डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफनंतर भारताला दुसरा सर्वात मोठा झटका, अमेरिकेतील भारतीय नागरिक अडचणीत, H-1B व्हिसाबाबत धक्कादायक निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा निर्णय दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे बघायला मिळतंय. अनेक नागरिकांना अमेरिकेतून हद्दपार करण्याची शक्यता आहे. टॅरिफनंतर हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून काहीही झाले तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, याकरिता प्रयत्न करत आहेत. आता भारताच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा डाव टाकल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या एका नवीन निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांच्या स्थलांतरितांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अमेरिकन इमिग्रेशन एजन्सी आता अनधिकृत रोजगाराची प्रकरणे शोधण्यासाठी महसूल सेवेच्या कर नोंदी वापरत आहे. यामधून फक्त अमेरिकेतील भारतीय लोकांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. कारण याचा परिणाम हा H-1B व्हिसा धारकांवर होणार आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक हे H-1B व्हिसावर राहतात.
नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांनी त्यांच्या कर विवरणपत्रात त्यांच्या अतिरिक्त उत्पन्नाची माहिती दिली आहे ते अडचणीत सापडणार आहेत. कर भरून आणि त्यांचे उत्पन्न जाहीर करूनही त्यांना व्हिसा मुदतवाढ नाकारली जात आहे. देशात पुन्हा प्रवेश करण्यास बंदी घातली जात आहे. हेच नाही तर त्यांना थेट अमेरिकेतूनही हद्दपार केले जात आहे. याबद्दल बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयआरएसने इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट आयसीईसोबत डेटा शेअर केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर बोलताना तज्ज्ञांनी म्हटले की, H-1B व्हिसा धारकांना या निर्णयामुळे थेट मोठा धोका झालाय. कारण त्यांच्या नोकऱ्या प्रायोजक कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. जर यूएससीआयएस कर नोंदींमध्ये दर्शविलेल्या बाजूच्या उत्पन्नाच्या आधारे नोटिसा जारी करत असेल तर त्याचे थेट गंभीर परिमाण होऊ शकतात. हे व्हिसाचे नियमांचे उल्लंघनाचे प्रकरण बनू शकते आणि त्यामुळे मोठ्या संख्येने अमेरिकेतून लोकांना बाहेर काढले जाऊ शकते.
यावरून हे स्पष्ट होताना दिसतंय की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात मोठा गेम करण्याचे काम सुरू आहे. हेच नाही तर आता अमेरिकेत नोकऱ्या करणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. यामुळे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या अडचणीही वाढू शकतात. हा मोठा धक्का फक्त भारतालाच नाही तर जगाला म्हणाला लागेल.
