डोनाल्ड ट्रम्प यांचा अत्यंत मोठा दावा, रशियाकडून माैन, अखेर युक्रेनवर…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. तब्बल 4 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाविरोधात लढण्यासाठी अनेक देश युक्रेनची मदत करत आहेत. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिकेतून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असलेल्या देशांवर टॅरिफ लावला जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. अमेरिकेकडून हे युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. पहिला शांतता प्रस्तावही देण्यात आला. मात्र, ज्याला युक्रेनने विरोध केला. पुतिन यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची रशियात बैठक झाली. पुतिन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही युक्रेनच्या ज्या भागांवर ताबा मिळवला आहे, तो भाग आमच्याकडेच राहिल शिवाय त्याला मान्यताही हवी. मात्र, याला युक्रेनकडून जोरदार विरोध केला जात आहे. अमेरिकेचे अधिकारी दोन्ही देशासोबत चर्चा करताना दिसत आहेत.
युद्ध सुरू आहे दोन्ही बाजूंनी हल्ले केली जात आहेत. मात्र, सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानवतेच्या आधारावर एक मोठे विधान केले आहे. ज्यामुळे त्यांनी रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावीत, असे म्हटले की, तशी विनंती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याकडे केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनची राजधानी कीव यासोबतच इतर काही शहरांवरील हल्ले थांबवावीत म्हटले.
ट्रम्प यांनी म्हटले की, वैयक्तिकरित्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना तीव्र थंडीच्या काळात कीव आणि इतर शहरांवर हल्ला करण्यापासून एक आठवडा थांबवण्याची विनंती मी केली आहे. युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी आहे आणि अशात हल्ले करून राहिले तर नागरिकांना समस्या होऊ शकतात, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले की, पुतिन यांनी त्यांची विनंती ऐकली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर रशियाकडून काहीच भाष्य करण्यात आले नाहीये. रशियाने जरी युक्रेनवर हल्ला करणे एका आठवड्यासाठी थांबवले तर युक्रेनही रशियावरील हल्ले थांबवणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यानच युक्रेनकडून रशियावर गंभीर आरोप करत सांगण्यात आले की, रशिया हा मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे.
