AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाबाबत सर्वात मोठा दावा; म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान अणूयुद्ध…’

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान तणावाबाबत मोठं भाष्य केलं आहे. माझ्या धमकीमुळे दोन्ही देशाचे युद्ध टळल्याचा दावा त्यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाबाबत सर्वात मोठा दावा; म्हणाले, 'भारत-पाकिस्तान अणूयुद्ध...'
| Updated on: Aug 01, 2026 | 8:07 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ दावा केला आहे . ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानमधील युद्ध वाढण्यापासून रोखण्यात मोठी भूमिका बजावल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या टॅरिफच्या दबावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणूयुद्ध टळल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने संपूर्ण जगात चर्चांना उधाण आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना ‘ऑपरेश सिंदूर’बाबत वक्तव्य केलं. टॅरिफच्या धमकीमुळे भारत-पाकिस्तानसह आठपैकी पाच युद्धे टळल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ‘टॅरिफच्या धमकीमुळे भारत आणि पाकिस्तान अणूयुद्ध टळलं. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करतही ट्रम्प यांनी भाष्य केलं. ‘आमच्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध संपुष्टात आलं. यात अकरा विमाने पाडण्यात आले. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. त्यावेळी मी म्हटलं की, तुम्ही युद्ध केले, तर 250 टक्के जकात लादली जाईल’. माझ्या धमकीनंतर दोन्ही देश संतापले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यादिवशी फोन करून युद्ध करणार नसल्याचे सांगितले.

दुसरीकडे अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताने फेटाळून लावला आहे. लष्करी कारवाई थांबवणे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नामध्ये कोणत्याही तिसर्‍या व्यक्तीने मध्यस्थी केली नाही, असे भारताचं म्हणणं आहे. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिक ठार झाले. त्यानंतर भारताने गेल्या वर्षी 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर‘ सुरू केलं. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. दोन्ही देशात देशात चार दिवस गोळीबार झाला. दोन्ही देशाच्या तणावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष्य लागलं होतं.

भारताच्या लष्कराने सर्वप्रथम एकूण 9 दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर मिसाइल डागले. त्यातील चार दहशतवादी तळ हे पाकिस्तानच्या हद्दीत होते. तर पाच दहशतवादी तळ हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. ही दहशतवादी तळे जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, यांची होती. दोन्ही दहशतवादी संघटना 2019 सालच्या पुलवामा आणि 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार होत्या.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?