डोनाल्ड ट्रम्प चिंतेत, अमेरिकेवर मोठं नैसर्गिक संकट, 18 राज्यांमध्ये अलर्ट जारी
Snowstorm Alert in US : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेवर आता नवं संकट आलं आहे. हिमवादळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक रस्ते बर्फाने झाकलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही काळापासून आपल्या निर्णयांमुळे संपूर्ण जगाची झोप उडवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेवर आता नवं संकट आलं आहे. हिमवादळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक रस्ते बर्फाने झाकलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. हिमवादळाचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. विमानसेवाही विस्कळीत झाली आहे, गेल्या दोन दिवसांत 9000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. हिमवादळाच्या इशाऱ्यानंतर 18 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळामुळे देशातील बहुतांश भागात मोठा विनाश होण्याची शक्यता आहे. काही भागातील वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
हिमवृष्टीचा इशारा
अमेरिकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितानुसार न्यू मेक्सिको ते न्यू इंग्लंड पर्यंतच्या सुमारे 14 कोटी लोकांना या हिम वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभााने पूर्व टेक्सास ते उत्तर कॅरोलिना या भागात जोरदार हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. काही भागात चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीसारखे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वादळाच्या भीतीमुळे लोकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उत्तर टेक्सासमध्ये हिमवृष्टी
उत्तर टेक्सासमध्ये शनिवारी (24 जानेवारी) रात्रभर हिमवृष्टी झाली. या प्रदेशातून धोकादायक थंड वारे वाहत असून ते सोमवारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस रात्रीचे तापमान कमी राहण्याची शक्यता आहे, काही भागात हे तापमान उणे 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
वादळ ईशान्येकडे सरकण्याची अपेक्षा
हवामान विभागाने सांगितले की या वादळामुळे मुसळधार बर्फवृष्टी, पाऊस आणि थंडी पडेल. ज्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनेल. दक्षिणेकडून पुढे गेल्यानंतर, वादळ ईशान्येकडे सरकण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वॉशिंग्टनपासून न्यू यॉर्क आणि बोस्टनपर्यंत एक फूटापर्यंत बर्फ पडण्याची शक्यता आहे. बर्फवृष्टीनंतर, ग्रामीण लुईस काउंटी आणि न्यू यॉर्कच्या इतर उत्तरेकडील भागात पहाटेच्या सुमारास तापमान उणे 34 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहण्याची आवाहन करण्यात आले आहे. वादळाचा धोका लक्षात घेता देशाच्या विविध भागात बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
