AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump Tariffs : ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करताच अनेक देशांना लागली लॉटरी; भारताला काय फायदा होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारतातसह इतरही अनेक देशांच्या व्यापाराला फटका बसला. अमेरिकेतही याचे पडसाद उमटले आहेत.

Donald Trump Tariffs : ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करताच अनेक देशांना लागली लॉटरी; भारताला काय फायदा होणार?
donald trump
| Updated on: Nov 15, 2025 | 7:23 PM
Share

Donald Trump Tariff Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतरही काही देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अमेरिकेचे अनेक देशांशी असलेले संबंध बिघडले होते. त्याचा परिणाम म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला चांगलाच फटका बसला. ट्रम्प यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराचा न्युयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. विशेष म्हणजे अमेरिकेत महागाईचाही मुद्दा फारच तापलेला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित आयात वस्तूवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली आहे. त्याचा फायदा आता अनेक देशांना होणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी केला आहे. या आदेशावर सहीदेखील झाली असून तो गुरुवारपासून (13 नोव्हेंबर) लागू होणार आहे. या निर्णयाअंतर्गत बीफ, टोमॅटो, कॉफी, केळी यासारख्या जवळपास 100 पेक्षा अधिक शेतीशी निगडित वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यात आला आहे. या आदेशाचा मेक्सिको आणि स्वित्झर्लंड या देशांना मोठा फायदा होणार आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुार डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत रेसिप्रोकल टॅरिफ असलेल्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यात आला आहे. असे असले तरी या वस्तू पूर्णपणे टॅरिफमुक्त करण्यात आलेल्या नाहीत.

दोन देशांना होणार मोठा फायदा

उदाहरणादाखल मेकिस्कोतून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या टोमॅटोंवरील 17 टक्के टॅरिफ कायम असेल. मेक्सिकोला या निर्णयाचा फायदा होणार आहे. सोबतच स्वित्झर्लंडाही त्याचा फायदा होईल. स्वित्झर्लंडवरील आयातशुल्क आता 39 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. भारतावरील टॅरिफ मात्र अद्याप कमी करण्यात आलेला नाही. परंतु लवकरच भरतावरील टॅरिफही कमी केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा फायदा भारताला होऊ शकतो.

ट्रम्प यांनी टॅरिफ का मागे घेतला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केल्यानंतर अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला. परंतु या निर्णयाची झळ अमेरिकेलाही सोसावी लागली. अमेरिकेत काही वस्तूंची टंचाई निर्माण झाली. परिणामी काही वस्तू महागही झाल्या. त्याचा परिणाम अमेरिकेतील लोकांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधी मत तयार झाल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. प्रतिष्ठेची असलेली न्यूयॉर्क महापौरपदाची निवडणूक ट्रम्प यांचे समर्थन असलेल्या उमेदवाराला गवमवाी लागली. या सर्व घडामोडीनंतर आता ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही.

‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ.

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार, शासनादेश जारी.

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार, शासनादेश जारी

अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच…दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!.

अखेर अमित शाहांनी शब्द दिला, एकनाथ शिंदेंनी भेट घेताच…दिल्लीच्या बैठकीत मिळालं मोठं आश्वासन!

पाकिस्तानची झोप उडाली, थेट नव्या देशाची घोषणा? सरकारविरोधात सर्वात मोठे बंड!.

पाकिस्तानची झोप उडाली, थेट नव्या देशाची घोषणा? सरकारविरोधात सर्वात मोठे बंड!