AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : ट्रेड डीलच्या घोषणेआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कंपन्यांबाबत घेतला उत्तम निर्णय

Donald Trump : मागच्यावर्षी जे डोनाल्ड ट्रम्प इतके भारताच्या विरोधात होते ते आता हळूहळू बदलतायत. भारत-अमेरिका ट्रेड डीलच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असताना त्यांनी भारतीय कंपन्यांबाबत एक चांगला निर्णय घेतला आहे.

Donald Trump : ट्रेड डीलच्या घोषणेआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कंपन्यांबाबत घेतला उत्तम निर्णय
Donald Trump Image Credit source: PTI
| Updated on: Jul 01, 2026 | 1:23 PM
Share

मागच्यावर्षी भारत आणि अमेरिकेचे संबंध बरेच ताणले गेले. दोन्ही देशांच्या संबंधात तणाव होता. याचं कारण होतं टॅरिफ वाद. अमेरिकेने जगातील सर्वच देशांवर टॅरिफ लावला होता. त्यात भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून दुप्पट टॅरिफ लावला. परिणामी भारताची अमेरिकन बाजारपेठेतील निर्यात घटली. अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसला. त्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जरा जास्तच जवळ केलं होतं. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधात नाराजी, दुरावा होता. पण डोनाल्ड ट्रम्प आता बिघडलेले भारत-अमेरिका संबंध रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत असतात. दोन्ही देशांमध्ये ट्रेड डीलची चर्चा अखेरच्या टप्प्यात असताना ट्रम्प प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी भारताच्या चार कंपन्यांवरुन बंदी हटवली आहे.

अमेरिकेच्या अर्थ खात्याने ही बंदी हटवण्याचा निर्णय घेतला. या चार कंपन्यांमध्ये हैदराबाद स्थित आरआरजी इंजीनियरींग टेक्नोलॉजीज प्रायवेट लिमिटेड, लोकेश मशीन्स लिमिटेड, अहमदाबाद स्थित गॅलेक्सी बेयरिंग्स लिमिटेड आणि दिल्ली स्थित शौर्य एरोनॉटिक्स प्रायवेट लिमिटेड या त्या चार कंपन्या आहेत. अमेरिकेच्या वित्त विभागाने या चार कंपन्यांना स्पेशली डेजिग्नेटेड नॅशनल्स (SDN) लिस्ट मधून बाहेर काढलं आहे. या लिस्टमध्ये ज्या कंपन्या आणि व्यक्ती असतात, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाते.

19 भारतीय कंपन्यांवर निर्बंध

अमेरिकी परराष्ट्र संपत्ती नियंत्रण कार्यालयाच्या प्रतिबंधांच्या लिस्टमध्ये या चार कंपन्या होत्या. जवळपास दोन वर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. वर्ष 2024 मध्ये OFAC ने कार्यकारी आदेशातंर्गत 19 भारतीय कंपन्यांवर निर्बंध घातले होते. यात 19 कंपन्या आणि दोन व्यक्ती होते. रशियन सरकारची मदत करणाऱ्या कंपन्या आणि लोकांना OFAC अंतर्गत टार्गेट करण्यात येतं.

सार्वजनिकरित्या लिस्टेड कंपन्या

2022 साली रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर रशियावर प्रतिबंध घालण्यात आले. हे प्रतिबंध मोडून रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिकेकडून कारवाई करण्यात आली होती. या मुद्यावर अमेरिकेसोबत चर्चा केल्याच भारताकडून सांगण्यात आलं होतं. निर्बंध हटवण्यात आलेल्या चार कंपन्यांपैकी दोन कंपन्या गॅलेक्सी बियरिंग्स लिमिटेड आणि लोकेश मशीन्स लिमिटेड सार्वजनिकरित्या लिस्टेड कंपन्या आहेत. लोकेश मशीन्सच्या ग्राहकांमध्ये अनेक ग्लोबल कंपन्यांचा समावेश आहे.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती