मोठी बातमी! मोदींच्या चीन दौऱ्यामुळे ट्रम्प यांना लागली मिरची, टॅरिफवर पुन्हा केलं मोठं विधान!

SCO परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया, चीनच्या प्रमुखांना भेटले. ही भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याना फारशी आवडली नसल्याचे म्हटले जात आहे. मोदींच्या या भेटीनंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मोठी बातमी! मोदींच्या चीन दौऱ्यामुळे ट्रम्प यांना लागली मिरची, टॅरिफवर पुन्हा केलं मोठं विधान!
donald trump
| Updated on: Sep 01, 2025 | 9:54 PM

Donald Trump : चीनमध्ये पार पडलेल्या SCO परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांची भेट झाली. हीच भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवडलेली आहे. SCO परिषद संपताच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि भारतावर लादलेला टॅरिफ यावर मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेचे संबंध यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

अमेरिका भारताचा सर्वात मोठा ग्राहक

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. याच पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अमेरिका-भारत यांच्यातील संबंध आणि भारतावर लादण्यात आलेला टॅरिफ यावर प्रतिक्रिया दिली आहे. “फारच कमी लोकांना माहिती आहे की अमेरिका भारतासोबत फारच कमी व्यापार करते. पण भारत मात्र अमेरिकेसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मालाची विक्री करतो. अमेरिका भारताचा सर्वात मोठा ग्राहक आहे. पण आपण मात्र त्यांना फारच कमी प्रमाणात वस्तू विकतो. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त एकतर्फी व्यापार होत आहे. गेल्या अनेक दशकांपासून हे एकतर्फी संबंध आहेत,” असा मोठा दावा ट्रम्प यांनी आपल्या या पोस्टमध्ये केला आहे.

अमेरिकेचा भारतातील व्यापार फारच कमी

तसेच, भारताकडून अमेरिकेवर मोठा टॅरिफ लावला जातो. त्यामुळेच अमेरिका भारतात आपला व्यापार वाढवू शकत नाही. त्यामुळेच ही एका प्रकारे एकतर्फी आपत्ती आहे. दुसरीकडे पाहायचे झाले तर भारत रशियाकडून बरीच शस्त्रसामग्री आणि तेल खरेदी करतो. अमेरिकेचा भारतातील हा व्यापार मात्र फारच कमी आहे. आता मात्र भारताने टॅरिफ पूर्णपणे कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण आता खूपच उशीर होत आहे. त्यांनी हे काम फार अगोदरच करायला हवे होते, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आता भारतावरील टॅरिफ कमी होणार का?

दरम्यान, ट्रम्प यांची ही पोस्ट पाहून त्यांचे भारताविषयीचे विचार बदलले नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच भविष्यात नेमके काय होणार? अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार का? असा प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केला जात आहे.