ्या संकटात

    तुळजापूर तालुक्यातील किलज गावातील शेतकरी अजित शिवाजी पवार यांनी सोयाबीनला लावली आग

    अडीच एकरमधील सोयाबीन जळून खाक

  • 12 Sep 2026 05:29 PM (IST)

    चाकणच्या आंबेठाण चौकात भीषण अपघात

    चाकणच्या आंबेठाण चौकात भीषण अपघात

    कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसची दुचाकीला धडक

    दम्पत्यासह  लहान बाळ अपघातामध्ये गंभीर जखमी

    पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघात

    नशेत बस चालवणारा चालक पोलिसांच्या ताब्यात

    रोजच्या जीवघेण्या अपघातांमुळे नागरिक संतप्त

  • 12 Sep 2026 05:11 PM (IST)

    नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा

    नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा

    उद्या दहा वाजता मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा

    अनुसूचित जाती आरक्षण उपवार्गिकरणाच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन

    राज्यातील मातंग समाजाचे आजी, माजी खासदार मंत्रीही उपस्थित राहणार

    2 लाख मातंग बांधव नांदेडमध्ये एकवटणार असल्याची आयोजकांची माहिती

  • 12 Sep 2026 05:00 PM (IST)

    गणेशोत्सव काळात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा, हिंदू सेवा संघाची मागणी

    गणेशोत्सव काळात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा, अशी मागणी हिंदू सेवा संघाने केली आहे. ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत पुण्यातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे.  बापट यांनी  हिंदू देवी-देवतांचा आणि गणेशोत्सवाचा अवमान केल्याचा हिंदू सेवा संघाने आरोप आहे. विद्यानंद बापट यांनी हिंदू भाविक, गणेश मंडळे आणि वारकरी संप्रदायाची बिनशर्त माफी मागावी असंही त्यांनी सांगितलं आहे.  पुढील 48 तासांत माफी मागण्याची हिंदू सेवा संघाची मागणी आहे.

  • 12 Sep 2026 04:58 PM (IST)

    विलास घुले खून प्रकरण, खासदार पुत्राला अटक करा; या मागणीसाठी टायर पेटवून आंदोलकांकडून निषेध.

    आज टाकळी फाट्यावर अहिल्यानगर-अहमदपुर रस्त्यावर सकाळपासून करण्यात येत आहे. पुरवणी जबाबाबत खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे याचं नाव घेण्यात आलेलं आहे. त्यावरून सोरव सोनवणेंना अटक करावी तसेच मयत विलास घुलेंचा भाऊ रमेश घुलेला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.  याच दरम्यान महिला आंदोलकात आणि महिला पोलिसात बाचाबाची देखील झाली.  बीडच्या टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणाला 85 दिवस उलटलेत‌. दरम्यान आज सकाळपासून वाहतूक ठप्प आहे.

  • 12 Sep 2026 04:53 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स संयुक्त घोषणापत्र केले जारी

    ब्रिक्स संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स संयुक्त घोषणापत्र जारी केले. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, हे संयुक्त घोषणापत्र एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

  • 12 Sep 2026 04:39 PM (IST)

    ब्रिक्स शिखर परिषद 2026 दरम्यान अक्षरधाम मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था

    डीसीपी राजीव कुमार यांनी सांगितलं की, “शहराला भेट देणारे अनेक परदेशी प्रतिनिधी अक्षरधामला भेट देऊ शकतात. त्यामुळे आम्ही येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. हे केवळ एक धार्मिक स्थळच नाही, तर एक सांस्कृतिक वारसा स्थळसुद्धा आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने लोक भेट देतात. आम्ही ड्रोनच्या मदतीने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहोत. जवळच्या यमुना परिसरात गस्त घालण्यासाठी आम्ही दोन बोटी तैनात केल्या आहेत. आमचे कर्मचारीही तैनात आहेत. बाह्य सुरक्षा दलेही येत आहेत; आमच्या तीन कंपन्या आणि एक पलटण आहे. वाहतूक पोलीसही आमच्यासोबत काम करत आहेत आणि लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करत आहेत.”

  • 12 Sep 2026 04:37 PM (IST)

    अमरावतीच्या वाघोली गावामध्ये एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश

    अमरावतीच्या वाघोली गावामध्ये एकाच कुटुंबातील सख्ख्या चिमुकल्या बहिण भावाला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. सर्पदंशामुळे 9 वर्षीय चिमुकल्या पवन चव्हाण या मुलाचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण 6 वर्षीय परि चव्हाण या चिमुकल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.  आधी बहिणीला नंतर भावाला सापाने दंश केला होता. मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

  • 12 Sep 2026 04:23 PM (IST)

    पांजरापोळ कॅट सिरीयल किलिंग करणारा नराधम अखेर अटकेत

    गोवंडीच्या पांजरापोळ येथील शनी मंदिराजवळ भटक्या मांजरी आणि तिच्या निरागस पिल्लाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केलीय. रुबीना पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना आरसीएफ पोलिसांनी मांजरांची हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत त्याचे नाव शिवा असे असून तो गर्दुला आहे.

  • 12 Sep 2026 04:17 PM (IST)

    पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणांवर बोलले, चीन मात्र गप्प

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) सुधारणा करण्याची मागणी केली आहे. रशिया आणि चीन हे दोघेही UNSC चे स्थायी सदस्य आहेत. रशिया, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे देश भारताच्या UNSC मधील स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देतात, परंतु चीनने या विषयावर मौन बाळगले आहे.

  • 12 Sep 2026 04:04 PM (IST)

    मी पुतिन यांच्याशी बोलण्यास तयार आहे: झेलेन्स्की

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलण्यास तयार आहे. मी मियामी येथील जी-20 परिषदेत पुतिन यांना भेटेन.”

  • 12 Sep 2026 04:00 PM (IST)

    नाशिक – ब्रेक फेल झाल्याने शाळेच्या बसला अपघात, सुदैवाने विद्यार्थ्यांना दुखापत नाही

    नाशिकमध्ये ब्रेक फेल झाल्याने शाळेच्या बसला अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस गोदापार्कजवळील पत्र्याच्या शेडमध्ये वळवली. सुदैवाने बसमधील 7 ते 8 विद्यार्थी सुखरूप आहेत. बसच्या धडकेमुळे एक दुचाकी शेडमध्ये शिरली आणि त्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. त्यावरील महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 12 Sep 2026 03:45 PM (IST)

    ही शेवटची लढाई सुवर्ण अक्षराने लिहिली जाणार – मनोज जरांगे पाटील

    अंतरवाली सराटी –   ही शेवटची लढाई सुवर्ण अक्षराने लिहिली जाणार आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी आम्ही ज्या मार्गांवर जातोय त्या रस्त्यावर या.  जिथे मुक्काम आहे तेथील मराठ्यांनी आजपासून तयारीला लागा.  बीड, अहिल्यानगर, पुणे, रायगड, नवी मुंबई, मुंबई येथील सर्व मराठ्यांनी आजपासून तयारीला लागा – मनोज जरांगे पाटील.

  • 12 Sep 2026 03:30 PM (IST)

    इंदापूर-कोलाड दरम्यान भीषण ट्रॅफिक,चाकरमान्यांचे हाल

    ​मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते कोलाड दरम्यान 2 ते 3 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्याने भीषण ट्रॅफिक जाम झालं आहे. ​सकाळी घरातून निघालेले चाकरमानी कडक उकाडा आणि वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरच अडकून पडले आहेत.  ​या वाहतूक कोंडीचा आणि तीव्र उन्हाच्या त्रासाचा फटका विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे.

  • 12 Sep 2026 03:28 PM (IST)

    माझे हे आंदोलन संपलं की संपूर्ण मराठवाड्यात पाणी आणतो- मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

    माझं हे आंदोलन संपलं की संपूर्ण मराठवाड्यात पाणी आणतो.  मी जायकवाडीच्या भिंतीवर जाऊन बसतो.  अख्ख्या जायकवाडीचं पाणी मराठवाड्यात फिरवतो.

    जर नाही करू शकलो तर माझं नाव बदलून ठेवा – मनोज जरांगे पाटील .

  • 12 Sep 2026 03:17 PM (IST)

    11 महिन्यांच्या थकीत पगारासाठी एनटीसी गिरणी कामगारांचं मुंबईत आंदोलन सुरू

    11 महिन्यांच्या थकीत पगारासाठी बंद एनटीसी गिरणी कामगारांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने चार एनटीसी गिरण्यांवर साखळी उपोषण चालू असून टाटा, इंदू मिल क्रमांक ५, पोद्दार आणि दिग्विजय मिलवर कार्यकर्ते आक्रमक झालेत.  ऑक्टोबर 2025 ते ऑगस्ट 2026 पगार आणि ग्रॅच्युईटी तातडीने देण्याची मागणी. तसेच  घरभाडे, प्रवास भत्ता आणि आरोग्य सवलती देण्याची मागणी करण्यात येत आहे.  ७ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.  एनटीसी कार्यकारी प्रमुख कुमकुम राजू यांच्यासोबत कामगार नेत्यांची चर्चा निष्फळ ठरली.

  • 12 Sep 2026 03:12 PM (IST)

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग खोळंबला, कोकणवास अडकले

    गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग खोळंबल्याने कोकणवासी  वाहतूक कोंडीत नऊ तास अडकले.  कोलाड इंदापूर महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडल्याने कोकणवासीयांना अडकून पडावं लागलं.

  • 12 Sep 2026 03:06 PM (IST)

    आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता माघारी येणार नाही – मनोज जरांगे पाटील

    शेवटच्या लढाईत आपल्याला जिंकायचंच आहे.  आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता माघारी येणार नाही – मनोज जरांगे पाटील

  • 12 Sep 2026 03:05 PM (IST)

    धाराशिवमध्ये 39 दिवसांपासून पावसाचा खंड; दुष्काळाचे सावट, जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण

    धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल ३९ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभं राहिलं आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या याच भागात यंदा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू असतानाही अनेक भागांतील ५० फूट खोल विहिरी कोरड्या पडल्या असून, शेतजमिनींना भेगा पडल्या आहेत. सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात साथ दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर तब्बल ३९ दिवस पावसाचा खंड पडल्याने उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे दुष्काळाचा सर्वाधिक फटका आता पशुधनालाही बसू लागला आहे.

  • 12 Sep 2026 02:55 PM (IST)

    महिलांनी लता आणि अमृताताईंच्या घरी हळदी-कुंकू करावं-जरांगे

    महिलांनीही मुंबईत आंदोलनाला या, अमृता फडणवीस, लता शिंदेंच्या घरी हळदी-कुंकू करा… आरक्षण द्या, असं हळदी-कुंकू लावताना सांगा, जरांगेंचं आवाहन

  • 12 Sep 2026 02:52 PM (IST)

    अकोला शहरात चोरांनी स्कूटीवर डल्ला मारत 9 लाख 50 हजारांची रोकड लंपास

    अकोल्यातून एक मोठी चोरीची बातमी समोर आली आहे… सिव्हिल लाईन्स परिसरात ज्वेलर्स दुकान दाराच्या स्कूटीच्या डिक्कीतून तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांची रोकड आणि तिजोरीची चावी चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे…तर परेश सराफ हे व्यावसायिक काही कामानिमित्त कपड्याच्या दुकानात गेले होते… याच संधीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी स्कूटीच्या डिक्कीवर डल्ला मारला आणि 9 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे… तर फक्त पाच मिनिटात चोरट्यांनी ही चोरी केली असून ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे…पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे…तर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरु आहे.

  • 12 Sep 2026 02:40 PM (IST)

    गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं कठीण- बावनकुळे

    गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं कठीण… जरांगेंसह मराठा आंदोलकांनी मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, बावनकुळेंचं आवाहन

  • 12 Sep 2026 02:27 PM (IST)

    मनोज जरांगेंकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा

    जरांगेंकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा… 15 सप्टेंबरला अंतरवालीतून निघणार… पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली, रायगड या मार्गाने मुंबईत पोहोचणार… 19 सप्टेंबरला आझाद मैदानात आमरण उपोषण करणार, जरांगेंची माहिती

  • 12 Sep 2026 02:17 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार?

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा… अंतरवाली सराटीतील बैठकीत निर्णय… पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली, रायगड या मार्गाने मुंबईत पोहोचणार

  • 12 Sep 2026 02:14 PM (IST)

    15 सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघणार-मनोज जरांगे

    15 सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे.

  • 12 Sep 2026 02:01 PM (IST)

    इंदापूर शहर वाहतुकीच्या विळख्यात, आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; प्रवासी अडकले

    लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास वाहतूक कोंडीच्या विघ्नात अडकला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर परिसरात तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तासन्‌तास वाहनं जागेवरच अडकून पडले आहेत.

  • 12 Sep 2026 01:47 PM (IST)

    जरांगेंच्या उर्वरित तीन मागण्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर आमची सकारात्मक चर्चा सुरू- उदय सामंत

    सरकार जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत असून, त्यांच्या 15 पैकी 12 मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. उर्वरित तीन मागण्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता किंवा त्यांचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका कायम आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

  • 12 Sep 2026 01:37 PM (IST)

    सरकारने आपल्याला अडवलं तर त्यांना मराठे मतदान करणार नाहीत- जरांगे पाटील

    “सरकारने आपल्याला अडवलं तर त्यांना मराठे मतदान करणार नाहीत. मराठ्यांनी मतदान नाही केलं तर सरकार पडेल. एखादा पोलीस जास्त शहाणपणा करायला लागला, आपल्याला कोणी पोलिसांनी अडवलं तर सगळं फडणवीसांवर आणायचं. मराठ्यांची मतं तोडतील एवढं सोपं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तसं करणार नाहीत,” असं जरांगे म्हणाले.

  • 12 Sep 2026 01:24 PM (IST)

    मुंबईत जाईपर्यंत आणि माघारी येईपर्यंत शांततेत आंदोलन करायचं- जरांगे पाटील

    न्यायदेवतेनं आपल्या बाजूने कौल दिला आहे. ती गोरगरीबाच्या बाजूने आहे. आपण न्याय देवतेचा सन्मान करायचा. मुंबईत जाईपर्यंत आणि माघारी येईपर्यंत शांततेत आंदोलन करायचं. शांततेत आंदोलन करायचं. दगडफेक किंवा कोणतंही चुकीचं काम करायचं नाही. शांतता हा मार्ग स्वीकारायचा आणि कोणी काही केलं तर मी आंदोलन करणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 12 Sep 2026 01:10 PM (IST)

    मुंबईला येणाऱ्या बांधवांनी एकाच मार्गे चालायचं- मनोज जरांगे

    मुंबईला आमरण उपोषणाला येणाऱ्या बांधवांनी आपण सर्वांनी एकाच मार्गे चालायचं. मार्ग बदलायचा नाही. शांततेत ओव्हरटेक न करता जायचं. आपण जो मार्ग ठरवला त्या मार्गाने सर्वांनी एकत्र जायचं आहे, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं.

  • 12 Sep 2026 12:57 PM (IST)

    भरपूर समाज पाठीशी आहे, त्यामुळे मुक्काम वाढतात – जरांगे पाटील

    भरपूर समाज पाठीशी आहे, त्यामुळे मुक्काम वाढतात… पहिला मुक्काम पटोदा, दुसरा मुक्काम श्रीगोंद्यात, तिसरा मुक्काम पुण्याच्या हडपसरमध्ये असणार आहे… चौथा मुक्काम खोपोलीत असणार आहे… आझाद मैदानात आमरण उपोषण करणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 12 Sep 2026 12:57 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी रणरागिणींची महाआरती..

    माळशिरस तालुक्यातील संगम-बाबुळगाव येथील मराठा समाजाच्या रणरागिणी महिला भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंहपूर येथील भगवान नरसिंहाच्या मंदिरात महाआरती करून साकडे घातले. मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. सरकारने आश्वासन न देता मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी महिलांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या भगवान नरसिंहाच्या चरणी साकडे घालत सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी भावना महिलांनी व्यक्त केली…

  • 12 Sep 2026 12:52 PM (IST)

    मुंबईला जायचं फायनल झालं – जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार… मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल… कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईत जायचंय जिंकून यायचंय…. समाजासाठी लढाई आहे.. कुणाला खुन्नस द्यायची नाही. गाड्या घेऊन निघालो तरी 2- 3 दिवस लागतील इतक्या गाड्या आहत… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 12 Sep 2026 12:50 PM (IST)

    कोरडा दुष्काळ जाहीर करा या सह विविध मागण्यासाठी शेतकरी आक्रमक

    कोरडा दुष्काळ जाहीर करा या सह विविध मागण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी खळी फाटा परिसरात परभणी ते गंगाखेड राज्य महामार्ग मागील अर्ध्या तासापासून रोखला आहे.  सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.  सरकारविरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. पोलिसांचा देखील आंदोलन स्थळी मोठा फौजफाटा दाखल.

  • 12 Sep 2026 12:40 PM (IST)

    गणेशोत्सवातील गणेश मंडळाचे मंडप, स्टॉल मुळे वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यानंद बापट यांची पालिका पोलीस प्रशासन यांना नोटीस…

    गणेशोत्सवातील गणेश मंडळाचे मंडप, स्टॉल मुळे वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यानंद बापट यांनी पालिका पोलीस प्रशासन यांना नोटीस बजावली आहे. गणेशोत्सवाची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. विद्यानंद बापट यांनी डीजे विरोधात घेतलेली भूमिका बरोबर आहे मात्र स्टॉलच्या बाबत जो निर्णय घेतलेला आहे तो अमान्य आहे आम्ही व्यवसाय करतोय आणि व्यवसायाच्या माध्यमातून भक्ती ही करत आहोत. प्रत्येकच गोष्टीला विरोध करायचा मग गणेशोत्सवच साजरा करायचा नाही का? असा सवाल विक्रेते यांनी उपस्थित केला आहे.

  • 12 Sep 2026 12:37 PM (IST)

    आपल्याला मुंबईत जाऊन जिंकून यायचंय – जरांगे पाटील

    आपल्याला मुंबईत जाऊन जिंकून यायचंय…. लढाई आता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे घरी बसू नका. बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख, मार्ग सांगणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 12 Sep 2026 12:30 PM (IST)

    कुर्ला एसटी डेपोमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी, बसेसच्या व्यवस्थेवरून प्रवासी नाराज – एसी बंद, बस खराब असल्याची तक्रार

    गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची कुर्ला एसटी डेपोमध्ये गर्दी झाली आहे. कुटुंबासह लांबून प्रवासी डेपोमध्ये दाखल झाले आहेत. मात्र यावेळी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. काही बसेसचा एसी बंद आहे, काही बसेस खराब आहेत तर काही बसेस वेळेवर डेपोमध्ये पोहोचल्याच नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. एसटी महामंडळाकडून योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी केला आहे.

  • 12 Sep 2026 12:18 PM (IST)

    अष्टविनायक महागणपतीच्या श्री क्षेत्र रांजणगाव येथे आजपासून चार दिवस भाद्रपद ‘द्वार यात्रा उत्सवाला’ सुरुवात

    अष्टविनायक महागणपतीच्या श्री क्षेत्र रांजणगाव येथे आजपासून चार दिवस चालणाऱ्या ऐतिहासिक भाद्रपद ‘द्वार यात्रा उत्सवाला’ अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. या विशेष उत्सवाच्या कालखंडात लाडक्या बाप्पाला थेट स्पर्श करून जलाभिषेक करण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे.​गेल्या काही तासांपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची रांजणगाव नगरीत अलोट गर्दी लोटली आहे. बाप्पाचा गाभारा आकर्षक आणि विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. विशेष म्हणजे, या द्वार यात्रा उत्सवात लाडक्या गणरायाची पालखी बहिणींना निमंत्रित करण्यासाठी मंदिराच्या चारहीद्वारांना मार्गक्रमण करणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्री विधिवत पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी प्रत्यक्ष स्पर्श दर्शनाचा मार्ग खुला करण्यात आला आहे.

  • 12 Sep 2026 12:13 PM (IST)

    अमरावती शहरातील चित्रा चौक ते इतवारा उड्डाणपूलाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचं आंदोलन

    माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेऊन, उच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आणि दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. असे असूनही, आजपर्यंत उड्डाणपूल खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करून तो जनतेसाठी खुला करावा, या मागणीसाठी उद्या अमरावती शहर जिल्हा काँग्रेस समिती अर्धवट उड्डाणपूल जवळ आंदोलन करत आहे…

  • 12 Sep 2026 12:00 PM (IST)

    मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात

    मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या बैठकीत मुंबईला कधी जायचे त्याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कुणबी दाखले त्रुटी दाखवून रद्द केल्यानंतर जरांगे पाटील यांचे गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आज ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 12 Sep 2026 11:50 AM (IST)

    राज्यातील कुठल्याही झेडपी शाळेस निधी कमी पडू देणार नाही-मंत्री जयकुमार गोरे

    राज्यातील कुठल्याही झेडपी शाळेस निधी कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी नसेल, तर ग्रामविकास विभाग निधी देईल, अशी मोठी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. कुठूनही निधी मिळाला नाही तर ग्रामविकास निधी देणार असे आश्वासन सर्व झेडपी सीईओंना मंत्री गोरे यांनी दिले. महाबळेश्वर येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानांतर्गत दोन दिवसीय उच्चस्तरीय कार्यशाळा सुरू आहे. त्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) उपस्थित आहेत.

  • 12 Sep 2026 11:40 AM (IST)

    पोलीस प्रोटेक्शन जाणार म्हणून लक्ष्मण हाके यांची स्टंटबाजी -महेश डोंगरे यांची टीका

    लक्ष्मण हाके यांचे पोलीस प्रोटेक्शन जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन राहावे. यासाठी लक्ष्मण हाके आणि स्टंटबाजी करत तरुणांना मारहाण करून पोलीस स्टेशनला गेले. लक्ष्मण हाके यांची ही केवळ स्टंटबाजी आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी केला आहे. हाके यांच्या झालेल्या हल्ल्यानंतर आता मराठा समाजाकडून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे..

  • 12 Sep 2026 11:30 AM (IST)

    आदिवासी विद्यार्थी आंदोलकांचा मुंबईकडे लाँग मार्च

    आदिवासी विद्यार्थी आंदोलक मुंबईकडे लाँग मार्च काढणार आहेत. वसतिगृहांची दुरवस्था, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या मुद्दावर हा मार्च काढण्यात येणार आहे. सेंट्रल किचनच्या मुद्द्यावरही आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. २८ सप्टेंबरला नाशिकमधून लाँग मार्चला सुरुवात होईल. ५ ऑक्टोबरच्या सुमारास हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. आंदोलकांकडून समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरातून ५ हजारांहून अधिक विद्यार्थी, युवक-युवती आणि समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता आहे.

  • 12 Sep 2026 11:20 AM (IST)

    पेपरफुटीच्या रॅकेटची देशात हजार कोटींची उलाढाल-रोहित पवार

    2029 ला बदल होईल, केंद्रात आणि राज्यात जेव्हा बदल होईल..तेव्हा आपण नीट परीक्षा रद्द करू. नीट परीक्षा चालविणारे NTA आणि काही अधिकारी, एजंट यांचे रॅकेट आहे. देशात या रॅकेटची उलाढाल ही हजार कोटींच्या घरात आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

  • 12 Sep 2026 11:10 AM (IST)

    बार्शी महामार्गावर मराठा बांधवांचे रस्ता रोको आंदोलन

    धाराशिव जिल्ह्यात संभाजीनगर बार्शी महामार्गावर मराठा बांधवांचे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. रस्त्यावर बैलगाडी आडवी लावून परंडा तालुक्यातील सिरसाव येथे मराठा बांधवांचा संताप दिसून आला. “आता कुठे जायचं मुंबईला जायचंय “म्हणत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. जरांगे पाटलांचा आदेश आला की आम्ही मुंबईकडे निघणार असे त्यांनी सांगितले.आज मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा पंधरावा दिवस असून मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला

  • 12 Sep 2026 11:00 AM (IST)

    वडीगोद्री चौकात पोलिसांकडून बॅरिकेटिंग,छावणीच स्वरूप आल्याचं चित्र

    वडीगोद्री चौकात पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आली. छावणीच स्वरूप आल्याचं चित्र आहे. वडीगोद्री मधून अंतरवालीकडे जाणाऱ्या वाहणांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी बैठकीसाठी येत असलेल्या वाहनांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी देखील समाज बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन लावण्याचे सांगितलं होतं. राज्यव्यापी बैठक होत असल्याने अंतरवाली मध्ये वाहनांची गर्दी होऊन खोळंबा होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. मराठा आंदोलकांच्या गाड्या वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावण्याचा पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे.

  • 12 Sep 2026 10:58 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात मराठा बांधवांचे रास्ता रोको आंदोलन

    धाराशिव जिल्ह्यात संभाजीनगर बार्शी महामार्गावर मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं.  रस्त्यावर बैलगाडी आडवी लावून परंडा तालुक्यातील सिरसाव येथे मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला. ‘आता कुठे जायचं मुंबईला जायचय “म्हणत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पंधरावा दिवस असून मराठा बांधवांनी संताप व्यक्त केला.

  • 12 Sep 2026 10:36 AM (IST)

    गणेशोत्सवत मुंबईत आंदोलन करणं कठीण – चंद्रशेखर बावनकुळे

    गणेशोत्सवत मुंबईत आंदोलन करणं कठीण असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 12 Sep 2026 10:09 AM (IST)

    विद्यानंद बापट एकटे नाहीत, कायदेशीर टीम सोबत – वकील असीम सरोदे

    वकील असीम सरोदे म्हणाले, विद्यानंद बापट एकटे नाही त्यांच्या सोबत सर्व कायदेशीर टिम त्यांच्या सोबत आहे. ध्वनिप्रदूषण कोणा एकाचा विषय नाही. सर्वांनी एकत्रित येऊन काम करुयात. कायद्याची अंमलबजावणी व्हावी. सणांमध्ये पण कारवाई झाली पाहिजे. सामाजिक प्रबोधन सर्व मार्गांनी झालं पाहिजे. सदानंद दाते यांनी कठोर पावले उचलली तर नक्कीच परिवर्तन होईल’.

  • 12 Sep 2026 10:06 AM (IST)

    नागपुरात फडणवीस-बावनकुळे यांच्यात बैठक

    नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्य पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहावे लागेल.

  • 12 Sep 2026 09:55 AM (IST)

    कल्याण-डोंबिवली मनपाच्या महासभेत पाणी प्रश्न पेटला

    गणेशोत्सवातील पाणी नियोजनावर नगरसेवक आक्रमक झाले आहेत. MIDCच्या पाण्याचे प्रेशर वाढवा, टंचाईग्रस्त भागात वाढीव टँकरने पाणीपुरवठ्याचा ठराव मंजूर झाला आहे. कमी पाणी येणाऱ्या भागांसाठी विशेष नियोजन करण्याच्या प्रशासनाला महासभेत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 12 Sep 2026 09:51 AM (IST)

    मुलांच्या वस्तीगृह मधील जुनी पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत

    पुणे स्टेशन नजीक बी.जे वैद्यकीय महाविद्यालय मुलांच्या वसतीगृह आवारातील जुनी पाण्याची उंच टाकी धोकादायक झाली असून पडण्याच्या स्थितीत असल्याचे समोर आले आहे. येथील रहिवाशी, बै.जी.प्रशासन, सुरक्षारक्षक यांना खबरदारीची सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दल, मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिस विभाग दाखल झाले आहेत

  • 12 Sep 2026 09:49 AM (IST)

    एमपीएससी अध्यक्षांवर रोहित पवारांचा निशाणा

    एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्याचा दावा करत, त्यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे रोहित पवार म्हणाले.

  • 12 Sep 2026 09:49 AM (IST)

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाला

    ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर तीन ते चार तरुणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना जरांगे पाटील दिसत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, राज्यभरातील मराठा समाजाने 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आंतरवालीत यावे. आता सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आम्हाला अडवले तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू. आज मुंबईत त्यांचा मोर्चा धडकणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीन ते चार तरूणांनी हॉटेलमध्ये हाकेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या न्यायासाठी हाके यांनीही आंदोलन केले. हल्ल्यानंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता. हा माझ्यावर झालेला अकरावा हल्ला होता आणि तो भ्याड हल्ला होता हे सगळे कार्यकर्ते जरांगेचे होते.

दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचा दावा केला. जबाब नोंदवताना त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींची नावं घेतल्याचं सांगितलं.

Published On - Sep 12,2026 9:46 AM

Follow Us
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर