AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी लष्करासाठी लज्जास्पद प्रकार, सिंध प्रांतात प्रथमच चीन लष्कराची नियुक्ती

China Army PLA Pakistan: सीपीईसी प्रकल्पात सिंध प्रांतातील थार कोल ब्लॉकमध्ये दोन वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहे. त्या ठिकाणी 6,500 चीनी नागरिक काम करत आहे. त्या नागरिकांची सुरक्षा ही चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक फेरे करण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्करासाठी लज्जास्पद प्रकार, सिंध प्रांतात प्रथमच चीन लष्कराची नियुक्ती
पाकिस्तानात चीन सुरक्षा रक्षक तैनातImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 27, 2025 | 4:55 PM
Share

Chinese Security In Pakistan: बलुचिस्तान आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हल्ल्यानंतर पाकिस्तानात हल्ले सुरुच ठेवले आहे. या हल्ल्यामुळे चीन चिंतेत आला आहे. पाकिस्तानमध्ये चिनी अभियंते आणि मजुरांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे चीन आपले सुरक्षा रक्षक पाकिस्तानात तैनात केले आहे. ड्रॅगनने प्रथमच आपल्या प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडोर (सीपीईसी) प्रकल्पाची सुरक्षा चीन सैनिक करणार आहे.

सीपीईसी प्रकल्पात गुंतलेल्या अभियंते आणि कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी चीनने अलीकडेच पाकिस्तान सरकारसोबत करार केला आहे. भारतीय मीडियातील या मोठ्या खुलाशानंतर पाकिस्तान सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने चिनी सैन्य तैनात केल्याच्या बातम्या खोट्या बातम्या असल्याचे म्हटले आहे.

तीन कंपन्यांना सुरक्षेची जबाबदारी

चीनने संयुक्त सुरक्षा व्यवस्थाची जबाबदारी चीनमधील तीन खासगी कंपन्यांना दिली आहे. त्या डेवे सिक्योरिटी फ्रंटीयर सर्विस ग्रुप, चायना ओवरसीज सिक्योरिटी ग्रुप आणि हुआक्सिन झोंगशान सिक्योरिटी सर्विसचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सिंध प्रांतात दोन सीपीईसी वीज प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी 60 चीनी सुरक्षा रक्षक आहे. हे जवान त्याठिकाणी सुरक्षेसाठी असणाऱ्या पाकिस्तान लष्कराच्या सुरक्षेसाठी तैनात पाकिस्तानी सैनिकांची सुरक्षा करणार आहे.

प्रकल्पावर 6,500 चीनी नागरिक

सीपीईसी प्रकल्पात सिंध प्रांतातील थार कोल ब्लॉकमध्ये दोन वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहे. त्या ठिकाणी 6,500 चीनी नागरिक काम करत आहे. बलूच आर्मीकडून अनेक चीनी अभियंत्यांची हत्या आतापर्यंत करण्यात आली आहे. त्या नागरिकांची सुरक्षा ही चीनसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यामुळे त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक फेरे करण्यात आले आहे. त्यात पहिल्या फेऱ्यात चीन सुरक्षा रक्षक त्या नागरिकांची सुरक्षा करणार आहे. जाफर एक्‍सप्रेस ट्रेन अपहरण प्रकरणानंतर चीन चांगलाच हादरला आहे. बलूच आर्मीने या एक्स्प्रेसमधील 214 पाकिस्‍तानी सैनिकांना मारल्याचा दावा केला होता. यामुळे चीनने थार कोयला ब्‍लॉकमध्ये आपली सुरक्षा तैनात केली आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.