AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळ विमान अपघात, एका क्षणात अख्खं कुटुंब उद्धवस्थ, क्रु मेंबर, त्याची पत्नी आणि चार वर्षीय मुलाचा मृत्यू

नेपाळ येथील डोंगराळ भाग, हवामान, नवीन विमाने आणि पायाभूत सुविधांची कमतरता तसेच जुनी विमाने सेवेत असणे या कारणांमुळे वारंवार अपघात होत असतात.

नेपाळ विमान अपघात, एका क्षणात अख्खं कुटुंब उद्धवस्थ, क्रु मेंबर, त्याची पत्नी आणि चार वर्षीय मुलाचा मृत्यू
nepal plane crash tragedyImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 24, 2024 | 5:47 PM
Share

नेपाळच्या काठमांडू येथील खाजगी एअर लाईनच्या विमान उड्डाण घेताच अपघातग्रस्त झाल्याने क्रु मेंबर्ससह 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. या अपघातात विमानाचा एकटा पायलटच बचावला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परंतू या अपघातात एक त्रिकोणी कुटुंब संपले आहे. क्रु मेंबर त्याची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाचा या अपघातात दुर्वेवी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सौर्य एअर लाईन्स या खाजगी एअर लाईन्स हे विमान दुरुस्तीसाठी काठमांडूच्या त्रिभुवन इंटरनॅशनल विमानतळावरुन पोखरा येथे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे.

एअरलाईन्सने जारी केलेल्या माहीतीनूसार दुर्घटनाग्रस्त विमानात फ्लाईट मेटेनन्स स्टाफ मनुराज शर्मा त्यांच्या पत्नी प्रिजा खतिवाडा आणि चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा सोबत प्रवास करीत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रिजा या देखील सरकारी कर्मचारी होत्या. ऊर्जा मंत्रालयात त्या सहाय्यक कंप्युटर ऑपरेटर पदावर कार्यरत होत्या.या विमानात एकूण 19 प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील मृत्यू पावलेले 17 जण सौर्य एअरलाईन्सचे कर्मचारी होते.

या अपघातात आश्चर्यकाररित्या पायलट कॅप्टन एम.आर. शाक्य यांचे प्राण वाचले आहेत. त्यांना विमानाला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने रेस्क्यू ऑफरेशनमध्ये वाचविले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बम्बार्डियर CRJ-200ER कंपनीचे हे विमान साल 2003मध्ये बनविलेले होते. विमानाला दुरुस्तीसाठी पोखरा येथे नेले जात होते. दुरुस्तीनंतर त्याची तांत्रिक परिक्षण करण्यासाठी ते पोखरा येथे चालले होते. विमान रनवेवरुन टेक ऑफ घेतल्यानंतर तिरके होऊन धावपट्टी जवळच कोसळले आणि त्याला मोठी आग लागली. त्या 19 प्रवाशांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांचा इतिहास

नेपाळ आणि विमान अपघात एक समीकरण बनले आहे. नेपाळ हा पर्वतमय प्रदेशांचा भाग आहे.  येथून एव्हरेस्ट पर्वत जवळच आहे. येथील हवामान नेहमीच प्रतिकूल असते, नवीन विमाने आणि पायाभूत सुविधांची कमतरता तसेच जुनी विमाने सेवेत असणे या कारणांमुळे वारंवार अपघात होत असतात. नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षात सुमारे 28 विमान दुर्घटना झाल्या आहेत. साल 2023 ची सुरुवातच एका विमान अपघाताने झाली. त्यात 68 जणांचा मृत्यू झाला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.