2900 कोटी रुपयांचा दंड काढा, अन्यथा मोठा टॅरिफ लावेल, डोनाल्ड ट्रम्प यांची परत धमकी, म्हणाले, अमेरिकेत नोकऱ्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच आता परत एकदा मोठ धमकी दिल्याचे बघायला मिळत आहे. व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या टेक कंपन्यांच्या सीईओंना डिनर ठेवण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. आता त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एका हत्याराप्रमाणे वापरत आहेत. त्यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावलाय. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर युरोपियन युनियन असल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी युरोपियन युनियन विरोधात मोठा संताप हा व्यक्त केलाय. त्यांनी चक्क गुगलवर लावण्यात आलेला 2900 कोटी रुपयांचा दंड चुकीचा आणि अन्याय कारण असल्याचे म्हणत मोठे भाष्य केले. हेच नाही तर त्यांनी थेट युरोपियन युनियनला थेट मोठी धमकी देत हा दंड मागे घेतला नाही तर मोठा टॅरिफ लावणार असल्याची धमकी दिली.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह अनेक टेक दिग्गजांसाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनरचे आयोजन करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, युरोपने आज आणखीन एक मोठी आणि शक्तीशाली असलेली गुगल कंपनीवर तब्बल 3.5 अब्ज डॉलर्स (2900 कोटी) चा दंड लावला आहे. हे पैसे अमेरिकन गुंतवणूक आणि नोकऱ्यांमध्ये जाऊ शकले असते. खरोखरच हे अत्यंत चुकीचे आहे. हे अमेरिकन कर देणारे लोक अजिबातच सहन करणार नाहीत.
हा दंड केवळ गुगलवरच नाही तर इतर अनेक अमेरिकन कंपन्यांवर लावला जात असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, युरोपियन युनियनने अॅपलला आयर्लंडला 13 अब्ज युरो (1.1 लाख कोटी रुपये) कर आणि व्याज देण्याचे आदेश दिले होते. या कंपन्यांचे पैसे परत मिळाली पाहिजे, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, जर युरोपियन युनियनने हे दंड मागे घेतले नाहीत तर त्यांच्यावर आम्ही आता थेट टॅरिफ लादू.
युरोपियन युनियनचे याबद्दल स्पष्ट म्हणणे होते की, गुगलने त्यांच्या सेवांचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या स्पर्धकांना नुकसान पोहोचवले. युरोपियन युनियनने गुगलवर लादलेला हा चौथा मोठा दंड आहे. यापूर्वीही त्यांनी काही दंड आकारली होती. ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीनंतर युरोपियन युनियन काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण टॅरिफच्या वादात अगोदरच संबंध ताणलेले असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी दिलीये. अमेरिकन गुंतवणूक आणि नोकऱ्यांसाठी हे हानिकारक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
